३६० -रुबिक स्फिअर
प्राध्यापक एर्नॊ रुबिक.. रुबिक क्युबचा जनक. या रुबिक क्युब ने मला एकेकाळी वेड लावलं होतं. अगदी सारखा क्युबशी खेळत बसायचो. बराच प्रयत्न करुनही एकदाही हा क्युब सॉल्व्ह करता आला नाही. माझे काही मित्र पण ट्राय करित होतेच. तेंव्हा इंटरनेट नव्हतं .. त्यामुळे फक्त पुस्तकांवरच सगळी मदार असायची. एक दिवस एका मित्राच्या मोठ्या भावाने इंग्लंडहुन एक पुस्तक आणलं होतं की रुबिक क्युब कसा सोडवायचा ते. ते पुस्तक वाचुन एकदाचा क्युब सोडवायला शिकलॊ रुबिज क्युब कसा सोडवायचा ते. साधारण पणे दोन मिनिटं लागायची, पुर्ण क्युब सोडवायला. हा क्युब कसा सोड्वायचा इथे दिलंय..
या क्युब मधे पण नंतर बऱ्याच व्हेरिएशन करुन चार बाय चार चे, किंवा ५बाय ५ , ६ बाय ६ चे क्युब्ज पण मार्केटला आलेत. २००८ च्या वर्ल्ड रुबिज क्युब सॉल्व्हिंग कॉंपिटिशनमधे अवध्या ७.०८ सेकंदामधे क्युब सोड्वुन एरिक नावाच्या झेक नागरिकाने पहिला नंबर पटकावला.
.
रुबिक क्युब हाताळलेला नाही असा माणुस विरळाच. तरी पण बराच प्रयत्न करुनही सोड्वता आला नाही की मग आलेलं फ्रस्ट्रेशन.. आणि चिड चिड.. ही प्रत्येकानेच अनुभवली असावी. नेटवर पण बरंच काही आहे या क्युबला सोड्वण्याबद्दल.
जगात अशिही काही लोकं आहेत , की एकदा क्युबचे सगळ्या रंगाची पोझिशन्स पाहिली की मग डॊळे बांधुन क्युब सोडवु शकतात. अशा बऱ्याच प्रकारच्या कॉंपिटीशन्स पण जगभर होतात. यात नंतर स्फिअर्स, कोन, आणि बरेच प्रकार आलेत पण क्युब इतकी पॉप्युलरीटी कोणालाच मिळाली नाही.

१९७५ साली हा क्युब लॉंच केला गेला आणि आज पर्यंत त्याच्या ऑथोराइझ्ड ३५० मिलियन कॉपिज सेल झालाय.त्या नंतर मग ३३ वर्षांनी , वयाच्या चौसष्टाव्या वर्षीया हंगेरियन प्रोफेसरने हे नविन पझल ( म्हणण्यापेक्षा ऍप्रोप्रिएट वर्ड आहे ब्रेन टिझर ) डिझाइन केले आहे. दोन दिवसात हा साधारणपणे त्याच तत्वावर आधिरित ’३६०’ नावाचा एक नविन खेळ लॉंच करणार आहे.

हे ३६० म्हणजे एक प्लास्टीक बॉल असेल , की ज्या मधे सहा वेगवेगळ्या रंगाचे बॉल्स असतिल प्लेअरने आतल्या स्फिअरच्या सरकम्फरन्सवरचे बॉल्स त्या रिस्पेक्टीव्ह त्याच रंगाच्या खाचेत घालायचे. यासाठी बॉल शेक करा, आणि असलेल्या दोन होल्स मधुन ते बॉल्स डिझायर्ड लोकेशन ला बसवायचे.. प्रिन्सिपल हे रुबीज क्युबचेच आहे. मला असं वाटतं याचं नावं काहिही जरी ठेवलं तरिही रुबिक स्फिअर हेच बहुतेक पॉप्युलर होइल. दिसायला अतिशय सोपा असलेला हा खेळ अतिशय कठिण आहे, पण एकदम मस्त आहे. वाट पहातोय या नविन गेमची कधी लॉंच होतो ते….


शाळेत असताना नेहमी खेळायचो आम्ही क्युबशी.कधी कधी चालू तासाला सुद्धा आम्ही हा पराक्रम करण्यात गुंग असायचो.
देवेंद्र
खरंच ते दिवस मस्त होते. लहान पण संपल्याची जाणिव होते असं काही वाचलं की.
रुबिक क्युब पाहिला की फक्त तो न सोडवता आल्याचं फ्रस्टेशन आठवतं!
आता ट्राय करा. ईंटरनेटवर बरेच यु ट्य़ुब व्हिडीओज पण आहेत यावर.
जमेल!
अरे दादा … ह्या ‘रुबिक क्युब’मुळे मला घरी फटके आणि शाळेत शिक्षा झालेली आहे. आज ही पोस्ट वाचून एकदम जुने दिवस आठवले रे …
सोडवायचो तेंव्हा माहीत पण नव्हते याला ‘रुबिक क्युब’ म्हणतात ते…
बरं आपल्या मुंबई मध्ये एक लहान मुलगा आहे त्याने डोळे बंद करून ‘रुबिक क्युब’ काही सेकंदमध्ये सोडवायचा रिकॉर्ड केलेला आहे…
रोहन
इतके खेळ निघाले , पण ३५ वर्षांनंतर पण अजुनही आपली पॉप्य़ुलरिटी टीकवुन ठेवणारा हा एकच खेळ- पझल..
मला जमायला ( अर्थात पुस्तकात वाचुन ) १५ दिवस लागले होते.
खुपच छान माहिती आहे…
एकदम मस्त टाईमपास आहे हा. सगळे रंग जमविणे अजूनही जमलेले नाही पण प्रयत्न सुरू आहेत…:)
नेट वर आहे ना युट्युब मधे पण आहे कसं सोडवायचं ते.. जमेल .. नक्कीच जमेल….Best Wishes…