आजचा रवीवार. म्हणजे तंबी दुराई वार. त्या मुळे आजचा हा लेख तंबी स्टाइलने लिहितोय.. दोन फुल एक हाफ सारखा..
सकाळची वेळ होती, आपल्या बगिचा मधल्या बंगल्या मधे ते बसले होते. समोर चहाचा कप अर्धा झाला होता. सकाळीच पक्ष श्रेष्ठींना फोन वंदना करुनच झाली होती.नुकतीच निवडणुक झालेली होती, आणि निवडुन आल्यावर काय काम करायचं असतं ते कळत नव्हतं. तसा आपला जुना पेपर चा व्याप हा होताच.
कोणे एके काळी तीर्थरुपांनी सुरु केलेलं हे वर्तमान पत्राचं रोपटं आता बरंच मोठं झालं होतं.महाराष्ट्रातल्या दहा बारा गावातून लोकल आवृत्त्या निघत होत्या. पैसा धो धो करुन वहात येत होता.तीर्थरुपांनी दिलेली शिकवण अगदी शंभर टक्के पाळत म्हणजेच हाय कमांडचं महाराष्ट्रातलं मुखपत्र म्हणून पेपर काढण्याचं आपलं काम इती कर्तव्य म्हणून काम सुरु ठेवलं होतं. अहो त्या शिवाय का ’**सभे’ मधे पद मिळतं कां??
कंटाळा आला, म्हणून समोरचा लॅप टॉप उघडला, आणि इ मेल चेक करणं सुरु केलं. जनरल टाइमपास मेल्स होते.. बरेचसे तर फक्त माहिती साठी म्हणून पाठवलेले, कांही मेसेजेस फॉरवर्ड्स होते, इतर टाइमपास करणाऱ्या लोकांनी.त्यांनी ते जोक्स फॉर्वर्ड उघडले आणि खळाळून हसत दाद दिली एका विनोदाला…
तेवढ्यात एका मेल कडे त्यांचं लक्षं गेलं. नांव वेगळंच होतं काही तरी.. कोण एक ब्लॉगर होता , म्हणत होता की त्याच्या ब्लॉग वर प्रसिद्ध झालेलं लिखाण प चोरुन प्रसिद्ध केलंय म्हणे आमच्या पेपरमधे.. त्याने आपल्या ब्लॉग वरच्या लेखाची दिलेली ती लिंक होती ,आणि पेपर मधे प्रसिद्ध झालेल्या लेखाची पण लिंक होती.. म्हणत होता, की चार दिवसांपूर्वी कम्प्लेंट दिली पेपरच्या वेब साईट वर पण उत्तर मिळालं नाही, म्हणून हा मेल पाठवलाय .
हे संपादक लोकं डायरेक्ट का बरं उत्तर देत नाहीत?? त्या संपादकाला चांगला झापला पाहिजे…
फोन उचलला, आणि संपादकाला फोन लावला..
_______________________________________________________________________
संपादक!! आयला कसलं फाल्तू काम घेउन बसलोय हे. नुसता वैताग आहे. अरे काय राव, रोजची ८ पानं भरायची, आणि नंतर पुन्हा पुरवण्या आहेतच.. त्या पण भरवायच्या. आणायचं कुठुन इतकं मटेरिअल लिहायला?? पत्रकार पण नुसते टाइमपास आहेत. दिवसभर जगातले पेपर वाचून त्यातल्याच बातम्या घेउन इथे एकत्र करुन छापतात.
त्या पत्र नव्हे दोस्त मधे तर गेली कित्तेक वर्ष एक कॉलम चालतोय पळते विश्व म्हणून याच विषयावर. असेच काही तरी केलं पाहिजे.. आपणही..
हे पत्र कार पण नुसते पिटीआय च्या वृत्तावरुन आपला पेपर बेततात. इन्व्हेस्टीगेटिव्ह जर्नॅलिझम वगैरे सगळं काही नसतं.. नुसती कॉपी पेस्ट रायटींग झालंय हल्ली जर्नॅलिझम म्हणजे.आजकाल तर हे लोकं चक्क ब्लॉग वरचं साहित्य पण आपल्याच नावाने पाठवतात..
तोंडातला पानाचा तोबरा चावुन चावुन चोथा झालेला होता. ओठांच्या कडेने थुंकी ( च्यायला, हे साहित्यिक लोकं याला मुख रस म्हणतात.. आंब्याच्या रसा प्रमाणे.. कधी कधी यांच्या बुद्धीची कीव येते )बाहेर गळत होती. इकडे तिकडे पाहिलं, आणि डस्ट बीन जवळ ओढून त्यामधे पिचकारी मारली.. वाह.. क्या बात है.. मस्त वाटलं. तंबाखूचा खूमार डोक्यात चढला होता..
त्याच डस्ट बीन मधे एका इ मेल चा प्रिंट आऊट तुकडे करुन फाडुन फेकलेला पडला होता.कोणी एक ब्लॉगर होता, म्हणत होता की त्याच्या ब्लॉग वरचं लिखाण चोरुन छापलय म्हणे आमच्या पेपरला, त्याला क्रेडीट्स न देता. आता आम्हाला कसं कळणार की लिखाण त्या ब्लॉगरचं आहे म्हणून??आमच्या कडे एकाने पाठवले कुणीतरी, अन आम्हाला आवडले म्हणुन आम्ही छापले. इतके ब्लॉग्ज वगैरे पहाणं कसं शक्य आहे ?? उग्गीच काय तरी!!!!
दोन दिवसा्पूर्वीचा तो इ मेल.. तो ब्लॉगर चक्क धमकी देतोय, प्रेस काउन्सिल ला कम्प्लेंट करिन म्हणुन. करु दे.. काय घाबरतो का काय त्याला? असे शेकडो आले, अन शेकडॊ आले अन गेले.. माझं कांही वाकडं करु शकणार नाही… आणि ते पत्र फाडून तुकडे करुन फेकून दिलं डस्ट बीन मधे. त्या पत्राच्या तुकड्यांवर पिक टाकल्यामुळे त्याचे कपटे रंगवल्य गेले होते .
तेवढ्यात एका शिपायाने ( प्युन म्हणायचं त्याला, नाहितर युनियन ची धमकी देतो तो !!) एक इ मेल चा प्रिंट आऊट आणून ठेवला समोर. त्यावर हिरव्या शाइने कांही तरी लिहिलं होतं.. तो हिरवा रंग पाहुन जसा बैल लाल रंग पाहिला की कासावीस होतो, तसं झालं त्याला. हिरवा रंगात कॉमेंट म्हणजे शेट चं पत्र.. आणि एकदम सावरून बसला तो… ते पत्र वाचलं.. त्याने त्या डस्ट्बीन मधल्या त्या पानाच्या रंगात रंगलेल्या कपट्यांकडे पाहिलं, अन ते डस्टबीन मधले कपटे त्याला वाकुल्या दाखवून हसत होते..
तिच्या मारी तं.. तो ब्लॉगर लई धिट दिसतोय.. चक्क शेटलाच इमेल केला की त्याने. पण त्याला शेटचा इमेल कुठुन मिळाला? शेट आता सध्या ***** आहेत … तेंव्हा त्यांना आम जनतेचे शिव्या शाप नको असतात. त्या हिरव्या शाईत लिहिलं होतं……. ते वाचलं.. आणि……तेवढ्यात फोन वाजला. फोन उचलला, आणि होय साहेब.. होय साहेब, पहातो मी काय आहे ते.. हो हो.. देतो उत्तर त्या ब्लॉगर ला… असं म्हणून कपाळावरचा घाम पुसत फोन ठेवला..
पण असं म्हणता पण येत नाही कारण, प्रेस काउन्सिल ऑफ इंडीयाच्य गाईडलाइन्स प्रमाणे कुठलेही साहित्य छापताना त्याची पुर्ण जबाबदारी संपादकावर टाकलेली आहे.
ही नौकरी सोडुन दिलेली बरी… च्यायला नुसता वैताग आहे
____________________________________________________________________
तो एक इंजिनिअर.. खरं तर साहित्य , लिखाण म्हणजे काय ते त्याला कांहीच माहिती पण नव्हतं. पण एक दिवस हे ब्लॉग बद्दल कळलं आणि त्याला वाटलं की आपणही आपलं मन मोकळं करायला हे चांगलं साधन आहे. आता दहा महिने होत आले होते. तो सातत्याने कांहीतरी लिहित होता ब्लॉग वर.. लिहितांना अगदी कुणाचीही तमा न बाळगता.. अगदी काय वाटेल ते लिहित होता आपल्या ब्लॉग वर. स्वतःच्या चुका पण कबूल करायच्या, आणि इतरांना पण कोपरखळ्या मारत रहायचं..
इथे आल्यावर आणि लिहिल्यावर त्याला अगदी भरुन पावलं होतं. त्याचा ब्लॉगींग मधे आता चांगलाच जम बसला होता. मित्र , मैत्रिणींचा परिवार जमा झाला होता. बरं वाटायचं इथे.. रोज नेमाने नाही, पण बहुतेक दररोज कांही तरी लिहिलं जायचं ब्लॉग वर. बरेच वाचक पण लाभले होते, जे नित्य नेमाने वाचायचे.
त्या दिवशी त्या ब्लॉगर मित्राचा फोन आला, त्याने सांगितलं की तुझा लेख छापून आलाय एका पेपर मधे.. पण खाली तुझं नांव नाही.. चक्क वांग्मय चौर्य आहे हे. त्याला वाटलं, सोडून द्यावं.. पण का?? सोडून का द्यायचं?? असं कोणीही आपले लेख स्वतःच्या नावावर खपवेल आणि ते आपण सोडून द्यायचं?? का म्हणुन??
त्याला एकदम आठवलं, एक आतेभाउ पण आहे डीएनए मधे .. & काका आहे ना आपला याच क्षेत्रात गेली चाळीस वर्षं, आधी इंडीयन एक्स्प्रेस ला होता २० वर्षं, आता ***** ला आहे आणि त्याने काकाला विचारलं? तर काका म्हणे अरे त्या संपादकाला माहिती नसेल, तु एक इमेल पाठव त्या संपादकांना, ते खुलासा छापतील, पुढच्या अंकात. त्या तिरिमिरीतच एक मेल पाठवला, त्या पेपरच्या साईटवर जाउन. दोन दिवस वेळ दिला उत्तर द्यायला. पण कांहीच उत्तर नाही. अगदी पत्राची पोहोच पण नाही..अजिबात प्रोफेशनॅलिझम नसलेल्या त्या पेपरने कांहीच उत्तर दिले नाही.
दोन दिवस वाट पाहिली ,सारखा इ मेल बॉक्स चेक करून काय उत्तर थोडीच दिसणार आहे, त्या पेपरने मेल पाठवल्या शिवाय? वैतागुन गुगल सर्च मारला आणि प्रेस काउन्सिल च्या वेब साईटला जाउन सगळे इ मेल पत्ते शोधुन काढले. आधी त्या पेपरला पाठवलेला इ मेल फॉर्वर्ड केला प्रेस काउन्सिल ला… सोबतंच त्या पेपरच्या शेटला पण केली तक्रार. आता तरी आपल्या इमेल ला ऍक्नॉलेज करेल तो संपादक म्हणून..
हल्ली बायको पण म्हणत असते, आता बंद करा हे लिखाण म्हणून.. बस्स झालं.. पण हा छंद आहे, आणि आवडतं म्हणून लिहितो.. काय वाटेल ते…बघु जितके दिवस जमेल तितके दिवस..ठरवून टाकलंय, की जर यावर काही ऍक्शन घेतली नाही पेपरने तर पुर्ण पाठपुरावा करायचा या केसचा…. आणि पुढच्या पोस्ट मधे ब्लॉग वर यावर लिहायचं.. काय … आणि कसं झालं ते……!!अगदी नावासहित.. :)
(सध्या तरी हे पुर्णपणे काल्पनिकच आहे)
तंबी दुराई स्टाईल मस्त जमलिये…
काका, पण चोरलेल्या लेखाखाली लेखक म्हणुन त्यानी उल्लेख करायला हवा होता तुमचा.
जो पर्यत माफी नाहि मागत,सोडु नका त्यांना.
सचिन
सध्या तरी अजुन दोन दिवस वेट ऍंड वॉच आहे. उद्या नागपुरला जातोय, तेंव्हा जरा बिझी असेन… परत मुंबईला आल्यावर बघु पुढे काय करायचं ते..
निंदास्पद आहे ही गोष्ट.मागे मटामध्येही तुमचा लेख तुम्हाला ना विचारता छापला गेला होता पण त्यात तो तुमच्याच नावावर होता.पण हे कोणतेच क्रेडिट न देता त्यांच्याच नावावर लेख छापण आणी वर त्याची कबुली न देण म्हणजे अतिशय खालच्या पातळीवरच काम आहे.पण त्यांना ठाउक नाही त्यांची गाठ यावेळी कोणाबरोबर आहे ते. 🙂
तुमची तंबी दुराई स्टाइल भारी वाटली.
देवेंद्र
तंबीचा मी अगदी डाय हार्ड फॅन आहे. गेली दहा वर्षं वाचलंय त्याचं लिखाण.. त्यामुळे त्याची स्टाइल अगदी डॊक्यात घटट बसली आहे… या विषयावर सध्या मौन पाळतोय.
काका,
मला त्या पेपरची लिंक द्याल का पहायला ? साले चोरी करतात आणि त्याच केडिट ही देत नाहीत. मी कालच याच विषयावर पोस्ट टाकायच ठरवलं होतं आणि आज तुमचं हे पोस्ट वाचत आहे. माझेही आजकाल १-२ लेख ईमेल्स मधुन दुसर्याच नावाखाली फॉरवर्ड होत आहेत. पण एका न्यूजपेपर ने असं करावं हे पटलं नाही. त्यांना चांगलाच धडा शिकवा. सोडू नका त्यांना अजिबात. आम्हाला अपडेट्स कळवा. शुभेच्छा !
-अजय
अजय
थोडी वाट पहा.. दोन तिन दिवस.जर कांही झालं नाही, तर एक पुर्ण पोस्ट टाकेन या विषयावर.. अगदी नावांसहीत..
चांगलेच एक्सपोज केले. आता सोडू नका. या सवय मोडल्या पाहिजेत. पेपरवाल्यांच्या. तूम्ही बातमीदार ब्लाॅग वाचता का? द्या पाठवून त्यांच्याकडे तुमच्या भावना. मस्तच.
http://batmidar.blogspot.com
विजय
त्यांचा इमेल ऍड्रेस नाही. ब्लॉग नेहेमीच वाचतो.. तो.. आणि तुमचा पोलिसनामा पण.. 🙂
Sir Post chan zaliye.An tumhije patrkaritech varnan kelay te tar 100% kharay.Ek mail forward kelay bagha kahi jaml tar..
सागर
मेल मिळाला. दोन तिन दिवसांच्या नंतर मग काय ते करतो.. उद्या सकाळी नागपुरला जातोय कामानिमित्य…
ह्म्म्म्म…..अजूनही त्यांनी तुला स्पष्टिकरण मेल धाडला नाहीच का? बहुतेक तू लिहीलेस तसेच तुकडे करून फेकले असतील केराच्या टोपलीत….
लेख मस्तच झालाय. स्टाईल एकदम झकास.:)
इतकं सोपं नाही , मला इग्नोअर करणं.. बघ पुढे काय काय करतो ते… 🙂 प्रेस काउन्सिल वर दोन मेंबर ऑफ पार्लमेंट पण आहेत, त्यांचाही इमेल शोधुन काढलाय.. अजुनही कांही इमेल शोधुन काढले आहेत…
काका चोराला सोडू नका बिलकुल. फुल्ल टू Copy एक्सपर्ट आहेत. आधीचे पण अंक चाळून पहा कदाचित दर आठवडा “काय वाट्टेल ते” छापलेले असेल.
आणि हो Twitter वरच्या माझ्या आजच्या पोस्टला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल फार फार आभारी आहे. खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया पाहून.It’s highly encouraging.
अरे काय अप्रतीम जमलाय तो लेख, मजा आली वाचुन. मला वाट्तं तुझ्या ब्लॉग वरचा सगळ्यात बेश्ट लेख आहे तो.. 🙂
Apratim ch jamalay.. pudhachya lekachi (navasakat yenarya) vaat baghatoy.. ajibat sodu naka tya lokmat fekmat la..
हेरंब
तुम्हाला सगळंच तर कळलंय.. तरी पण डिटेल्स लिहितो पुढे..त वरुन ताक भात आणि सोबत भेंडीची भाजी आहे हे पण ओळखलंत तुम्ही… मस्तं!!!
गंमत आहे आणि दुर्दैवीही. एकूण वर्णनावरून लोकमत वाटत आहे. कोणा उपसंपादकाला ही दुर्बुद्धी सुचली काय माहित. एक पत्रकार म्हणून माझी तुम्हाला सहानुभूती आहे.
देविदास
धन्यवाद.. 🙂
मला तर्क कुतर्क करुनही संदर्भ लक्षात आले नाहीत. मटाने चोरले होते लेख माहित आहे, आणखि एक चोरी झाली का? असेल तर लिंक्स व नावांसकट तपशील कळवा.
अभिजीत
थोडं थांबा दोन तिन दिवस…. सांगतो..
कालची तंबी वाचताना तुमची आठवण आली होती आणि आज त्याच स्टाईलचा तुमचा लेख….लेख छानच जमलाय तरिही वाचताना खिन्न वाटतय….लोकं असे का वागतात हा प्रश्न उरतोच. मी तुमच्या ट्वीट मधे ती लिंक पाहिली आणि त्या पेपरमधला लेख वाचला….अश्या लोकांची कीव करावी की राग हेच कळत नाही…..नसेल आपल्यात क्षमता तर वाचावे नुसते, लिखाणासाठी काय कोणं बळजबरी करतय का???
एक मन असेही वाटते की एकप्रकारे हे आपल्या प्रगतीचे आणि त्या लोकांच्या अधोगतीचे लक्षण आहे पण म्हणून सोडून देणे वा दुर्लक्ष करणे योग्य वाटत नाही!!!
तन्वी
सुपर्णा म्हणते सोडुन द्या ब्लॉगींग वगैरे..आपलं इंजिनिअरींग रिलेटेड कम्युनिटी ज्या ऑर्कुट ला होत्या , त्याच पुन्हा मॅनेज करा. हे फिल्ड राहु द्या माझ्या साठी…. म्हंटलं, असु दे.. काही हरकत नाही लोकांनी वाचलं ना , ह्या निमित्याने का होइना.. कालचा तंबी अगदी अप्रतिम…. होता. त्याला मेल टाकलाय मी.
लेख चोरल्याचं वाईट वाटत नाही. पण ’अमूक एका ब्लॉगवर सापडलेला लेख’ इतकंही हे लोक लिहीत नाहीत. पुन्हा फोन करून विचारलं की, “असं कसं छापलंत तुम्ही?” तर “अरे बापरे!” असं म्हणून इकडे तिकडे फोन लाईन ट्रान्सफर करत रहातात. वीस मिनिटांनी फोन ’आपोआप’ बंद होतो. आपण पुन्हा फोन लावायचा. मग आढेवेढे घेऊन फोन संबंधित व्यक्तिकडे पोहोचतो. ते आपल्याला ईमेल पाठवायला सांगतात. ईमेल पाठवूनही उत्तर मिळत नाहीच. असं एखाद्या वेळेस सहन करता येतं पण एकदा सहन केलं की ते सारखं सारखं होतच रहातं. म्हणून पहिल्यांदा जेव्हा लेख चोरला जातो तेव्हाच कडक पाऊलं उचलावीत.
मी जेंव्हा मुंबई ऑफिस ला फोन केला तर म्हणाला की त्याला काहीच माहिती नाही. पण हे पण बोलला , की कांचन चा फोन आला होता म्हणुन. बहुतेक तुम्हीच फोन केला असावा, त्यांना सांगायला..
मी पुन्हा पाठवले आहेत डिटेल्स.. बहुतेक त्यांना भेटलं की सेटल होईल..
लेख मस्त झालाय.
प्रकाशकाला सोडू नका. आपण उत्तर दिलं नाही तर फारतर एखादी रिमाईंडर मेल येईल, नंतर ब्लॉगर गप्प बसेल असा गैरसमज दिसतो त्याचा. सोडून दिलं तर तो आणखी सोकावेल.
आज सकाळीच नागपुरला आलो, आणि टु माय सरप्राइझ , मला एक फोन आला त्या पेपरमधुन.. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, आणि भेटायला बोलावलं आहे. जमलं तर आज किंवा उद्या भेटीन त्यांना.
are wah kaka………Ldhai jinkli tar tar tumhi………Bhetayla kuth Mumbai or Nagpur?
अरे त्यांच्या शेटचा सेल नंबर शोधुन काढला होता काल..म्हंट्लं आज नाही आलं काही उत्तर तर सरळ फोन लावतो शेटला. पण बहुतेक होईल सगळं आज. भेटायचंय नागपुरलाच…
E-mail ID of Batmidar blog
blogeditor.acidic@gmail.com
vijay
Thanks… Will use if need arises..
यांना अशीच “तंबी” समजते…. खुप छान!
आनंद
मांडवली झाली. आज संध्याकाळच्या मिटींग मधे. पुढल्या अंकात क्लॅरीफिकेशन छापणार आहेत ते..
Wa wa wa.. chhan.. mhanaje aata tumacha navasat wala lekh yenar nahi tar 😛 .. dilgiri aali original aani dilgiri asha donhi links pathaval pls?
ok.. original link tumachya twitter varun milali.. aata dilgiri chi link vachayachi tivra ichchha aahe 🙂 .. well done…
अपर्णा
पुढल्या अंकात येईल. आली की एक पोस्ट लिहिनंच या विषयावर…
🙂
आनंद
ज्यांच्याकडे त्या पुरवणीचा चार्ज आहे त्या सुटीवर असल्यामुळे माझ्या इ मेल ला उत्तर दिल्या गेलं नाही असं म्हणाल्या त्या काल… असो.. अंत भला तो सब भला म्हणुन सोडुन द्यायचं..
दादा हे काम नक्किच लो*** च असाव तेच लोक करतात असले चोरटे प्रकार….! खरच सांगतो सोडु नका त्यांना…! चांगला धडा शिकवायला लागेल, काय समजतात काय हे लोक आपल्याला..!
अजय
काल भेटलो त्यांना.. पुढल्या अंकात प्रसिध्द करणार आहेत खरं काय ते.. ओरिजिनल लेख आणि स्कॅन करुन टाकतो इथे, आणि नंतर पुढे प्रसिध्द होणारा खुलासाही टाकीन स्कॅन करुन. 🙂
महेंद्र
हेरंब
अवश्य टाकीन त्या दोन्ही लिंक्स.. बहुतेक पुढ्ल्या अंकात येइल ते डिक्लीरेशन.. स्कॅन करुन टाकतो.
lekh tar apratim aahech,pan lekhavarunch tumhi tyana kondit pakdaycha praytna kela to mastach 🙂
pls links lavkar taka.
एकदा पेपरला आलं की मग ती लिंक देता येईल. बहुतेक पुढच्या अंकात येइल ते डिक्लरेशन. आणि मग ते डिक्लरेशन आणि तो लेख स्कॅन करुन ब्लॉग वर टाकतो.
friends, pls. read this blog. for this subject.
http://batmidar2.blogspot.com/
सगळी गंमतच आहे.
तुमच्या चिकाटीचं अभिनंदन.
डिटेलवारी कळतं समतं वर वाचलं. बातमीदारमध्ये येतं तर जास्त चांगलं झालं असतं. हे म्हणजे नुसताच रिपोर्ट झाल्यासारखं झालंय. जरा नाकाखाली चुरचुरीत मिरच्या लावायला हव्या होत्या.
मी तसा अन्याय सहन करुन घेणारा नाही..जर असं काही झालं तर मात्र अगदी शेवटापर्यंत जाउन पोहोचतो.. आणि बऱ्याच ब्लॉगर मित्रांनी मदत केली. नांवं मुद्दाम लिहित नाही इथे.. 🙂 अगदी तपशिलवार लिहिणार होतो.. पण जेंव्हा त्यांच्या ऑफिस मधे जाउन सहसंपादिकेला भेटलो, तेंव्हाच सगळं सेटल झालं, म्हणुन सोडुन दिलं.. नाही तर अजुनही पुढे गेलो असतो.. त्यांच्या शेटचा नंबर पण शोधला होता. त्यांनी आता मान्य केलंय की पुढल्या अंकात ते प्रसिध्द करणार आहेत दिलगिरी म्हणुन.. बघु या…. 🙂
मग केली का दिलगिरी व्यक्त त्यांनी??? आता तुम्ही एक पुस्तक छापा काय वाट्टेल ते च…म्हणजे आपसुक असे प्रकार थांबतील….