मी आकाश कंदिल बनवतो, त्याची गोष्टं..

गेली कित्येक वर्ष झाली , घरी मुलींना सांगत असतो की लहान असतांना आम्ही कसे आकाकंदील बनवायचो… आणि कसा जास्तीत जास्त उंच लावायचा प्रयत्न करायचो ते. आमचं घर दोन मजली होतं. वरच्या मजल्यावर उंच बांबू लावून त्यावर आकाकंदील लावला जायचा.

लग्न झाल्या पासून किंवा मुली झाल्या नंतर  त्यांच्या समोर  मात्र कधीच आकाकंदील बनवला नव्हता. दर वर्षी असं जरुर वाटायचं की या वर्षी नक्की बनवु म्हणून.. पण   बांबूच्या काड्या न मिळाल्यामुळे राहुन जायचं. गेल्या विस पंचविस वर्षापासून  आकाकंदील आमच्या घरी लागायचा, पण विकतचा.. ! आजकाल तर त्यांना माझं सांगणं खोटं वाटायला लागलं होतं. म्हणून या वर्षी तरी आकाकंदील काहीही झालं तरीही घरीच बनवायचा हे पक्कं ठरवलं होतं… 🙂

सौ. म्हणते पूर्वीच्या काळी मुलांना बिझी ठेवायला म्हणून आई वडील  आकाकंदील घरी करायला लावायचे. काल आकाकंदील बनवायला घेतला तर, मी पण पहा ना दिवस भर नेटवर बसलो नव्हतो आकाकंदील करायचा म्हणुन. म्हणजेच सौ. च्या कॉमेंट मधे तथ्य आहेच  काहीतरी.. असो..जरी ते खरं असलं तरी मान्य न करणं आपल्या हातातच आहे नां?? 🙂

या वेळी मात्र ठरवून टाकलं की आकाकंदील नक्कीच करायचा.. अगदी काही झालं तरीही….. या वर्षी घरी केलेला आकाकंदीलच लावायचा! अजुनही आठवलं की कसं मस्त वाटतं. आजची पोस्ट आहे आकाकंदिलावरची.

बाजारात कितीही आकाकंदील विकत मिळत असले तरीही घरच्या आकाकंदीलाची त्याला सर येत नाही. आकाकंदील करायचा म्हणजे त्याची तयारी आधी पासुन सुरु करावी लागते. सगळ्यात आधी आवश्यकता असते ती एका बांबूच्या काड्यांची. जर बांबू पुर्ण पणे सुकलेला असेल तर त्याला तासून त्याच्या लहान लहान काड्या बनवणे जमत नाही. त्या साठी त्या बांबूला पाण्याच्या पिंपात रात्रभर बुडवून ठेवावा लागायचा. थोडा भिजला की मग त्याचे हवे तसे तुकडे करता येतात.बांबू तासायला म्हणून कुऱ्हाडीला खूप धार करावी लागायची.

इथे मुंबईला आकाकंदील बनवायचा तर बांबू आणणार तरी कुठुन?? मिलियन डॉलर प्रश्न?? शेवटी किचनमधल्या कोपऱ्या मधे असलेली केरसुणी (आका झाडू, कुंचा किंवा तुम्ही त्याला जे काय म्हणता ते) दिसली. तिकडे नजर गेली आणि सौ. ला पुर्ण कल्पना होतीच की मी आता काय करणार. पण त्यावर काहीही कॉमेंट द्यायचे तिने टाळले.

केरसुणीच्या मधे पॅकिंग करता वापरलेल्या बांबुच्या काड्या..

केरसुणीच्या मधे पॅकिंग करता वापरलेल्या बांबुच्या काड्या..

तो कुंचा घेउन बाल्कनीमधे गेलो, आणि सगळं बांधलेला प्लास्टिकचा दोर सुटा केला. त्या  केरसूणीच्या मधे काही बांबूच्या काड्या होत्या त्या काढून घेतल्या. एका केरसूणीच्या मधे ७ काड्या मिळाल्या, मला हव्या होत्या १४ काड्या. म्हणून दुसऱ्या केरसुणीची पण वाट लावली. नंतर साळसूद पणे दोन्ही केरसुण्या एकत्र करुन एक नवीन केरसुणी बनवून बांधून ठेवली, आणि वर पुन्हा सौ. ला हे पण सांगितलं की बघ, आधीपेक्षा पण चांगली करुन ठेवली आहे …  🙂

धाकटी मुलगी सारखी आता तुम्ही काय करताय? किंवा आता तुम्ही काय करणार? या काड्यांचा आकाकंदिल कसा काय तयार होईल? असे असंख्य प्रश्न विचारुन भंडाउन सोडत होती.

लहानपणी सुतळी चिकण मातीच्या पाण्यात भिजवून आकाकंदिल करतांना वापरायचो. त्या साठी लगणारी चिक्कण माती,तुळशीच्या कुंडितील काढून वापरायचो. आकाकंदिलाचा साइझ खुप मोठा असायचा म्हणुन बांबूच्या काड्या पण खूप जाड  जूड असायच्या. तेंव्हा साध्या ट्विलच्या दोऱ्याने मिडियम साईझचा आकाकंदिल बनवता यायचा , पण मोठा बनवायचा म्हट्लं तर सुतळी वापरावी लागायची.आणि सुतळी मजबुत रहायला चिक्कण माती.

या वेळच्या आकाकंदिलाचा साईझ अगदी लहानच आहे म्हणून,  आता मात्र साधा दोरा आणि फेविकॉल वापरुन फ्रेम बनवायचं ठरवलं.  पण कुठल्या आकाराच आकाशकंदील बनवायचा हे ठरल्याशिवाय   काड्यांचे तुकडे.. त्यांची साइझशी असावी हे ठरवू शकत नव्हतो.

मुलीला  विचारलं की डायमंड शेप की स्टार शेप?? तर स्टार शेप चा विजय झाला. आणि त्या अनुषंगाने  चार एकाच आकाराचे त्रिकोण करायला १२ काड्या , आणि त्या दोन स्टार्स ला एकत्र जोडण्यासाठी सहा तुकडे असा साधा सरळ हिशोब करुन कामाला लागलॊ.

 बांबूच्या काड्या एका आकारात कापायला अडकित्ता वापरला
बांबूच्या काड्या एका आकारात कापायला अडकित्ता वापरला

मला हव्या तशा एकाच मापाच्या १२ काड्या घेउन,आधी त्यांना एकाच लांबीचे  कापले आणि नंतर  स्टारची फ्रेम बनवली. साधा रीळाचा दोरा वापरुन कच्ची फ्रेम तयार झाली.

कागद चि कटवण्यासाठी मैद्याची खळ बनवायची घरच्या स्टोव्ह वर. आई ओरडायची, पण दुर्लक्ष करायचं झालं. सगळ्यांच्याच घरी हाच खेळ सुरु असायचा..आकाकंदिल.. मित्र घरी येउन बघून जायचे, मदत पण करायचे. या वेळेस मात्र फेविकॉल का जबाब नहीं… 🙂

वर लावायचा कागद कुठला? तो तर घरी नव्हताच?? म्हणून तो पर्यंत फ्रेम पक्की करुन ठेवावी असा विचार केला. ६ पदरी दोरा केला, आणि त्याला फेविकॉल लाउ प्रत्येक जॉइंट भोवती गुंडाळले. अर्धा डबा फेविकॉल वापरले . १०० ग्राम चा डबा होता तो! इतकं करुन फ्रेम सुकत ठेवली पंख्याखाली.

चला, शेवटी जमलं एकदाचं.. चांगलं चार तास घालवल्यावर..दोन त्रिकोण करुन एकावर एक जोडले स्टार बनवायला.

चला, शेवटी जमलं एकदाचं.. चांगलं चार तास घालवल्यावर..दोन त्रिकोण करुन एकावर एक जोडले स्टार बनवायला.

संध्याकाळी मार्केटला जाउन पतंगीचा कागद विकत आणला. पण तो चि कटवायचा कसा?? हे विसरल्या सारखं झालं होतं. म्हणजे त्याचे तुकडे करुन लावायचे की एकच मोठा तुकडा लावून जास्तीत जास्त भाग कव्हर करण्याचा प्रयत्न करावा, हेच लक्षात येत नव्हतं. शेवटी सरळ लहान लहान तुकडे करुन चिकटवले तर ते मजबुत होतील असं लक्षात आलं आणि म्हणून कागदाचे तुकडे ( अंदाजे मापा प्रमाणे ) केले.

आकाश कंदिलाचं स्ट्र्क्चर.. फेविकॉल माखलेल्या चार पदरी दोऱ्याने पक्का करुन सुकत ठेवलाय .

आकाश कंदिलाचं स्ट्र्क्चर.. फेविकॉल माखलेल्या चार पदरी दोऱ्याने पक्का करुन सुकत ठेवलाय .

काड्यांना फेविकॉल लावून त्यावर कागद चिकटवले आणि शेवटी तो ढांचा एकदाचा आकाकंदीला प्रमाणे दिसू लागला. पण सगळा आकाश कंदील एकाच रंगाच्या कागदाने बनवल्यामुळे तो खास सुंदर गेट अप काही येत नव्हता.सौ.च्या म्हणण्याप्रमाणे त्याला सुंदर शी लेस लावली तर तो चांगला दिसेल , म्हणून उद्या येतांना लेस आणून लाउ असं ठरलं.

आता मात्र दिसतो हा आकाश कंदिला सारखा.

आता मात्र दिसतो हा आकाश कंदिला सारखा.

तसं , दुसऱ्या एखाद्या रंगाचा कागद घेउन त्याच्या पट़्ट्या पण वापरलया असत्या तरीही चाललं असतं. पण लेस मुळे काम सोपं होईल , आणि दिसायला पण जास्त चांगलं होईल म्हणून लेस आणायचं ठरवलं.

आता लेस लावल्यावर मात्र आकाकंदिल एकदम मस्त दिसायला लागला. पतंगीचा कागद वापरला आणि आतमधे एक ६० चा बल्ब लावला की बाहेर खूप छान प्रकाश पडतो, म्हणून जिलेटीन च्या ऐवजी पतंगिचा कागद वापरण मला आवडतं.

हा आहे पुर्ण झालेला आकाश कंदिल , आणि सोबतंच ’ती’ केरसुणी , मी दोन्ही मिळुन एकत्र केलेली.. :)

हा आहे पुर्ण झालेला आकाश कंदिल , आणि सोबतंच ’ती’ केरसुणी , मी दोन्ही केरसुण्या एकत्र करुन बनवलेली.

अमरावतीला , अगदी लहान साइझ चा आकाकंदील करून मग त्याला पतंगाच्या दोऱ्याला बांधुन उंच उडवायची पध्दत अजुनही आहे. त्या साठी एक लहानसा आकाकंदील स्पेशली बनवावा लागतो. त्या आकाकंदिलाला बहुतेक लाल रंगाचा एक जिलेटिन चा कागद वापरत.  दिवाळी आली, की रात्रीच्या वेळेस  आकाशामधे तुम्हाला असे बरेचसे आकाकंदील उडतांना दि्सतील. या आकाकंदीामधे मेणबत्ती लावण्याची व्यवस्था केलेली असायची.

आकाकंदील जर उडवायचा असेल तर एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे तुम्हाला एक मोठी पतंग  जी उडतांना खुप स्थिर उडते अशी घ्यावी लागते. आधी पतंग उडवायची मग नंतर दोऱ्याला एक लांब दोरा बांधुन त्याला आकाकंदी बांधायचा. मोठी असल्यामुळे पतंग त्या आकाकंदीलाला अगदी सहज पणे उंच घेउन जाते.

हा आकाकंदील मी बनवलाय खूपखू वर्षांच्या नंतर… त्यामुळे काही फारसा सफाईदार पणे जमलेला नाही. पण जस्ट आपला एक मजेशीर एक्स्पिरिअन्स शेअर करावा म्हणून इथे पोस्ट केलंय…

दिवाळिच्या दिवसात निरभ्र आकाशात आकाकंदील उडवण्यातली मजा काही वेगळिच .. गच्चीवर पलंगावर पडुन रहायचं आणि उंच उंच जाणारा तो आकाकंदील पहात रहायचं. गेले ते दिवस.. ते गाणं आहे ना गुलझारचं, दिल ढुंढता है… माझं आवडतं आहे ते… 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सण and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

41 Responses to मी आकाश कंदिल बनवतो, त्याची गोष्टं..

 1. Pravin says:

  सौ. ला हे पण सांगितलं की बघ, आधिपेक्षा पण चांगली करुन ठेवली आहे … 🙂 मस्तच ..

  मी पण लहानपणी पतन्गाला कंदील लावून उडवायचो. बहुतेक वेळा आत लावलेली मेणबत्ती पडायची अन् तो कंदील हवेतच जळायचा.

  ते गाणं आहे ना गुलझारचं, दिल ढुंढता है…
  अगदी अगदी, १९९८ पासून फक्त दोन दिवाळ्या घरच्या लोकांनसोबत घालवता आल्यात 😦 लहान असताना दिवाळीच्या दिवशी चाळीत सगळ्यात अगोदर बॉम्ब कोण फोडतो याची अघोषित स्पर्धाच असायची 🙂 how I miss those days 😦

  • सकाळी पहिला बॉम्ब कोण फोडतो ह्याची स्पर्धा तर आमच्या वाड्यात पण असायची.
   खरंच ते दिवस अजुनही मी मिस करतो.यंदा सुटी मधे जाईन बहुतेक ’त्याच’ गांवी…..
   १९९८ पासुन केवळ दोन दिवाळी घरच्या लोकांसोबत??
   या वर्षी तरी आहात की नाही घरच्या लोकांसोबत??

   • Pravin says:

    unfortunately not 😦 aajkaal ameriket aahe tyamule yaa varshee dekhil naahi.

    • प्रविण..
     कुठेही असलात तरी मनाने आहातच ना आपल्या लोकांच्या मधे.. चिअर अप…. दिवाळी आहे आज पासुनच… संध्याकाळी सहा वाजता नंतर धनतेरस आहे.. म्हणजे तुमच्या कडे सकाळीच… मस्त पैकी अभ्यंग स्नान करा.. आणि दिवाळी साजरी करा.. 🙂

 2. abhijit says:

  महेंद्रजी एकदम मस्त. मी पण आता ट्राय करणार. प्रश्न असा आहे की आमच्या कडे बांबूसाठी केरसुणीपण मिळणार नाही.
  पर्यायांचा विचार करतोय. :)शेवटी इच्छा तेथे मार्ग.

  • अभिजीत
   अवश्य ट्राय करा. जर केरसुणी पण नसेल तर अजुन काही तरी मिळेल . मी तर या वर्षी तारेची फ्रेम बनवायचं ठरवलं होतं, जर बांबू मिळाले नसते तर… तुम्ही बरोबर म्हणालात, इच्छा तिथे मार्ग!!! नक्कीच मार्ग सापडेल काहितरी. अहो , हे पोस्ट पण केवळ याच साठी लिहिलंय,..

 3. Aparna says:

  हम्म आता केरसुणी आणि कंदील दोघांचं कॉन्ट्रॅक्ट एकदमच मिळेल तुम्हाला तेव्हा केरसुणीचा फ़ोटो काढुनच टाका….:) पण अनुभव मात्र आवडला…आमच्याकडे नेहमी विकतच आणायचो ना कंदिल त्यामुळे हे त्यामागचं शास्त्र कधी माहितच नव्हतं असं वाटतं….दिपावलीच्या अनेक शुभेच्छा…

  • अपर्णा,
   या वर्षीच सगळे थकले आहेत.. पण आता पुढच्या वर्षी पण नक्किच बनवणार… 🙂
   केरसुणी खरंच खुपच छान झाली आहे पहिल्या पेक्षा, दोन्ही मिळुन एक केल्यामुळे.. 🙂
   इथे आता प्रोसिजर पुर्ण दिलेली आहे. प्रयत्न करा एकदा.. मजा येइल पहा.. खरंच… 🙂

 4. madhuri says:

  Amhi pun dar warshi akashkandil gharich banawto. sope watte pun barach wel lagto…maja yete karayla

  greeting card, faral akashkandil ya goshti gharchya chan wattat

  • माधुरी
   आकाश कंदिल , ग्रिटींग कार्ड वगैरे घरच्याच छान वाटतात. आम्ही दर वर्षी घरीच बनवायचो दिवाळी शुभेच्छा पत्रं.. तुमच्या ब्लॉग वर वाचलं आता पुढची कॉमेंट तिथेच टाकतो.. 🙂

 5. sahajach says:

  मस्त बनलाय आकाशकंदील…….आम्ही पण दरवर्षी घरीच बनवायचो पण थर्माकोलचा शंख त्यातही सगळ्यात आवडते मॉडेल…..एकसारख्या पट्ट्या कापून त्याला दोऱ्याने शिवून त्याचा शंख मस्त बनायचा….

  दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना अनेक शुभेच्छा….

  • तन्वी
   थर्मोकोलचा शंख मी एकदा विकत आणला होता, बनवला नव्हता. आम्ही ठरलेले दोन आकार म्हणजे डायमंड किंवा स्टार बनवायचो. खरं सांगु कां.. मजा येते बनवायला.. अजुनही.. मस्त वाटतं… 🙂 गेली इतकी वर्षं आपण कां नाही बनवला आणि या छानशा अनुभवाला पारखे झालॊ , हेच समजत नाही.

 6. मस्त झाला आहे कंदील. अगदी मनावर घेतलं होतात तर… मला देखील घरी गेल्यावर मस्तपैकी मातीचा किल्ला करावासा वाटतोय. बघू… दिपावलीच्या शुभेच्छा…

  • सिध्दार्थ
   मातिचा किल्ला.. माझी पण इच्छा होती. पण वेळे अभावी नाही जमलं.
   किल्ला बनवायचा, बनवतांना त्या किल्ल्यामधे एक बारुद खाना बनवुन ठेवायचा,आणि शेवटल्या दिवशी त्या बारुद खान्यामधे एक सुतळी बॉम्ब लाउन तो किल्ला उडवुन द्यायचा… मज्जा यायची.. हे लहान लहान आनंदाचे क्षण हातामधुन निसटले हे जाणवलं की अनिझी वाट्तं, आणि मग जुन्या आठवणित रममाण होऊनच दिवस ढकलायचा असतो.

   मला दोन्ही मुली.. त्यामुळे किल्ला प्रकरण फारसं बाळसं धरु शकलं नाही, उलट रांगोळी प्रकरण जोरात असतं आमच्या घरी.. असो..

 7. ravindra says:

  झकास:)काय वर्णन केलं आहे. आता तर जे कंदील बनवायला विसरले असतील ते हि हमखास बनवू शकतील आपले कीट वाचून. मी सुद्धा लहानपणी घरीच कंदील बनवायचो.आता कोण बनवितो. पण स्वताच कंदील बनवून लावणे यात मजा कुछ औरच असते हे बनविल्यावारच कळते नाही का?

  • रविंद्र
   या वेळॆस तर बनवायचा होताच.. बाय व्हॉट एव्हर वे.. हा कंदिल बनवलाय जवळपास ३५वर्षानंतर.. त्यामुळे सफाई नाही आलेली फारशी. पण बरा झालाय.
   महत्वाचं म्हणजे स्वतः बनवल्यामुळे लहान पण पुन्हा एकदा उपभोगता आलं… मस्तं वाटलं. एकदा मातिचा किल्ला बनवायचाय….. 😀

 8. कंदिल म्हणजे हिन्दीमधला लालटेन. पाल्हाळ न लावाता सांगायचे म्हणजे जुन्या विचारानुसार आपण हातून साक्षात लक्ष्मीनारायणाचीच सेवा घडली. सहसा दोघांचीही एकदम सेवा सहसा आपल्याकडून कधीच घडत नाही म्हणूनच जाणवेल वेगळेपणा ह्या दिवाळीचा… असा आमचा विचार, बाकी प्रत्यक्ष परमेश्वरच कृपावंत आहे.

  • शिरिष
   एक वेगळं परिमाण.. दिलंय तुम्ही या लहानशा कृतीला. केरसुणीला
   पण लक्ष्मी म्हणतात आपल्याकडे. ते लक्षात आलं तुमच्या कॉमेंट मुळे. धन्यवाद..

 9. कशाला आकाशकंदील बनवणारया लोकांच्या पोटावर पाय देता 🙂
  तुमची ही पोस्ट वाचून सर्वच घरी बनवायला लागले तर आकाश कंदील …
  आम्हीही लहानपणी बनवायचो घरी आकाश कंदील, खरच मज्जा यायची.
  रात्रि त्या कंदिलाकडे बघतांना एक वेगळाच आनंद व्हायचा.

  • देवेंद्र
   एकदम सोप्पं आहे बनवणं… प्रयत्न करा.
   फार तर चार तास लागतिल बनवायला.
   आणि त्या लोकांच्या पोटावर पाय नकॊ म्हणुन
   एक विकतचा पण आणुन लावा झालं… 🙂

 10. mugdha says:

  sahhiii!!! khup aavdali post!! Diwalichya tumha sagalyaanna shubhechchaa!! 🙂

  • मुग्धा
   तुमची पोस्ट स्पॅम मधे गेली होती म्हणुन रिप्लाय करायला वेळ झालाय.
   प्रतिक्रियेकरता आभार.. आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा..

 11. anuja says:

  आजची प्रतिक्रिया तुमच्या मुलींसाठी,
  नमस्कार,तुम्हा दोघींचे उल्लेख आणि हो तुमच्या आईचा पण,नेहमी महेंद्र्जी करतात,लहान लहान गोष्टीतून ते स्वःता आनंद घेतात, व दुसर्यान्हाई तितकाच सहजतेने देतात.हा आनंद आम्हालाही मिळतो कारण तुम्ही तिघीजणी आहात.त्यांच्यातील हा सकारात्मक भाव पहिला तुमच्या आईने ओळखला असेल,कारण यशस्वी पुरुष च्या बरोबरीने स्त्री चा हि सहभाग महत्वाचा असतो.
  प्रत्येक घरात आमच्या लहानपणी केले असा नवरा व पत्नी वेगवेगळे म्हणतात पण आई वडील होऊन आमचे लहानपण आमच्या मुलांना तसा भाव ,तशी कृती करून दाखविणे, अपद्वात्मक घरे आता अशी आहेत.तुझ्या बाबां मुळे लहानपण दोघानाही आठवते.महेंद्रजी च्या लिखाणामुळे घरे एकत्रित येऊन विचार करू लागली आहेत.लाख लाख धन्यवाद तुमच्या कुटुंबाला.
  आणि हो ! प्रेमात पडलात तर,मुलाची पारख चांगली करा म्हणजे बाबांच्या घरात घेतलेला आनंद,आमच्या लहानपणी असे न म्हणता माझ्या वडिलांसारखा असा कायम तुमच्या सोबत राहील.
  शुभेश्च्या

  • अनुजा
   काय प्रतिक्रिया देऊ? तुमची सर्वांग सुंदर प्रतिक्रिया वाचली आणि पुढे काय उत्तर लिहावे हेच समजेनासे झाले आहे. धन्यवाद.

 12. Manmaujee says:

  आकाश कंदील मस्त झाला आहे. . बालपणीचे दिवस आठवले. . .कागद चिकटवण्यासाठी मैद्याची खळ बनवायची घरच्या स्टोव्ह वर. आई ओरडायची, पण दुर्लक्ष करायचं झालं. सगळ्यांच्याच घरी हाच खेळ सुरु असायचा. . .हे अगदी खर आहे. . ह्या खळ प्रकरणावरून आमच्या घरी माझ्या नावाने “सत्यनारायण पूजा” झाली होती ती पण ऐन दिवाळीत!!! ते दिवस, ती मजा सार काही मिस होतय!!!! बाकी ह्या पोस्टमुळे भरपूर सारे आता घरीच आकाश कंदील घरीच बनवणार हे नक्की!!!

  • मनमौजी
   माझी तर नेहेमीच.. पतंगीच्या दिवसात तर खळ बनवायची आणी स्टॊव्ह चं बर्नर जाळुन ठेवायचं..
   गॉन आर द गुड ओल्ड डेज..
   पण जे काही आहेत त्यात तरी नक्कीच आनंद उपभोगता येईल.

 13. gouri says:

  aamachyaa gharee 2 kaMdil banaayache diwali la … ek bhaavaachaa chaar divas bamboo chya kaadya agadee taasoon banavalelaa, ekadam perfect … aani dusaraa maajhaa … bhaavaachaa kaMdil kadhee bhaau beejeparyant poorn vhaayachaa naahee mhanoon shevatee kaMtaaloon parat vegalaa banavalelaa … card sheet paper chaa 😀

  • गौरी
   काय मस्त कॉमेंट टाकलीत..
   मजा आली वाचायला. भावाचा कंदिल भाउबिजेपर्यंत तयार व्हायचा नाही…. 🙂
   आम्ही मात्र चक्क महिना भर आधी पासुन तयारी करित होतो.
   पण खरं सांगतो, बनवल्यावर एकदम मस्तं वाटलं.. !

 14. Sarika says:

  Mast… me to karanji kandil ghari banvat ase aadhi…. in detail mahiti dilyamule try karayla kahi harkat nahi… ya varshi vikatcha aanun lavlay… next year banven… sandhyakalcha kandilacha galarytla photo takla asta tar ajun maja aali asti

  • सारिका
   जरुर प्रयत्न करा.. मस्त मज्जा येते..
   आणि घरचे सगळे लोकं मदतिसाठी हाताशी असले तर मग पहायलाच नको.
   फक्त ४-५ तास रिकामा वेळ पाहिजे .. बस..

 15. anuja says:

  महेंद्रजी,
  वहिनींची परवानगी मिळेल हे गृहीत धरून व तमाम स्त्री वाचक वर्गे संमती देईल असा विश्वास व्यर्थ जाणार नाही याची खात्री आहे.हो! हो! पाल्हाळ न लावता सांगते ,ह्या दीपावली पासून मी तुम्हाला “महेंद्र भाऊजी” अशीच प्रतिक्रिया देणार.
  अनेकांचे तुम्ही महेंद्र दादा तर आहातच, रविंद्रन सारख्यांचे मित्र आहात,घरोघरी रोज तुमची हजेरी असते ,पैठणी भरजरी विचारांची पोस्ट रोज मिळतेच मग आमचे तर तुम्ही ‘भाऊजी’, कोणाला पटेल, तर कोणाला नाही पटेल, पण लोकप्रियता तर आहेच कि,ते तर सत्य आहेच.
  ( तन्वी,अपर्णा………दुजोरा न १००%)

 16. मी लहानपणी एक वर्ष स्वत: आकाशकंदिल बनवला होता. बनवून विकलेही होते. त्यानंतर आईने सांगितलं की आमच्या ओळखीतल्या एका मुलाची घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तो दिवाळीत कंदिल बनवून विकायचा. म्हणून इतकी वर्षं त्याच्याचकडून विकत घेत गेलो. आता तो चांगल्या बॅंकेत नोकरीला आहे. आता तो कंदिल विकत नाही पण त्याच्या घरासाठी अजूनही स्वत:च बनवतो. आत्ता चार-एक वर्षांपूर्वी मी ऑफिससाठी कंदिल बनवला होता. माझी अमेरिकन मॅनेजर फारच खूश झाली. कंदिलावरची डॉलरची नक्षी तर तिला फार आवडली. असं काही घरच्याघरी बनवता येऊ शकतं हे तिला नवीनच होतं. तोंडभरून स्तुती केली. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी त्यात फटाके फोडल्यावर तिलाच जास्त वाईट वाटलं.

 17. अरे वा! ही पोस्ट म्हणजे थोडक्यात एक क्राप्टचा क्लासच झाला 🙂 आम्हीही आकाश कंदील बनवायला शिकलो म्हणायचे!

  आपणास आणि कुटुंबियांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!

 18. bhaanasa says:

  महेंद्र,शोमू होता तोवर मी आणि तो अशीच झटापट करत कंदील बनवायचो.:) मस्त झालाय रे कंदील आणि तुझी शिकवणीही. आता छोटासा का होईना मी एकटीनेच बनवते. तुझ्या शिकवणीचा परिणाम……:)

 19. rohan says:

  मस्त रे. आकाश कंदील बनवण्याबरोबरच त्याचे स्टेप बाय स्टेप फोटो आणि विश्लेषण एकदम पर्फेक्ट. तू खरच उद्योगी आहेस बराच. रिकामी बसवत नाही ना तुला अजिबात. हा पोस्ट एकदम मस्त वाटला वाचायला… दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा … 🙂

  अनुजाच्या कमेंटला पूर्ण अनुमोदन. दादा.. मी तर तुझा एकदम ‘फुल्ल टू – डाय हार्ट फॅन’ झालो आहे. दर्शन कधी देतोस ते सांग रे बाबा… 😀

  • रोहन
   अरे गेले कित्येक वर्ष प्लान होता, आता जमवलं एकदाचं..
   उद्या जातोय औरंगाबादला, रात्री परत येईन..
   नंतर इथेच आहे… भेटु या.. मंगळवार नंतर..

 20. Pingback: आकाश कंदील.. पुन्हा एकदा.. | काय वाटेल ते……..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s