अबु आझमी..
अबु आझमी.. हे नांव पण असं आहे , की जवळपास प्रत्येक मराठी माणसाला अगदी एखाद्या ट्रेररिस्ट किंवा बॉंब ब्लास्ट मधला एखादा आरोपीच नांव असाव असं वाटते. अर्थात , असं वाटणं हा पुर्ण पणे मुर्खपणा आहे असंही वाटेल.. पण…. असो… माणसाच्या मनाला काय वाटावं यावर कांहीच ताबा राहु शकत नाही. माणसाचं मन कसं असतं?? अ ड्रंकन मंकी, स्टंग विथ द स्कॉर्पिओ.. त्याच्यावर ताबा रहाणं कठीण आहे.
अबु आझमी नावाला निवडुन देणारे, किंवा मतं देणाऱ्यांमधे मराठी माणसं पण आहेत. हे जरी खरं असलं तरीही ,अबु आझमी या नांवा बद्दल प्रत्येक सामान्य मराठी माणसाच्या मनात एक चीड आहे. या मधे मराठी माणसं अशिही आहेत की ती कुठल्या एका पक्षाची नाहित तर ती एकत्र बांधल्या गेलेली आहेत केवळ एकाच धाग्याने.. तो म्हणजे ’मराठी पणाच्या’ धाग्याने … + मराठी बद्दलचं प्रेम. .
अगदी पहिल्या वेळी म्हणजे १९६३ साली विदर्भवीर (?) जांबुवन्तराव धोटे यांनी स्पिकरवर पेपर वेट फेकुन मारला होता.नंतर एप्रिल २००८ मधे सहा भाजप+शिवसेना आमदारांना याच कारणासाठी निलंबित करण्यात आलं होतं. जयललिता असेम्ब्ली मधे जातांना नेहेमी पोंचू घालते.. कारण माहिती आहे ??? पुर्वी एकदा जयललिताची साडी उतरवण्याचा प्रयत्न तामिळनाडू असेम्ब्ली मधे झाला होता.असे प्रकार तर बिहार आणि युपी असेम्ब्ली मधे नेहेमीच होत असतात.
अबु आझमी मराठी समाजात ,स्वतःच्या वागणुकीने घृणेचा पात्र झालेला आहे – कधी म्हणतो की आम्ही त्यांना काठ्या देउ.. तर कधी छटपुजे चं राजकारण करतो. या वर्षी तर हे सिध्द झालंय की जर छटपुजे चं राजकारण केलं नाही तर मराठी माणसांना छट पुजेचं कांहीच वावडं नाही. म्हणजे मागल्या वर्षी छटपुजेच्या नावे लालुवा आणि अबु ह्या दोघांनी आपल्या जिभेवर ताबा ठेवला असता तर मराठी माणसांनी पण काहिच केलं नसतं.
या मारण्यामुळे काय फायदा झालाय??? मला तर कांही फारसा दिसत नाही.. केवळ सगळ्या मराठी लोकांना (मनसे + आणि इतर ) त्या अबु ला झापड मारल्याचंएक मानसिक समाधान-जी बऱ्याच लोकांची अगदी मनापासुन इच्छा होती गेल्या कित्तेक दिवसांपासुन ती पुर्ण झाली. . हे पण अगदी शंभर टक्के खरं की कोणी कुठल्याही पक्षाचा असो, या मुळे प्रत्येक मराठी माणसाला एक मानसिक समाधान मिळालंय.
आणि नुकसान म्हणाल तर अजुन असेम्ब्ली सुरु पण व्हायची आहे तरिही मनसेचे चार आमदार निलंबित करण्यात आलेले आहेत. आता १३ पैकी जर ४ आमदार निलंबीत झाले तर उरले केवळ ९. त्यांच्या कडुन कुठली अपेक्षा करायची?? हे चार आमदार निलंबीत होणार हे दुपारीच लक्षात आलं होतं, फक्त हा निर्णय कधी बाहेर येतो हेच पहायचं होतं.
असो.. आता मुळ मुद्दा.. अबु आझमी ला आज विधानसभेमधे मारलं हे योग्य की अयोग्य ह्याचा कीस पाडणं सुरु होणार आहे आता. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, की आम्ही हे जे आमदार निवडुन दिलेले आहेत ते कुस्तिच्या आखाड्या प्रमाणे असेम्ब्ली मधे मारा माऱ्या करायला की आमचे प्रश्न सोडवायला?
कितिही झालं..तरी अबु एक निर्वाचित आमदार ( होतकरु मंत्री) आहे, तेंव्हा त्याची अशी बेअब्रु असेम्ब्ली मधे करणे संयुक्तीक ठरत नाही. अबु ला मारलं, याचं दुःख नाही, फक्त जागा चुकली. असेम्ब्ली हॉल मधे मारण्या ऐवजी बाहेर कुठे मारलं असतं तर कदाचित सस्पेंड व्हायची वेळ आली नसती. असाही प्रश्न उभा केला जातोय की इतर आमदार, ज्यांनी इंग्रजीत शपथ घेतली त्यांना मारहाण का करण्यात आली नाही?
म्हणजे काय- सत्तारुढ पक्ष वगळता इतर पक्षाचे आमदार काय केवळ मारहाण करण्यासाठी जनतेने निवडुन दिलेले आहेत असं आहे कां? अर्था नाही.. तेंव्हा अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. कितिही झालं तरीही आमदारांनी असेम्ब्लीमधे केलेली अशी मारहाण समर्थनिय ठरु शकत नाही.
सत्य साई बाबा.. महाराष्ट्राचे राजगुरु
पुर्वीच्या काळी राजा कडे एक राज गुरु असायचा, तो राजाला वेळोवेळी सल्ला द्यायचा. जेंव्हा ऐकलं की अशोकरावांनी सत्य साईबाबा मुंबईला आले तेंव्हा पासुन त्यांना आपल्या घरात आणणार असे ऐकलं तेंव्हा पासुनच लक्षात आलंय की ह्या साईबाबाची जादु अशोकरावांच्यावर पण चालली आहे, म्हणजे आता हे महाराष्ट्राचे राज गुरु झाले तर!!!
पुर्वी नरसिंम्हा राव जेंव्हा पण यांच्या नादी लागले होते. सत्य साईबाबांचे रम्य जादुचे प्रयोग .. म्हणजे हातातुन राख (अंगारा) , चेन, अंगठी , खडे काढणे हे प्रयोग नेहेमीच चर्चेचा विषय राहिलेले आहेत.इतकं सगळं असुनही ह्या अंतर्राष्ट्रीय गुरु चे १२० देशांमधे भक्त गण आहेत. यांची हात चलाखी बरेचदा कॅमेऱ्यावर पकडल्या गेलेली आहे, तरी पण यांच्या भक्तांना विश्वास बसत नाही..
ब्रेकिंग न्युज मधे तर यांना मी बरेचदा पाहिलेलं आहे..यांना पकडलं असतांना. बरं , समजा समजा आपण असं समजलं की ह्यांच्यामधे अशी काहीतरी पॉवर आहे की हे हवेतुन कांहीही काढू शकत- तर यांच्या या अतींद्रिय शक्तीचा काय वापर करुन घेता येईल??
- यांना पाकिस्तानच्या सिमेवर उभे करा, आणि आपला हात वर करायला सांगुन त्यामधुन मिसाइल्स ,एपिसी, तोफा, रनगाडे हवेतुन निर्माण करुन मिल्ट्रीला द्यायला लावावे.
- यांना भामरागढ ला नेउन सोडावे आणि तिथे जाउन त्यांनी मालन्युट्रिशन मुळे मरणाऱ्या मुलांना दुध, प्रोटीन्स इतयादी गोष्टी हवेतुन काढुन द्यायला लावाव्या. अंगारे धुपारे खुप झाले आता.. काही तरी कन्स्ट्रक्टिव्ह करा म्हणावं.
- यवतामाळ, उमरखेड इतयादी भागात, जिथे शेतकरी आत्महत्या करताहेत तिथे नेउन सोडावे. यांनी शेतामधे जाउन तिथे दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करताहेत, तेंव्हा तिथे जाउन शेतामधे जादुने पाउस पाडावा म्हणजे किमान कांही शेतकऱ्यांचे जिव तरी वाचतिल.
- यांना काश्मिरला पाठवावे, तिथे जाउन त्यांनी तालिबानी टेररिस्ट लोकांना आपला अंगारा द्यावा जेणेकरुन ते सगळे आतंकवादी मार्ग सोडुन सरळ मार्गाने चालतिल.
- आंध्रा मधे तर हे रहातातच , तेंव्हा तिथे रोज होणाऱ्या नक्षलवादी कारवाया थांबवण्यासाठी अशी जादु करावी , की नक्षलवाद्यांचे बॉंब कधी ब्लास्ट होऊ देऊ नये, तसेच त्यांच्या बंदुकांमधुन बुलेट च्या ऐवजी लिमलेट्च्या गोळ्या बाहेर निघाव्या.
- तिबेट मधे जाउन, आपल्या अतिंद्रिय शक्ती वापरुन तिथुन चायनीज मिल्ट्रीला हाकलुन लावावे.
अशी बरिच कामं आहेत.. लिस्ट तर इतकी मोठी होऊ शकते की बस्स.. पण इथे तुमच्या माहिती साठी कांही व्हिडीओज आहेत नेटवर , यांची हातचलाखी पकडल्याचे ते पोस्ट करतोय..
हा बाबा मोठा हुशार आहे. गरीब जनतेला राख देतो, आणि पैसे वाल्या भक्तांना सोन्याच्या अंगठ्या, चेन्स, घड्याळं वगैरे. इतका फेक माणुस पण अजुनही याचे बरेच मोठे मोठे भक्त गण आहेत.. असो .. बिचारे..
सुनीताबाई देशपांडे

सुनिताबाई देशपांडे
एकदा न्यु माजरी कोल फिल्डस मधे काम होतं म्हणुन वरोऱ्याला जाणं झालं. कामाच्या निमित्ताने का होईना, पण वरोऱ्याला जाणं झालं की बरं वाटतं. असं म्हणतात की जिथे तुमची नाळ गाडली गेली असते तिथे तुम्हाला नेहेमीच जास्त कम्फर्टेबल वाटतं. वरोऱ्या बरोबरच्या माझ्या बऱ्याच सुंदर आठवणी आहेत लहानपणीच्या , म्हणुन वरोऱ्याला जायचं म्हंट्लं की इतका आनंद होतो की “पंछी बनु… ” म्हणट नाचावसं वाटतं….
नागपुरला सकाळी पोहोचल्यावर, विमानतळावरुन टॅक्सी करुन न्यु माजरीला निघालो. वेस्टर्न कोल फिल्ड्स मधे मिटींग होती १२-३० ला . कामं आटोपुन परत येतांना बाबा आमटेंना भेटुन यावं म्हणुन आनंद वनाकडे मोर्चा वळवला.न्यु माजरी पासुन खुपच जवळ म्हणजे फार तर १०-१५ किमी असेल आनंदवन. त्या काळी बाबांची तब्येत थोडी नरम गरमच होती. त्यांना नमस्कार केला, आणि म्हंट्लं.. ’बाबा मी आप्पाजींचा नातु’ .. अस व्हय.. कोणाचा रे तु?? म्हंटलं सुहास चा मोठा मुलगा .. एकदम ओळखल्याचं हसु आलं चेहेऱ्यावर. बाबांचं गावातलं घर आमच्या अजोबांच्या घरा शेजारचं..
शेजारीच कृष तरी पण ट्रेडमार्क चष्म्यामुळे भाई पण बसले होते पण, क्षणभर विश्वासच बसला नाही.. इथे पुलं कसे काय हा प्रश्न मनात आला. बाजुला सुनीता बाई बसल्या होत्या, त्यांच्या चेहेऱ्यावरचं प्रसन्न हास्य पाहुन बरं वाटलं. खादीची साडी, गळ्यात काळ्यामण्यांची माळ आणि बस्स!!इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांच्याकडे पहातंच राहिलो . पुलं ना आणि शेजारच्या सुनिता बाईंना पण नमस्कार केला. ही माझी पुलंची पहिली आणि शेवटली भेट – अगदी अनपेक्षित झालेली .तसंही आहे मनोहर तरी वाचल्यामुळे सुनिताबाईंची थोडी ओळख झालेलीच होती . एकदा आत्मचरित्र लिहिलं की तुमच्या जिवनातले बरेच बरे वाईट प्रसंग लोकांना समजतात, आणि तुमच्या बद्दल एक आपलेपणा निर्माण होतो लोकांच्या मनात. अगदी हेच झालंय सुनीताबाईंच्या बाबतीत.
काल सुनीता ताई गेल्या म्हणुन एक मेसेज टाकला होता सागरने.आधी मला समजलंच नाही की कोण सुनिता ताई ते. नंतर संध्याकाळी त्यावर आनंदचं उत्तर होतं की सुनीताबाई देशपांडे.. आणि ते वाचल्यावर एकदम धक्काच बसला, आणि त्यांच्या भेटीचा हा प्रसंग आठवला- आणि खुप वाईट वाटलं.आणि सुनिताबाईंना तर प्रत्यक्ष पाहिलेलं आहे.. त्यामुळे कॊणी आपल्या जवळचं माणुस गेल्याप्रमाणे वाटलं. इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. !!अतिशय निःस्वार्थ आणि समाजाशी नाळ जुळलेलं दांपत्य म्हणुन पुलं आणि सुनिताबाई कायम स्मरणात रहातिल.
ऍक्सीलरेटेड एजिंग
मिसेस डाउटफायर टिव्ही वर पाहिला आणि सिनेमा संपल्यावर थोडावेळ आपण काय पाहिलं हेच कळलं नाही. एका वेगळ्याच ट्रान्स मधे घेउन गेला हा सिनेमा. ही गोष्ट अर्थात बऱ्याच वर्षांपुर्वीची आहे..नंतर कांही दिवसांनी तोच सिनेमा हिंदी मधे पण पाहिला चाची ४२०- कमला हसनचा. या सिनेमा मधे कमला हसनचा मेक अप खुपच सुंदर केलेला होता. त्यासाठी खास मेकपमन हॉलिवुड हुन मागवले होते.आणि कमला हसनचे काम पण अगदी अप्रतिम झाले होते..
कमला हसन हा नेहेमीच अशा प्रकारचे प्रयोग करित असतो स्वतःच्या रुपावर. अप्पु राजा आठवतो?? ज्यामधे कमलाहसनने एका ड्वार्फ (बुटक्याचा) रोल केला आहे.प्रत्येक काम पर्फेक्टली झालंच पाहिजे हा याचा अट्टाहास असतो. दशावतारम मधे एका सिन च्या शुटींगसाठी तिन करोड रुपये खर्च केल्याचे ऐकले आहे. असो…मुद्दा कमला हसनचे चित्रपट हा नाही.
कांही दिवसांपुर्वी एक सिनेमा पाहिला होता टिव्ही वर. तसा सिनेमा पहाण्याचा योग फारच कमी वेळा येतो. कारण टिव्ही वर सासु, सुन, आनंदी, आणि तत्सम सिरिअल्स( नांव लिहिली काय आणि न लिहिली काय) यांचाच कब्जा असतो. कधी तरी शनिवार रविवारी दुपारी सिनेमा बघायला मिळतो, तेंव्हा हा एक सिनेमा टिव्ही वर सुरु होता.स्टोरीलाइन अशी होती की एक मुलगा वयाच्या मानाने खुपच लवकर म्हातारा होतो, म्हणजे त्याचं वय १८ असतांना तो अगदी ८० वर्षाच्या जख्खं म्हाताऱ्या सारखी त्याच्या शरिराची स्थिती होते, आणि तशाही परिस्थितीत तो ग्रॅजुएशन पुर्ण करतो… असा कांहीसा चित्रपट होता तो.एका माणसाची घड्याळाच्या विरुध्द रेस… आयुष्य फार कमी , इकडे वय (शरीराचं एजींग मुळे) वाढतंय.. आणि सगळं काही करायचंय.. अशी केविलवाणी धडपड, आणि तसं असतांनाही , हिरोचा आयुष्यातला प्रत्येक क्षण जगण्याची धडपड..!!! अंगावर काटा येतो तो चित्रपट पहातांना.
अमिताभ बच्चन एका सिनेमात काम करतोय पा म्हणुन.. त्या सिनेमात त्याने ऍक्सिलरेटेड एजींग सिंड्रोम असलेल्या मुलाचे काम केलेले आहे. त्याचा मेकप केलेला फोटो हल्ली जाहिरातींच्या मधे खुप झळकतो. आणि काल मला सागरने एक लिंक दिली “पा” या चित्रपटाच्या वेब साईटची . त्या मधे अमिताभ बच्चन चा फोटो + आणि प्रोमो व्हिडीओ पाहिला.
आणि या रोगा बद्दल अगदीच त्रोटक माहिती दिलेली आहे, ‘पा’ च्या साईटवर, म्हणुन नेट वर शोध घेतला. या रोगा बद्दल जेंव्हा वाचलं तेंव्हा अजुन काहीतरी शोधावं म्हणुन यु ट्युब वर शोधलं तर एका मुलीचा व्हिडीओ मिळाला, जिला हा रोग झाला होता. या रोगाबद्दल जर कांही अजुन वाचायचं असेल तर यु ट्य़ुब वर जाउन त्या व्हिडीओ च्या शेजारची माहिती वाचा.
हा रोग चाळिस लाखात एखाद्याला होतो. या रोगामधे रुग्णाचे वय ५ते १० पट जास्त एजिंग होतं. म्हणजे शारिरिक वय जरी १३ असले तरिही शरिराची झिज ही ८० वर्षाच्या म्हाताऱ्या प्रमाणे होते.
त्या मुलीचा व्हिडीओ खाली दिलेला आहे.. तो पहा आणि अमिताभ बच्चनचा व्हिडीओ दिलेला आहे, तो पण पहा-अमिताभचा मेकप अगदी त्या मुलीसारखाच केलेला आहे. खुप सारखेपणा आहे .
कौतुक अमिताभचं तर आहेच, या वयात पण त्याने मेकप साठी तो तासन तास न कुरकुरता बसला, पण त्याच बरोबर त्या मेकप मन चे पण कौतुक करायलाच हवे.
मानसिक बेड्या

वैभव लक्ष्मी
मी नास्तिक नाही, पण जेंव्हा पासुन रामक्रिष्ण परमहंसांचं गॉस्पेल वाचलं तेंव्हा पासुन रिच्युअल्स बद्दल चं आकर्षण कमी झालंय हे अगदी खरं. प्रत्येक धार्मीक गोष्टी कडे किंवा कृती कडे उघड्या डॊळ्यांनी पहायची सवय लागलेली आहे. श्री रामकृष्ण परमहंसांनी आपल्या १०० वर्षांच्या वरच्या आयुष्यात मुस्लिम धर्म दोन वर्षं, ख्रिश्चन धर्म एक ते दिड वर्षं असे आणि उरलेला सगळा पिरियड हिंदु या तिन्ही धर्माचं पालन केलं होतं.
माझा या देवा,धर्मावर अभ्यास पण नाही. पण मला जे वाटतं ते लिहिणार आहे आज यावर..कोणाचाही उपमर्द करण्यासाठी हे लिहिलेलं नाही.
आपण जेंव्हा देव म्हणतो तेंव्हा देव प्रवृत्ती अपेक्षित असतात-माझं चांगलं चिंतणारा/ करणारा तो देव… देव म्हंटलं, की तो माझा सखा, वडील, बंधु सगळा कांही असतो, मग माझं सर्वस्व असलेला असा तो देव माझं वाईट कसं काय करु शकेल? जो चांगलं करतो तो देव आणि जो वाईट करतो तो दानव अशी सोपी व्याख्या केली जाउ शकते यांची.
आपण सत्यनारायणाची पुजा वगैरे करतो, तेंव्हा पुजा झाल्यानंतर भटजी बुव एक कथा सांगतात, की एका माणसाने पुजा केली, आणि त्यामुळे त्याचं खुप भलं झालं, पण नंतर दुसऱ्या वर्षी तो पूजा करायचं विसरला, आणि त्याचा सत्यानाश झाला.सगळे पैसे गेले, धंदा बुडला आणि तो देशोधडीला लागला, नंतर पुन्हा पुजा केल्यावर त्याचं सुख , पैसा त्याला परत मिळाला..
अशाच आशयाच्या दोन तिन कहाण्या सांगितल्या जातात. या कहाण्या केवळ पुजा करणाऱ्याचा ब्रेन वॉश करायचा म्हणुन वारंवार सांगितल्या जातात. मग होतं काय, की दुसऱ्या वर्षी जर काही वाईट घडलं, की ते आपण पुजा न केल्यामुळे घडलं असं वाट्तं आणि.आणि गिल्टी कॉन्शसमुळे तो माणुस पुजा करतोच.. उगिच विषाची परीक्षा कशाला घ्यायची म्हणुन…
देव जर माझं केवळ त्याची पुजा, किंवा ते व्रत केलं नाही, म्हणुन जर मला त्रास देणार असेल/ किंवा मला आयुष्यातुन उठवणार असेल , तर तो देवा कसा? देवा पेक्षा मला तो पुजेची खंडणी मागणारा “भाई” वाटेल . आपण म्हणतो नां.. की जो चांगलं करतो तो देव, आणि वाईट प्रवृत्ती असणारा तो दानव.. मग जर एखादी वाईट करणारी शक्ती असेल तर तिला देव कसं काय मानायचं हा प्रश्न नेहेमीच सतावतो मला..
माझं स्पष्ट मत आहे, की पुर्वीच्या ब्राह्मण समाजाने, सगळ्या समाजाला घाबरवुन ठेवलं होतं , कारण व्रत, वैकल्य लोकं करतिल तरंच यांचं पोट भरेल. म्हणुन तुम्ही ह्या सगळ्या कहाण्या तयार केल्या गेल्या असाव्यात. अर्थात, केवळ पुजा करणे हाच एक त्या काळी ब्राह्मणांचे उदरनिर्वाहाचं साधन होते. जर लोकांनी पुजाच केली नाही, तर त्या काळी ब्राह्मणांचा उदरनिर्वाह कसा काय झाला असता????
पण आजच्या परिस्थीतीमधे पण आपण त्याच त्या कथा मनोभावे हात जोडुन ऐकत बसतो.. !! केवळ सत्यनारायणाच्याच नाही तर जवळपास सगळ्याच पुजांचा शेवट अशाच प्रकारे कथा सांगुन केला जातो.मग घाबरुन का होईना, पण दर वर्षी एकदा तरी पुजा करतात लोकं.
माझा आक्षेप हा पुजा करण्यासाठी नाही.. तर, एखादी पुजा करायची असेल तर मानसिक शांती करता देवावर प्रम आहे म्हणुन प्रेमाने केली पाहिजे.. देव माझा सत्यानाश करेल/ मला त्रास देईल म्हणुन नाही. मला वाटतं आजच्या युगात इतकी समज आपल्या मधे असायला हरकत नाही.
आता हे कां आठवलं मला म्हणताय???? तर ऐका….हल्ली ते एक लक्ष्मी व्रत करण्याचं फॅड आलंय. दर गुरुवारी बायकोला शेजारी पाजारी हळदी कुंकु साठी बोलावणं असतं, आणि नंतर तिला एक लक्ष्मी व्रताच पुस्तक पण प्रेझेंट दिलं जातं.. आमच्या घरी अशी बरीच लक्ष्मी व्रताची बरीच पुस्तकं जमा झाली आहेत.
परवा, सहज त्या पैकी एक पुस्तक वाचलं, तर त्या मधे पण कथा अशी दिलेली आहे ,दर गुरुवारी पुजा करा, आणि संध्याकाळी सवाष्णींना बोलावुन हे पुस्तक भेट द्या- म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होइल, आणि “सो ऍंड सो” प्रकाशनाचे ओरिजीनल पुस्तकंच द्या, नाहीतर फळ मिळणार नाही.
इतके शिकले सवरलेले लोकं पण अशा फालतु गोष्टींना बळी पडुन कसलेही शेंडा ना बुडखा असे व्रत करतात हे पाहुन मला गम्मत वाटते. व्रत करणाऱ्या बायकांमधे सगळ्या उच्च विद्याविभुषित आहेत, एक तर चक्क डॉक्टरेट झालेली पण आहे. असो….
ही पुस्तकं… इतकी रद्दी घरी जमा होते.. त्या पुस्तकांवर लक्ष्मी , गणपतीचे चित्रं असल्याने फाडुन डस्ट बीन मधे पण फेकता येत नाहीत. .. काय करणार?? अहो किती रद्दी गोळा करायची?? शेवटी एक गठ्ठा बांधुन ठेवलाय. समुद्राचं पाणी दुषित करायला…… !!
आणि हे सगळं कोणी जाणुन बुजुन पण करित नाही.. तर परंपरेने चालत आलेलं आहे हे.. फक्त ह्या सगळ्या पुजा वगैरें अशा कां असाव्या म्हणुन कोणाच्या मनात कधी प्रश्न येत नाहीत.ही अशी पुस्तकं वाटुन जर कोणी श्रीमंत होणार असेल, तर तो पुस्तकं छापणारा पब्लिशर, प्रकाशक!!
स्वामी श्री रामक्रिष्ण परमहंस म्हणायचे, या रिच्युअल्स मधे गुंतुन पडाल तर भक्ती मार्ग विसराल.. आणि विनाकारण जी गोष्ट अजिबात महत्वाची नाही तिला महत्व देत बसाल..हिंदुंच्या बॆड्या आणि मुस्लिम लोकांच्या बेड्य़ांमधे एक फरक आहे, तो म्हणजे हिंदुंच्या पंडीत लोकांच्या ब्रेन वॉश मुळे कोणी कॊणाचे खुन, आत्मघाती हल्ले केले जात नाहीत …या धर्माच्या बेड्यांचा उपयोग हा पुर्वी पासुन समाजाला एकत्रित करण्यासाठी करण्यात आलेला आहे. कितिही धनदांडगा असो, की बाहुबली असो, तो धर्मासमोर वाकतोच.. आणि हीच एक गोष्ट अशी आहे की जी समाजामधे सेल्फ डिसिप्लिन आणु शकते.थोडा दुरुपयोग स्वतःच्या फायद्यासाठी जरी असला, तरीही तो क्षम्य आहे असे मला वाटते..
वंदे मातरम..

वंदे मातरम
मुस्लीमांनी वंदे मातरम या गीताचे गायन करु नये.. असा फतवा पुन्हा एकदा ताजा करण्यात आला. या फतव्या मागचं बेसिकंच चुकीचे आहे असं मला वाटतं..
ह्यांचं म्हणणं असं आहे की मुस्लिम लोकं देशासाठी जिवन दान देतिल.. ( या बाबतित कांहीच संशय नाही , माझ्या मनात तरी ) पण वंदे मातरम म्हणणार नाहित , कारण त्या धर्मात परवरदिगार सोडुन इतर कोणालाही वंदन करणे हे इस्लाम च्या विरुध्द आहे .
कुठल्याही धर्माचा मी अभ्यास केलेला नाही, म्हणुन मी स्वतः या विषयावर लिहायचे टाळतो..पण जेवढं वाचलंय त्यावर माझी स्वतःची काही मतं आहेत.
हे मुस्लिम लोक हांजी अली किंवा तत्सम दर्ग्या वर जाउन चादर चढवतात. प्रेअर करतात….. म्हणतात मेरे गरीब नवाज मुझे बचाओ .. वगैरे वगैरे… अफजल खानाच्या कबरीवर जाउन प्रेअर करतात.. फुलाच्या हाराची गुंफलेली चादर पण त्या थडग्यावर चढवतात. थोडक्यात त्या थडग्यालाच देव मानुन पुजा करतात , त्या कबरीची ऑलमोस्ट पुजा करतात.. अपल्या घरामधे देव्हारा बनवुन तिथेहे काबा , मक्का चा फोटो लावतात, कुराणातली आयतं फ्रेम करुन लावतात आणि त्याची पुजा करतात बऱ्याच ठिकाणी पाहिलंय की त्या फोटोला हार नाही फुलांची चादर बांधतात– हे सगळं चालतं?? हे सगळं इस्लाम ला मान्य आहे?? अर्थात नाही.. पण हे सगळं करतातंच ना?
इथे इस्लाम खतरेमे है म्हंटलं की झालं.. आणि जर एखाद्या (सुशिक्षित) मुस्लीम सुधारमत वाद्यानी त्यांच्या विरुध्द कांही बोललं की मग त्याला सरळ काफीर ठरवुन त्याची निंदा नालस्ती करायची. तसंही या समाजात बरेच लोकं अशिक्षीत आहेत- माफ करा… असं म्हणण्यापेक्षा, या समाजात जास्त शिक्षीत लोकं नाहीत, हे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
धर्मा बद्दलचं ज्ञान हे फार कमी लोकांना पुस्तकाद्वारे ( कुराण शरीफ ) मिळालेले नाही, तर मुल्ला मौलवी यांच्या कडुन ऐकीव स्वरुपात मिळालेले असतं . त्या मुळे बऱ्याच गोष्टी या विकृत स्वरुपात माहीती होतात. अर्ध्याहुन जास्त लोकांना अरेबिक येत नाही. मग त्या आयतांचा अर्थ कसा कळणार?
मुल्ला मौलवी कुराणातल्या आयतांचा आपल्या स्वार्थाप्रमाणे अर्थ लावुन सामान्य लोकांना मिसगाईड करतात , असे माझा एक मुस्लिम मित्र सांगतो.त्यांच्या फायद्याचे सगळे कुराणेशरीफ मधे दिलेले आहे असं म्हंटलं की झालं.. सगळे लोकं भेड चाल प्रमाणे फॉलो करतात. इस्लाम मधे सांगितलेलं नाही –तरी पण चादर फिरवली जाते, पैसा जमा केला जातो मजार मधे,आपल्या कडे आरती मधे करतो तसा… असो…
उपरवालेकी मारसे बचॊ.. असं म्हणुन सगळ्यांना घाबरवलं जातं.. वरच्याला घाबरा असं सांगायचं ,आणि मग ते मौलवी लोकं त्यांना पाहिजे तसं तुमच्या कडुन करुन घेतात . पण दुर्दैवाने आज सुशिक्षीत मुस्लीम्स फार कमी असल्यामुळे त्याच फावतं
आमचा एक ड्रायव्हर होता, त्याला होती ९ मुलं, म्हट्लं, अरे इतक्या महागाईच्या दिवसात इतकी जास्त मुलं कशाला? तर म्हणे, साब, तुम्हारी कार का पंचर निकालने, स्टार्टर डायनामो रिपेर करने, और सर्व्हिस करने मेकॅनिक कहांसे मिलेंगे अगर हमे इतने बच्चे नही होंगे तो.. आता, यातला विनोदाचा भाग सोडा, पण वस्तुस्थिती तशिच आहे..
सगळ्यात शेवटी.. एकच सांगतो, जर वंदेमातरम म्हणणं इस्लामच्या खिलाफ आहे, तर मग सगळ्या मजारी असणं पण इस्लामच्या खिलाफ आहेत.. तिथे जाउन प्रेअर करणं पण इस्लामला मान्य नाही… ते सगळं पण लवकरंच बंद करा.. म्हणाव.. !!
मुस्लिम मुल्ला लोकं पैसे घेउन फतवे कसे काढतात, ते पुर्वी एकदा टिव्ही वर स्टिंग ऑपरेशन मधे दाखवलं होतं.म्हणुन वंदे मातरम म्हणुन नका हा फतवा एखाद्या मुस्लिम नेत्याच्या दबावाखाली पोलिटीकल इशु असावा म्हणुन, काढला असण्याची मला तरी जास्त शक्यता वाटते..
आपल्या हिंदु धर्मातही कांही फारशी वेगळी परिस्थिती नाही.. त्या बद्दल उद्याचं पोस्टं. कारण हे आजचं पोस्ट खुप मोठं झालंय..
जुने फोटो…
इ.सन. १९३० ते १९४० …त्या काळी फोटो काढणं म्हणजे एक खुप कांहीतरी महत्वाचं, आणि सामान्यांच्या आवाक्या बाहेरचं काम होतं. फोटो काढणे हे फक्त गर्भ श्रीमंत किंवा मोठ्या हुद्यावर असलेल्यांचीच मक्तेदारी असायची.
माझ्या काकाच्या घरी ब्लॅक ऍंड व्हाइट काढलेले ते जुने फोटो ग्राफ्स जेंव्हा एका जुन्या पेटी मधे सापडले तेंव्हा , चक्क एक खजीना हाती लागला असे वाटले आणि ते फोटो सगळ्यांनी मिळुन पहातांना पण खुप मजा वाटली. बऱ्याच लोकांना आम्ही ओळखत नव्हतो, मग काका सांगायचे, हा बाळ भोंदु , हा सुरेश भट, वगैरे वगैरे..
प्रत्येक फोटो ची एक कहाणी आहे. वडिलांनां/काकांना विचारले तर त्यांनी बर्याच जुन्या फोटो मधल्या लोकां बद्दल .माहिती दिली. बरेच लोकं तर काळाच्या ओघात या जगात पण राहिलेले नाहीत. पण फोटो च्या स्वरुपातल्या आठवणी आहेत.
हल्ली मोबाइल कॅमेरामुळे फोटो काढणं जरी सोप्पं झालं असलं तरीही जुन्या फोटो ची मजा काही औरच आहे.हल्ली केंव्हाही, आणि कधीही कॅमेरा हातात असल्यामुळे सारखं उठ सुट फोटो काढणं सुरु असतं, कुठल्याही फोटो स्टुडिओ मधे गेलं की हवी असल्यास याची प्रिंट पण घेता येते चार रुपयात..
……….पण हे जे जुने फोटो आहेत त्यांची गम्मत वेगळीच .ह्या जुन्या फोटो मधे त्या काळच्या फॅशन्स, किंवा रहाणी मानाचं प्रतिबिंब दिसुन येतं. इथे कांही सिलेक्टीव्ह फोटो पोस्ट करतोय.. फोटोंचा काळ आहे १९२५ ते १९७० पर्यंतचा.
आमच्या घरी एक मेड इन इंग्लंड कॅमेरा होता. त्या मधे २० एम एम ची फिल्म बसायची. त्या फिल्म ला कॅमेऱ्यामधे बसवणं पण एक कला होती. मला आठवतं की त्या कॅमेऱ्यात फिल्म बसवतांना नेहेमी दोन तिन स्नॅप्स खराब व्हायचे. पण नंतर येणारे जे फोटो असायचे ते मात्र अप्रतीम किंवा अगदी पुर्णपणे फेल्युअर.. म्हणजे असं, की चांगले फोटो काढले तर ती तुमचं कौशल्य, आणि बिघडवले, तर त्याचा अर्थ की तुम्हाला फोटो काढता आला नाही.त्या कॅमेऱ्यात अपार्चर, आणि फोकस सेट करावा लागायचा. एक जरी चुक झाली की फोटो बिघडला.
बऱ्याच लोकांच्या ऍगफा आयसोली नावाच एक प्रिमिट्व्ह कॅमेरा असायचा. त्याने फोटो काढणे पण एक कलाच होती.

हा माझ्या वडिलांचा फोटो.. ते जेंव्हा पाच वर्षाचे होते तेंव्हा म्हणजे साधारण ७९ वर्षापुर्वीचा फोटो आहे हा. हा फोटो घराच्या पडवीत ( ओसरी मधे) काढलेला आहे. मागचा तट्टा दिसु नये म्हाणुन एक गालिचा मागे लावलेला दिसतो. पण जर तो मागचा तट्टाच असु दिला असता तर फोटॊ नक्कीच जास्त छान आला असता.शर्ट तर ठीक आहे, पण कोटाच्या बाह्या लहान झालेल्या दिसताहेत. पायातले बुट पहा.. म्हणजे ७० -७५ वर्षापुर्वी ची फॅशन असावी ती.अंगामधे वुलनचा कोट आणि पॅंट आहे. हे म्हणजे सुखवस्तु पणाचं लक्षण मानलं जायचं.

हा फोटो सौ. आणि तिचे दोन भाउ यांचा. साधारण १९६९ सालचा असावा. तिघंही बघा ह्या फोटो मधे कसे नॅचरल पोझ देउन बसले आहेत ते.

हा फोटो आहे माझ्या आजोबांचा , इंदौरच्या विल्सन कॉलेजातुन ( बहुतेक नांव बरोबरच असावं) ग्रॅजुएशन पुर्ण केलं तेंव्हाचा-त्यांच्या बरोबर शिकलेल्या मित्रांच्या बरोबर काढलेला आहे हा... १९२२ सालचा.धोतर, बुट, कोट टोपी.. त्या काळच्या कॉलेज कुमारांचे परिधान..

आजोबा तहसिलदार होते, त्यांचे कोणितरी फिरंगी बॉस.. आज्जी ने नांव सांगितलं होतं, पण विसरलो. फोटो आहे खांडव्याचा..

या फोटो मधे आहे मी, स्वामी राजरत्नानंद या नावाने जो कॉमेंट्स टाकतो नां तो आर्किटेक्ट राजीव.. आणि माझी आत्या.
त्या काळी पाचवार साडी नेसणं, आणि स्नो पावडर लावणं म्हणजे खुप फॅशन करणं असा अर्थ होता. कुटिकुरा मलम ( कुटिकुराचं फेस क्रीम मिळायचं असं आज्जी सांगायची आणी त्या क्रिम ला मलम म्हणायचे ) आणि कुटीकुरा पावडर म्हणजे एकदम हाय क्लास प्रॉडक्ट्स..

आजोबांनी तेंव्हा मोटर घेतली होती. (तीला आज्जी मोटरंच म्हणायची) ऑस्टिन मायनर आणि आत्या . १९४०-४५ सालचा फोटो असावा हा.

आजी -आजोबा १९२३

अजुन एक जुना फोटो..माझे काका आणि आत्या..
त्या काळी कार म्हणजे एक अल्टीमेट लक्झुरी समजली जायची. नविन कार घेतल्यावर सिट कव्हर नव्हते म्हणुन गालीचाचे तुकडे करुन ते बसायला वापरले होते, असे आज्जी सांगायची.

मोटर घेतली तेंव्हा ती एक नव्हाळी होती. कार नविनच आली होती .फक्त पार्शी लोकंच कार घ्यायचे.. आणि भारतीय +मराठी माणुस कार घेतो, म्हणजे एक मोठी गोष्टं, म्हणुन कार च्या बरोबर बरेच फोटो आहेत काढलेले.
या सगळ्यांच्या कपड्यांवर मास्टर भगवानचा ठ्प्पा दिसतो की नाही?? तेंव्हा पायजामा जस्ट फॅशन मधे आलेला असावा. पॅंट कोट वगैरे पण होतेच.. पण ते उच्च पदस्थांसाठी. इतर सामान्य लोकं पायजामा शर्ट, किंवा धोतर वापरायचे.

काका, वडिल आणि त्यांची मित्र मंडळी.. कपडे बघा कसे आहेत ते.. त्या काळी धोतर नेसणे बंद करुन पायजामा वगैरे वापरणे जस्ट सुरु झाले होते...

सौ. लहानपणीचा फोटो

हा मी, एकदा ट्रेकींग हुन परत येतांना बस बंद पडली होती , तेंव्हा एका मित्राने क्लिक केला . मी सिगरेट ओढत नाही बरं का आता..हा फोटो आहे २५ वर्षापुर्वीचा..
त्या वेळेस जस्सी जैसी हे सिरियल खुप पॉप्युलर होतं. त्यामुळे बाहुलीचं नांव होतं जस्सी, आणि तो बाहुला अरमान. बहिणीकडे तिसऱ्या मजल्याचं बांधकाम सुरु होतं, म्हणुन तिथे भिंतीवर रंगवणं जस्सी वेड्स अरमान वगैरे. खुप काही केलं होतं मुलींनी.. त्याच सुमारास वडिलांची ७५वी झाली होती, म्हणुन सगळी मोठी माणसं पण होती या लग्नाला.

बाहुलीचं लग्नं झाल्यानंतर दोन्ही विहीणी केक कापतांना..लग्नं तर झालं.पण नंतर झालेली भांडणं पण खुप आठवणीत आहेत.बाहुलीचं लग्नं झालं, आता तीला इथेच ठेउन जा म्हणुन..
असे कमीत कमी १०० च्या वर फोटो सापडले आहेत. मस्त खजीना आहे . तुमच्याही घरी असेल. शोधा..आणखिनही असे बरेच फोटो आहेत, हे असे जुने फोटो सापडले की मग ते पहातांना वेळ कसा जातो तेच समजत नाही. इट्स फन…
चावट -वात्रट आणि आवाज.
ह्या दोन शब्दांमधे किती अंतर आहे? तसं म्हंटलं तर खुप आहे, किंवा अजिबात नाही म्हंट्लं तरीही चालेल. हे दोन शब्द मनातल्या मनात नेहेमीच फुगडी खेळत असतात. आता फुगडी या साठी म्हणतो, कारण हे दोन्ही शब्द नेहेमी मुलीच वापरतात.बरं ह्या दोन शब्दांमधे साम्य कुठलं?? तर हे शब्द नेहेमीच मेलेले असतात.. म्हणजे जसे.चावट मेले, किंवा वात्रट मेले..
लग्नाआधी जेंव्हा लग्न ठरलं असतं किंवा ठरण्याच्या बेतात असतं, तेंव्हा तुम्ही कांहीही करायचा प्रयत्न केला, किंवा थोडा पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला की, “च्च्यल्ल, उग्गिच चावटपणा करु नकोस..” असं म्हणणारी , जेंव्हा ह्या चावट्ट शब्दावरुन जेंव्हा आता बस्स!! वात्रटपणा पुरे…. अशा वाक्यावर घसरते तेंव्हा लग्नाला कांही वर्षं झाले असे समजायला हरकत नाही.
बरं गम्मत अशी की ह्या दोन्ही शब्दांचे डिक्शनरीत दिलेले अर्थ.. सहज गम्मत म्हणुन पाहिले आज, तर काय असावेत?
चावट = ईन्डिसेंट, ऑब्सेन, व्हल्गर,रुड, क्रूड, डर्टी, ग्रॉस, इम्प्रॉपर.. असे आहेत.. इतका रोमॅंटिक शब्दं आणि त्याचे असे अर्थ?? बहुत ना इन्साफी है ये..
बरं वात्रट= मिस्चिव्हस..
म्हणजे बघा, लग्ना पुर्वी जो चावट असतो तो लग्नानंतर वात्रट होतो.. गम्मत आहे की नाही??मला वाटतं की मुलींना या शब्दांचा नेमका अर्थ माहिती नाही, म्हणुन लग्ना पुर्वी चावट आणि लग्ना नंतर वात्रट शब्द वापरतात मुली ..
हे दोन शब्द आज कां आठवले?? दर वर्षी दिवाळी आली की लहानपणी मुलांचे मासिक, किंवा फुलबाग ( निटसं नांव आठवत नाही, पण या मासिकात सगळे रंगित प्रिंटींग असायचं, गुलाबी, निळा ,हिरवा फॉंट वापरुन ) आणि चांदोबा चा दिवाळी अंक कधी येतो याची वाट पहायचो, पण थोडं मोठं झाल्यावर या मासिकांच्या ऐवजी ’आवाज’ ची वाट पाहु लागलो.
’आवाज’ !! पाटकरांचा आवाज.. वात्रट वार्षीक आवाज!! बस्स! एकच शब्द आठवतो आवाज म्हंटलं की- वात्रट पणाचा कळस असलेलं वार्षीक !! चावटपणा, वात्रटपणा आणि अश्लिल पणा.. या मधे एक लहानशी अस्पष्टं रेषा असते. आज पर्यंत आवाज च्या प्रत्येक अंकामधे ती रेषा कधिही ओलांडल्या गेली नव्हती. आवाज चा वात्रटपणा हवा हवासा वाटायचा. आवाज चा अंक आला की तो वाचुन पुर्ण झाल्याशिवाय खाली ठेवला जात नव्हता.
दिवाळी मधे फराळासोबत मनाला, गुदगुल्या करणारा, थोडा वात्रट थोडा चावट असलेला आवाज चा अंक असल्याशिवाय दिवाळी आहे असं वाटायचंच नाही.
पण…. आज जेंव्हा या वर्षीचं आवाज आणलं लायब्ररीतुन.. तेंव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आवाज च्या अंकामधे काय आणि किती लिहायचं, कुठपर्यंत ताणायचं, याचं तारतम्य न बाळगल्या मुळे आवाज चा यंदाचा अंक अतिशय अश्लिल झालाय. लहानसे जोक्स पण अश्लिलते कडे झुकणारे वाटले. मला थोडं फार चावट वगैरे वाचायला अजुनही आवडतं..
(कन्फेशन म्हणा हवं तर) पण अश्लिल आवडतं नाही..
आवाज च्या ’खिडक्या’ ज्या पहातांना थोडी हुर हुर वाटायची-की काय असेल बॉ आतमधे??.. ती आता अश्लिल पणा कडे झुकल्या मुळे निराशा झाली. इतकी की घरी आणलेलं मासिक मुलिंच्या हातात पडु नये म्हणुन कपाटात ठेवावं कां ? असंही वाटंत होतं.
बरं विनोदी कथा वगैरे म्हणाव्या, तर सगळ्या कथा, अगदी प्रतिथयश लेखकांच्या पण एकदम रटाळ आहेत. एकंदरीत काय.. तर पाटकर गेल्या पासुन ’आवाज’ बसलाय… पार बोऱ्या वाजलाय आवाजाचा…पुढल्यावर्षी पासुन आवाज वाचणे बंद!!
पोस्ट नंबर ३००…………
वर्ड प्रेस मधे ही सोय आहे..
तुमच्या ब्लॉग ला आज किती लोकांनी भेट दिली, कुठले लेख वाचले, कुठुन हे सगळे लोकं आलेत? हे सगळं समजतं….काल सहज स्टॅटस्टीक पहातांना सहज लक्ष गेलं आणि लक्षात आलं, की अरे… आज जे पोस्ट असेल ते असेल ३०० वं पोस्ट.. १७ जानेवारी २००९ला हा ब्लॉग सुरु केला आणि आज नोव्हेंबर १ ला ९ महिने १३ दिवस पुर्ण झाले आहेत. १७ जानेवारीचं पोस्ट हे जस्ट इंट्रोडक्ट्री पोस्ट होतं. त्या मधे हा ब्लॉग कां सुरु करतोय हे लिहिलं होतं..
माझा एक मित्र होता ऑर्कुटवर, त्याचा ब्लॉग होता, पुलं प्रेम म्हणुन. त्याचा ब्लॉग पाहुन असं वाटलं की आपणही मंगेश पाडगांवकरांचा ब्लॉग सुरु करावा. म्हणुन एक पाडगांवकरांचा ब्लॉग आणि एक हा ब्लॉग सुरु केला. कालांतराने लक्षात आलं की पाडगांवकरांच्या कवितांचं कॉपी राईट चं आपण उल्लंघन करतोय, म्हणुन तो ब्लॉग डिलीट करुन टाकला. आणि केवळ हा ” काय वाटेल ते” सुरु ठेवला, आपले अनुभव, मनातले विचार लिहायला.
पहिल्या दिवशी ब्लॉग वर लिहिल्या नंतर दुसऱ्या लगेच पुढचं पोस्टं काय असावं म्हणुन विचार करु लागलो,तेंव्हा मी ग्वालिअर ला होतो, नंतर ठरवलं की अगदी जे कांही मनात येईल ते लिहायचं, आणि दुसरं पोस्ट पण लिहुन झालं.पोस्ट केल्यानंतर वाटलं की ते डिलिट करुन टाकावं.. पण नाही केलं.या पोस्ट वर पण एकही कॉमेंट नव्हती.
पहिली कॉमेंट या ब्लॉग वरची होती तिसऱ्या पोस्ट ला..पहिली कॉमेंट होती भुंगा ची,
. तेंव्हा भुंगा इंग्लंडला होता.ती कॉमेंट वाचली, आणि बरं वाटलं.. आपणही लिहू शकतो हे लक्षात आलं, आणि जे कांही लिहिलंय ते वाचलं जातंय ही भावना पण खुप मनाला समाधान देउन गेली.
तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि उत्साहवर्धक प्रतिक्रियांमुळेच इथपर्यंतचा प्रवास शक्य झाला, अर्थात, पुढे पण तुमची सगळ्यांची साथ राहिलंच..
मनःपुर्वक आभार…
Blog Stats Summary Tables
Total views: 73,859
Busiest day: 662 — Tuesday, September 1, 2009
आज झालेली अवलोकने: 60
बेरजा
Posts: 299
प्रतिक्रिया: 2,800
Categories: 24
Tags: 474
असे निरनिराळ्या विषयांवरचे २९९ लेख लिहुन झाले आहेत, हे लक्षात आल्यावर, मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. नंतर जुने लेख वाचुन काढले कांही.. आर्चिव्ह मधे जाउन.. आणि लक्षात आलं की अनुदिनी लिहिणं सुरु केल्यापासुन माझे मराठी बरेच सुधरले आहे. इंग्रजी शब्दांचा वापर खुप कमी झालाय आधी पेक्षा….
असो.. कांही तरी तर फायदा आहे ब्लॉगिंग चा. पुन्हा एकदा, तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार मानुन हे पोस्ट इथेच संपवतोय..
साहेबांकडुन कान उघाडणी..
अरे…. दादु.. काय रे.. तु तो ब्लॉग वाचलास वाटतं – काय वाटेल ते?? नाही, महेंद्रने सुचवल्या प्रमाणेच वागणं सुरु केलंस म्हणुन म्हंट्ल.तो मराठी पाट्यांचा मुद्दा आता तु वर तर घेतला आहेस.. पण ते कोण टिकोजी राव आहेत ते कोर्टात जायचं म्हणताहेत. अरे आमच्याच महाराष्ट्रात हे असे मराठी पाट्या लावणार नाहीत म्हणुन कोर्टात जातात . लवकर ऍक्शन घेतली नाही तर मात्र सेशन कोर्ट, हाय कोर्ट ते सुप्रिम कोर्ट हा सगळा प्रवास होईपर्यंत तुला पण म्हातारपण येईल, आणि मुंबईतल्या पाट्या तशाच रहातील इंग्लिश मधे.. … अशा लोकांना कोर्टापेक्षा सेनेची भाषा जास्त कळेल..
मला तर वाटतं तु तिथे पाठवावित पोरं, त्यांना ’शिकवायला’ म्हणजे ते मान्य करतील .एक धमकी पुरेशी आहे रे.. एक धमकी दे फक्त, एक पत्रकार परिषद आणि बस्स!! बघ कसं पटकन काम होतं ते…आपली पोरं तिकडे गेलीत नां की सगळ्य़ा पाट्या होतील इंग्लिश मधे.. आपोआप.. “पेंडींग पिटिशन इन द कोर्ट”!
आणि हो, त्या नगरसेवकांनी हे काय नविन फॅड काढलंय?? आता म्हणे ते पार्किंगचे रेट्स वाढवणार आहेत म्हणे ५ ते १० रुपयांनी. हे असे निर्णय कसे काय घेउ शकतात रे तुझे नगर सेवक?? यावर पुन्हा अशीही मखलाशी केली जाते आहे की हे “ठेकेदार” लोकं स्थानिक लोकांना ( मराठी नाही….. स्थानिक ??) तिथे पार्किंग लॉट मधे कामाला ठेवतिल. आणि त्या साठी ५-१० रुपयांची भाव वाढ.. अरे इतके का षंढ झाले आहेत तुझे लोकं? की त्या ठेकेदाराच्या कानाखाली दोन वाजवुन मराठी पोरांना कामावर लाउ शकत नाही?? त्या साठी ते ठेकेदार तुमच्या कडुन पैसे जास्तिचे घेणार..
बरं आता थोडा हिशोब, आता, असं बघ, फोर्ट ला काळा घोडा जवळचा पार्किंग लॉट.. त्या पार्किंग मधे साधारणपणे दररोज कमित कमी १००० वाहनं उभी केली जातात.. हा अगदी ढोबळ मानाने अंदाज आहे. म्हणजे त्या ठेकेदाराला रोजचे कमित कमी ५-१० हजार जास्तीचं उत्पन्न ठेकेदाराला दररोज …..असे १५० लॉट्स आहेत, म्हणजे रोजच १.५लक्ष रुपये जास्त मिळतिल त्या ..
सरळ सरळ दिसतंय की इथे कुठल्यातरी नगरसेवकाचे हात ओले केले जात आहेत ते.. अरे इथेच तर तुझं लक्षं असलं पाहिजे.. कार्याध्यक्ष म्हणुन.. ह्यांचा हा कावा कळला नाही का तुला?? अरे किती हा साधे पणा तुझा?? तुला असं वाटतं कां की मराठी माणसं मुर्ख आहेत म्हणुन?? हे जर असंच सुरु राहिलं तर पुढल्या वेळी आहे तितके पण नगरसेवक निवडुन येणार नाहित याची खात्री ……हरे राम.. हरे राम…













कॉमेंट्स