रोमॅंटीक आयडीयाज..

जगात सगळ्यात जास्त काय महत्वाचे असेल तर ते स्वतः मधला रोमॅंटीक ’किडा’ जिवंत ठेवणे. आता वय कितीही असो.. अगदी १६ ते ७५ रोमॅंटीझम शिल्लक असेल तरच आयुष्यात काहीतरी थ्रील शिल्लक रहातं. या रोमॅंटिक वागणं- म्हणजे केवळ ’तिला’ महागड्या हॉटेलमधे घेउन जाउन खूप खर्च करणे, किंवा फार तर एखाद्या सिनेमाला तिला घेउन जाणे, किंवा साडी , ड्रेस, जिन्स घेउन देणे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते पुर्ण चुकीचे आहे..  पण खरंच असं असतं का?? स्त्रियांच्या रोमॅंटीझम च्या कल्पना काय बरं असतात??

एम ऍंड बी मधे कसे मस्त रोमॅंटीक प्रसंग असायचे? तसंच काही तरी आपल्याही बाबतीत घडावं असं प्रत्येकच मुलीला वाटत असतं. लग्न होऊन इतकी वर्ष झालीत म्हणून काय झालं?? तुमच्या मनातला तो मदनबाण तरुण आहे नां? माझ्या फेवरेट आयडीयाज.. इथे आहेत..

१)तिचा वाढदिवस आहे.. किंवा लग्नाचा वाढदिवस समजा १२ वा… तुम्ही कुठे तरी बाहेर घेउन गेला आहात मे बी शॉपिंग मॉल मधे. एक १२ गुलाबाची सुंदर फुलं घ्या विकत. एका खांबाच्या आड उभे रहा आणि एखाद्या येणाऱ्या माणसाला एक फुल तिला द्यायला सांगा.. आणि म्हणायचं.. हॅपी ऍनिव्हर्सरी.. असे ११ फुलं निरनिराळ्या लोकांच्या तर्फे ( ज्या पैकी काही पुरुष काही स्त्रिया आणि एखादं लहान मुलं पण चालेल)  देउन झाले की १२ वं ्फूल तुम्ही स्वतः तिला द्या.. आणि म्हणा….. ( आता ते पण मीच सांगु का?)

२)जर लग्न झालेलं नसेल, अ्जूनही डेटींग करित असाल, तर हाताची झेरॉक्स काढून त्यावर लिहा .. :तुला हा हात तुला आपल्या हातात आयुष्य भरासाठी   धरुन ठेवायला आवडेल का?”  आणि तो पेपर स्कॅन करुन तिला इ मेल करा.  तिला म्हणाव, की उत्तर हो असेल तर आपल्या हाताचा ठसा त्यावर काढून परत  पाठव.

३)तिच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक जुन्या बाजारातून विकत घ्या. त्यावर त्या लेखकाची फेक सही स्वतःच  करा ( सहीचा नमुना कुठेही सापडेल ) आणि तिला गिफ्ट रॅप करुन द्या..

४)एक सुंदरशी लव्ह स्टॊरी लिहिणे सुरु करा. मुख्य पात्र तुम्ही दोघंच . ( अगदी रिअल स्टॊरी नको..थोडं काल्पनिक, थोडं खरं) पहिला पार्ट म्हणजे तुम्ही कसे आणि कुठे भेटलात , कशी मैत्री झाली, कसे तुम्ही तिच्या प्रेमात पडलात, आणि तिला सांगतांना तुम्हाला कशी भिती वाटते – कारण तिने नाही म्हंटलं, तर मैत्री पण संपून जाइल म्हणून वगैरे वगैरे…. आणि मग तिला पाठवुन द्या.. म्हणा, पुढल्या  भागात काय होणार आहे   ते तुलाच माहिती आहे, म्हणून तूच  लिहुन पाठव…. :)आणि गोष्ट पुर्ण करुन मला परत पाठव.

५)पर्सनलाइझ्ड मॅग्झिन कव्हर बनवा तिच्या फोटोचं अन तिला इ मेल करा. कसं बनवायचं? शोधा गुगलवर, नाही सापडलं, तर मला विचारा.आणि स्टॊरीचं हेडींग कुठलं?? तर सगळ्यात सुंदर मुलगी…. असं काहीतरी…

६)पंचविस गॅसचे फुगे विकत घ्या. त्या सगळ्यांच्या दोरा एकत्र बांधुन त्याला एक लहानशी कागदाची पाटी लावा.. आय लव्ह यु ची.. हे सगळं सामान ठेवा आपल्या कारच्या डिकी मधे. बाहेर कुठे तरी फिरायला जा.. लॉंग ड्राइव्हला.. समुद्रावर वगैरे… आणि तिला सांगा, की माझी वॉटर बॉटल डीकी मधे आहे ती आणतेस?? अन तिला चावी द्या कारची. ती कारची डिकी उघडेल आणि सगळे फुगे एकदम बाहेर येतील, तुम्ही बनवून ठेवलेल्या आय लव्ह यु नोट सह..

७)होळीच्या दिवशी.. आम्ही होळी खेळत नाही बॉ.. वगैरे तर नेहेमीच ऐकता तिचं.. या वेळी एक काम करा. दोन पिचकाऱ्या आणून ठेवा, आणि होळीच्या दिवशी तिच्या नकाराची पर्वा न करता तिला भिजवा.. दुसरी पिचकारी पण तिला सापडेल अशीच ठेवा.. किंवा ती झोपेत असतांना तिला गुलालाने रंगवा.. तिच्या नकळत,

८)बायको असेल ,तर तिची तारीफ करा , इतरांसमोर.. शक्यतो एखाद्या कॉमन पार्टी मधे मित्रांच्या गृप मधे जसे.. ही ना, चिकन बिऱ्याणी मस्त बनवते. अरे अगदी ’लकी मधली’ हैद्राबादी बिर्याणी पण झक मारते हिच्या हातच्या बिर्याणी समोर. अन हे सगळं करतांना तिचा हात हलकेच दाबा.. करेक्ट बॉडी लॅंग्वेज पण महत्वाची असते बरं कां…

९)जर मुलं घरात असतील तर त्यांची सोय करा एखाद्या चांगल्या मित्राकडे.. अन शुक्रवारी अनाउन्स करा.. की………..

१०)एक सुंदरसा बॉक्स घ्या विकत. त्या मधे दर महिन्याला काहीतरी एक गिफ्ट ठेवत जा.. लहानसच.. पण न चुकता..पैसे नसतील तर लहानसं चॉकलेटपण चालेल.

११)गर्ल फ्रेंड असेल, तर तिची हॉबी काय ते शोधून काढा. यासाठी तिच्या मैत्रिणीचा उपयोग होऊ शकतो. त्या हॉबी ला उपयुक्त अशी एखादी वस्तु भेट दिलेली तिला खूप आवडेल.

१२)सकाळी ती उठण्यापूर्वी तिच्या साठी कॉफी बनवून ठेवा.. आणि ती उठल्या बरोबरच तिच्या हातात कप द्या आणि मग पहा…. काय होतं ते!

१३)पिलो फाइट.. खास पिलो आणा विकत. पिलो ला छिद्र पाडुन ठेवा.. म्हणजे त्यातली पिसं बाहेर उडतील.पिलो फाइट मधे ्खूप मजा येते बरं कां.. आणि पिलो फाटली असेल तर अजूनच!

१४)लग्नाचा वाढदिवस आहे?? मग सोपं आहे. तिला ऑफिसच्या जवळ बोलवा, ऑफिस संपायच्या वेळेस, आणि दोघंही एक मेकांना ओळखत नाही, आणि पहिल्यांदाच भेटाताहेत असं  भासवून –  सरळ एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेल मधे घेउन जा, जिथे एक रुम बुक केलेली असेल ..आणि नंतर पुढे……

१५)तिचा वाढदिवस आहे ?? तिला तिच्या वया इतके फुलं द्या गुलाबाची. त्यामधे एक प्लास्टीकचं फुल ( अगदी खरं दिसणारं ठेवा) आणि तिला सांगा की शेवटचं फूल टवटवीत राही पर्यंत मी तुझ्यावर प्रेम करीन.

१६)गॅसचे फुगे आणा विकत.. तिच्या कपाटात ते फुगे भरुन ठेवा. त्याला एक पेपर लावा.. हॅपी बर्थ डे चा… सरप्राइझ इज द की  ऑफ सक्सेस हे लक्षात ठेवा.

१७)बायकॊ समजा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जात असेल, तर तिला सांगा, की मला तुझी खूप काळजी वाटते म्हणुन तुझ्या साठी मी एक बॉडी गार्ड आणलाय, अन तिच्या हातात एक लहानसा टेडी द्या..

१८)तिला वाचनाची सवय आहे?? ती एखादं पुस्तक वाचते आहे क? तर तिचं जितकं वा्चून झालंय त्याच्या पुढे काही अक्षरांखाली पेन्सिलने मार्क करा, आणि तिला सांगा की सिक्रेट मेसेज आहे त्यात. मग तो काहीही असू शकतो.. सिनेमाची तिकिटं तुझ्या पर्स मधे आहेत वगैरे..  उदाहरणार्थ या वाक्यात मी तुझ्यावर   प्रेम म्हणजे काही भावना नाही  तर मी ते करतो हे म्हणणं एक मोठ कठिण काम आहे..

१९)खेळ.. हा पण एक चांगला ऑप्शन आहे. स्पेशिअली रमी.. किंवा तत्सम पत्त्यांचा खेळ, अर्थात गेम विथ बेट्स… आता ’बेट’ काय ते तुम्हीच ठरवा… 🙂

२०)तिच्या वाढदिवसाला तिच्या ऑफिसमधे फुलं पाठवा.. सोबतच चॉकलेट्स पण. तिला सगळ्यांसमोर फुलं आलेले बघून खुप एंजॉय करता येइल आणि इतर मैत्रीणींवर माझा नवरा बघ कसा माझ्याकडे लक्ष देतो म्हणून थोडं मिरवता पण येइल.

२१)मुलींना झोपाळ्यावर बसायला खूप आवडतं. तिला फिरायला घेउन जा. एखाद्या बगिच्यात तिला झोपाळ्यावर बसवुन झोका द्या. कितीही वय असो मुली हा खेळ नेहेमीच एंजॉय करतात, आणि जेंव्हा झोपाळ्यावरून उतरतात तेंव्हा एकदम फ्रेश अन बब्ली असतात… 🙂

२२)हेअर ब्रश घेउन तिचे केस विंचरत बसा. हे शक्यतो रात्री झोपण्याच्या वेळेस करा.. कमित कमी ३ ते ५ मिनिटे.ती एकदम रि्लॅक्स होईल आणि मग पुढे ….. तुमच्या हातात आहे सगळं.

मेल मधे   वाचलेलं  , मित्रांकडुन ऐकलेलं आणि थोडं अनुभवलेलं  जे काही आहे, ते इथे लिहिलं आहे बरं का. आणि अजुन काही टिप्स माहिती  असतील तर इथे लिहा कॉमेंट्स मधे..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

154 Responses to रोमॅंटीक आयडीयाज..

 1. Onkar Danke says:

  एकदम चाबूक आहे काका तुमचा हा ब्लॉग.माझ्या सारख्याला वर्तमाणात आणि भविष्यात याचा बराच उपयोग होईल.

  • ओंकार
   चला .. इथे खरडण्याचा काही तरी तर फायदा झाला….

   • Akshay Kandalkar says:

    खूप धासू आयडिया दिल्यात राव तुम्ही धन्यवाद…पण एक विचारू का माझी GIRLFRIEND खूप चिडली आहे माझ्यावर कारण मी तिच्याशी खोट बोल्लो पण मला आता कळून चुकल आहे कि माझी चूक खूप मोठी होती…यावर काही उपाय सांगना. मला तिच्याशी लग्न करायचं आहे, आम्ही एकाच जातीचे आहोत, मला नोकरी सुद्धा आहे, ती पहिले म्हणायची कि ती तिच्या घरच्यांशी बोलेन म्हणून पण आता ती म्हणत आहे कि “तू मला खूप रडवलय आणि आता मी माझ्या घरच्यांना काही सांगणार नाही तुलाच त्यांच्याशी बोलाव लागेल हिच तुझी शिक्षा आहे म्हणे….” यावर मी काय करू काहीच सुचत नाही आहे….प्लीज मला मदत करा…

 2. जबरी… मला स्वतःल हा सरप्राईझ प्रकार जाम आवडतो. त्यामुळे सगळ्याच आयडिया आवडल्या. मस्तच आहेत. “)

  • माझ्या एका मित्राच्या बायकोने त्याची तर विकेटच काढली होती. एक स्पेशल अंतर्वस्त्रांचा सेट मिळतो. एकावर एक असे १२ असतात.. अगदी लहान आकारा पासुन थोडं थोडं मोठा होत जाणारी आणि नंतर शेवटी फ्रॉक, वनपिस, नाइटी असं करत.. आता हनिमुनला असे १२ कपडे घालणे म्हणजे …. कित्ती त्रास नाही??
   कसलं सॉलीड सरप्राइझ नां?

 3. mipunekar says:

  लयीच भारी की…..
  अप्रतिम

 4. abhijit says:

  लय भारी, महेंद्र तुम्हीच मदन बाण आहात ! आताच प्रिंट मारली मी याची. अविवाहितांनी हे सगळं केलं तर लग्न करावं लागतं हो मग ! प्रश्न तिथे आहे.

  • अविवाहीतांच्य़ा साठी पण काही आहेत काही आयडीयाज..पण नंतर लवकरच लग्न करावं लागत नाही.. ते आपोआपच होतं.

 5. rohan says:

  च्यामारी दादा.. हाहाहा.. हे लय भारी आहे बुआ… आधी असे काही प्रकार केलेले असते तरी आत्ता वाचून जाम हसायला येते आहे. काही ट्राय करून बघतोच पुढच्या महिन्यात. 😉

  ४ करून झाला आहे आणि ७ चा प्लान आहेच येत्या २८ फेब.ला 😀

  आणि दादा ‘लकी’ च्या बिरयाणीची मज्जा गेली यार आता. आधी सारखी नाही राहिली. पण आपल्या कडे जागा थोडीच कमी आहेत… 😉

  • अरे वा.. आधिच ट्राय केलाय कां? ग्रेट!
   लकी ची बिर्याणी आजकाल तेवढीशी चांगली नसते. कालच भोपाळला हलिम ची बिर्याणी खायला गेलो होतो. मुल्ला मस्त बनवतो . चिकनचॉप्स अन बिर्याणी मस्त आहे कॉम्बो..
   अरे त्या आरके स्टुडिओ समोर एक साई कॅटरर्स आहे.तो पार्सल देतो बनवुन बिर्याणी. कमीत कमी एक किलो घ्यावी लागते. ४०० रुपये किलो.साधारण ८ लोकांना पुरते..

   • rohan says:

    RK स्टूडियो म्हणजे BARC जवळ बोलतोय का… १ किलो ८ जणांना कशी पुरणार?? आपण असलो तर.. हेहेहे… 😉

    • अरे हो.. तिथेच.. आणि एक किलो तांदुळाची म्हणतोय मी. नक्कीच पुरेल बघ.. आम्ही मागवतो ऑफिस मधे . बरोबर ७-८ लोकांना पुरते बघ.. हाच कॅटरर म्हणे आरके स्टूडीओमधे पण सप्लाय करतो. बाकी टेस्ट खुपच छान असते..

 6. me sangu ajun ek… ekhada shabdakoda tayar kara. tyat tumacha premacha sandesh/ proposal cha message dadavun theva.. tila/tyala shodhayala sanga. Jamla tar thik nahitar tumhi aahatch ki uttar sangayala.. kashi vatate idea?

  • अतिशय उत्कृष्ट.. एकदा ट्राय करायलाच हवी..
   यावरुन अजुन एक कल्पना सुचली, शब्द कोड्यात एक क्लु द्यायचा, की अमुक ठिकाणी जा.. ( एखादं रेस्टॉरंट वगैरे) तिथे गेल्यावर काहीतरी पुढचा क्लु असं करत शेवटला क्लु म्हणजे तुम्ही जिथे जेवायला जाणार किंवा सरप्राइझ पार्टी प्लान केली असेल त्या ठिकाणचा पत्ता.. ( ट्रेझर हंट सारखं म्हणतोय)
   किंवा असाही मेसेज असु शकतो ” सिनेमाची तिकिटं अमुक ठिकाणी ठेवली आहेत” वगैरे..

   • महेंद्र, माझ्याच कल्पनेतून मीच एक शब्दकोडं तयार केला आहे. लवकरच पोस्ट करीन. विचारांना खाद्य दिल्याबद्दल धन्यवाद!

 7. Aparna says:

  एकदम ढासू आहे पोस्ट…
  एक ताजा बाण आहे…
  तुमच्या बायकोची आई परत गेल्यामुळे ती उदास आहे (किंवा माहेराहून परत आल्यामुळे असं काहीसं कारण) आणि ती एकटीच बाहेर चालायला गेलीय..घरातलं तुमचं बाळ तुम्ही सांभाळता आणि बायको परत आल्यावर तिला सांगता I really miss you…आणि मग पुढचं…काय आता सगळंच सांगायचं…पण एक I miss you बरीच जादू करतं…:)

 8. वाह..झकास…फक्कड झालीय पोस्ट. डाइरेक्ट दिलाला भिडली 🙂
  खरच..Love doesn’t make the world go round. Love is what makes the ride worthwhile.

  • सुहास..
   लवकर उपयोग करा… मी एक कथा लिहायला घेत होतो , आणि काही कल्पना सुचतिल तशा नोट केल्या तर हे पोस्ट झालं.. 🙂 खरं खरं सांगतोय.

 9. Ajay says:

  तुम्ही खरंच ग्रेट आहात काका ! ही पोस्ट मी कितीतरी वेळा वाचली आणि या सगळ्या आयडया मला नवीनच वाटल्याअ. एकदम भारी आयडीया दिल्यात राव तुम्ही. आभारी आहोत खुप.
  मानलं बुवा तुम्हाला.

  -अजय

 10. लयीच भारी!!! 😀

  ३, ४, १६, १७ हे तर विशेष आवडले!

  प्रेमात पडलेल्यांची लक्षणं, न पडलेल्यांची लक्षणं, आणि आता ही पोस्ट…
  काका, तुम्ही तर डॉक्टरेटच केलीत म्हणायचं की आता!

  • ही पोस्ट अजुनही अर्धीच आहे . अजुन बरेच मुद्द्दे आहेत लिहायचे.. 🙂 अरे कथे साठी मुद्दे काढत होतो, तर लक्षात आलं की हे एक चांगलं पोस्ट होऊ शकेल, म्हणुन सरळ छापुन टाकलं इथे.

 11. Rohini says:

  You are simply Great!!!
  How many of these you have tried yourself?
  Nice post, why dont you write second part of this post? That would be interesting.

  • रोहिणी
   प्रतिक्रियेकरता धन्यवाद.
   मी किती वापरल्या?? ते नंतर कधी तरी लिहिन.
   पण सध्या तरी तुम्ही अवश्य वापरुन पहा.. स्त्रियांच्या दृष्टीने पण आहेत नां तिथे दिलेल्या..

 12. mugdha says:

  now thats something really interesting…How to surprise boys should be the next post..what say?

  • मुग्धा
   ते पोस्ट तुम्ही लिहा.. मी वाचायला येतो उद्या तुमच्या ब्लॉग वर.. अहो मुलींच्या साईडचं पण पुरुष कसं लिहू शकेल??

 13. Manisha says:

  Kupach chan post aahe:)
  kahi kalpana nakich try karun bagen
  Thnx for nice post

 14. कसलं solid post लिहिल आहे तुम्ही. खरच सगळ्या idea सही आहेत. या post ची copy अजयला mail करते, बघुया किती surprises मिळतात मला

  • सोनाली ,
   अजयने स्वतःच वाचलं तर कदाचित तुला देइल पण सर्प्राइझ. पण जर तुला माहिती आहे हे समजलं की मग त्यात कसलं आलं सरप्राइझ?? तरी पण बेस्ट लक..

   • तुमच्या idea वाचुन त्याला सुचतिल ना काही नविन, मी पण एकदा त्याच्या वाढदिवसाला अनेक वस्तु वेगवेगळ्या ठीकाणी ठेवलेल्या gift pack करुन त्यावर one liners लिहुन, खुप मजा वाटलेली त्याला.

 15. Raghu says:

  काय पोस्ट लिहिली आहे काका तुम्ही… एक नंबर.. लयीच भारी.. यातल्या २-३ गोष्टी केल्या तर बायको फुल्ल टू फ्लॅट होईल. १७ नंबरची नक्की ट्राइ करणार आहे.. धन्यवाद…

 16. Smit Gade says:

  wah wah.. wah wah…

 17. Mahesh says:

  अगदीच भारी आइडिया आहेत बर का 🙂 महेश

 18. trupti says:

  kaka, me tumachya post chi niyamit vachak aahe pan comment matra aajach takatey….karan post ch tasa dhasu aahe..tumhi lihileli rahul aani riya chi katha pan khup prabhavi aahe…
  sagalyach idea ek so ek aahet. Being a girl i am damn sure that each n every surprise will bring a smile on a face of a girl/lady…

  • तृप्ती
   स्वागत.. आज पहिल्यांदाच कॉमेंट टाकली म्हणुन.
   कथा – ती पहिली कथा होती आयुष्यात लिहिलेली. नंतर पुन्हा तसा स्पार्कच आला नाही की कथा लिहावी असं वाटावं.
   पोस्ट आवडल्याचं आवर्जुन सांगितल्याबद्दल आभार वगैरे मानत नाही, कारण मग ते अगदी फॉर्मल वाटेल म्हणुन.. पण थॅंक्स..

 19. rajeev says:

  पीकल्या पानाचा देठ कीहो हीरवा……….

  • राजिव
   अबे पिकलं पान असशील तु..– अभी तो मै जवान हुं…अवधे ए\कोणपन्नास तुझ्याएवढच –वयोमान.. हे हे हे…

 20. rajeev says:

  देव दर्शन करावे,
  दान धर्म करावा,
  मुला बाळांना भेळ खाउ घालावी,
  सायंकाळी घरी भजन संध्या करावी..

  असे सात्वीक वीचार मनात का येत नाहीत बरे ?

 21. rajeev says:

  माझ्या सारख्या सनंमार्गी माणसाचे नैतीक अध:पतन काबरे करावे वाटले आपणांस ?
  ह्या सर्व गोष्टी मैत्रीणी साठी काबरे कराव्या वाटू नयेत ?

 22. rajeev says:

  मी अश्या प्रसंगी
  १. भांडी , धूणी ,झाड पूस करतो,स्वयं पाक करतो
  २. धू ळ , जळमट साफ़ करतो, टोयलेट सींक धूतो
  ३. चादरी बदलतो
  ४ ईस्त्री करून ठेवतो..

  आणी गजरा आणतो !!!!!!
  बायको खूश !!!!!!!!!!!!

  कारण १ ते ४ ही रोज ची कामे करून मी गजरा आणला असतो……

 23. सगळेच एक-सो-एक आहेत. पण विकेट गेलेल्या अविवाहितांसाठीपण लिहा की काहीतरी.

 24. आता काय, Love Doctor का? छान आहे पोस्ट. मुलींच्या साईडचं पण लिहून टाका. तुम्हाला जमेल. तुम्हाला कोणत्याही विषयावर लिहायला जमेल, यावर मी पैज लावायला तयार आहे.

  माझ्या नव-याच्या वाढदिवसाला सरप्राईज म्हणून मी मेसेज लिहून एक बुके आणि केक ऑफीसमधे पाठवला होता. त्याला ते खूप आवडलं होतं.

  • कांचन
   मला एकदा टुर ला जावं लागलं होतं तेंव्हा प्रोफेशन्ल सर्व्हिस कडून बुके पाठवला होता बायकोला.. अन चॉकलेट पण…
   शेवटी काय हो, अशा लहान सहान गोष्टींमधेच मजा येते जास्त../
   तुम्ही पण लिहा ..मुलींची साईड.. लिहिता येइल.. पण मग तोच तो पणा येतो पोस्ट मधे, म्हणुन म्हणतोय… मुग्धाला पण सांगितलंय लिहायला..

  • tejali says:

   kharach,,…lawakar liha kaka..baaki post dhasu ahe ekdum..majaa aali wachatana..;)

   • याचा दुसरा भाग कांचनच्या ब्लॉग वर वाचला की नाही. कांचन च्या मोगरा फुललावर दुसरा भाग मुलींच्या साठीचा तिने लिहिलेला आहे.

 25. asmita pawar says:

  khupach nashibwan aahe ho tumachi bayako……..
  i feel jealous..
  mazya nawaryala sangayala hawe.
  to mulich wachanar nahi pan prayatn karun baghate…..
  maze lagn 5 feb la amravati la aahe…tumhala aagrahache nimantran……

 26. इतक्या प्रतिक्रियांनंतर काय बोलणार, नेहमीप्रमाणेच एकदम मस्त( आणि उपयोगी) 🙂

 27. Pingback: Tweets that mention रोमॅंटीक आयडीयाज.. « काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 28. आनंद
  धन्यवाद,, वरेच दिवसा नंतर दिसलास? बिझी कां?

 29. नाही, बिझी वगैरे काही नाही.
  घरी गेलो होतो, सोमवारची सुट्टी टाकुन, ४ दिवस घरी आराम केला.

  • अरे वा.. लकी माणुस.. अशा आनंदी माणसाचा सदरा मला हवाय. खुप प्रवास सुरु आहे माझा गेले काही आठवडे.. 🙂

 30. sonal says:

  kaka, nice post …… keep it up

 31. सही आयडीयाज आहेत..
  प्रत्येकाची आवडनिवड लक्षात घेवून असं बरंच काही करता येईल

  • मिलिंद
   अजुन बरेच प्रकार करता येतात, पण ते इथे लिहु शकत नाही. 😀 आवडनिवड लक्षात घेउन बरंच काही करता येइल हे एकदम खरं..

 32. vikram says:

  अरे हे मी पहिल्याच दिवशी वाचले होते आणि २-३ मित्रानाही वाचायला लावले होते फक्त कॉमेंट द्यायची राहिली होती

  आयडिया एकदम मस्त आहेत यातील १-१ करून सर्व ट्राय करणार आहे

  अनुभव सांगेन नंतर 🙂

 33. pritam says:

  भारी पोस्ट राव, सगळ्या आबाल वृद्धांनी वाचावी अशी.

 34. Ashish Godase says:

  i’m not writing marathi in english
  coz dt 2 difficult 2 read so…
  1st of all tx KAKA… i’m not darin 2 type KAKA coz dis cant b ideas of any KAKA… den also u r sayin ur age 49 den also u r too much young
  really ossom
  i think some r specially made 4 me
  tx kaka i’ll tell u experience later
  i want to talk wid a girl in mine class
  but i cant coz every time i’m thinkin abt wt talk wid her
  can u help me?

  • आशिश
   अरे बाप रे.. काय मदत करु मी??

   सगळ्या गोष्टी आपोआप होतात.. माझा अनुभव तरी असाच आहे.. मुद्दाम करायला गेलं की नेमकं बिघडतं सगळं..

 35. एकदम भन्नाट. मी तुम्हाला लवगुरू समजतं होतो पण तुम्ही तर ह्या क्षेत्रातले कुलगुरू निघालात. तुमच्या ह्या पोस्ट वाचून आमच्या सारख्याचा संयम सुटला नाही म्हणजे मिळवली.

  • सिध्दार्थ
   संयम सुटु दे रे.. बरं होईल.. आईला पण मदतीला कोणी हवं की नाही?? आता हाउ टू प्रपोज यावर एक पोस्ट लिहु कां? हे हे हे 😀

   • Ashish Godase says:

    mahesh kaka
    अरे बाप रे.. काय मदत करु मी??

    सगळ्या गोष्टी आपोआप होतात.. माझा अनुभव तरी असाच आहे.. मुद्दाम करायला गेलं की नेमकं बिघडतं सगळं..

    ase var lihita n khali

    आता हाउ टू प्रपोज यावर एक पोस्ट लिहु कां?
    ase vicharta!!! aho hey kay vicharne zale ka???
    lavkarat lavkar post kara

    सगळ्या गोष्टी आपोआप hot astya tar mi tumhala dhnyawad sangitale aste

    हाउ टू प्रपोज post chi vat pahatoy

    • आशिष
     माझ्या बाबतित तरी तसंच होत गेलंय. कुठलाच प्रयत्न वगैरे न करता गोष्टी होत गेल्या. म्हणुन लिहिलंय..
     हाउ टू प्रपोझ?? त्ते सहज चेष्टा म्हणुन म्हंटलं होतं 🙂

 36. काका “हाउ टू प्रपोज” खूप दूर आहे हो. प्रश्न आहे तो कुणाला आणि ते कुणी कुठे भेटेल? जाऊ द्या मी म्हणजे ह्या विषयात पूर्ण पारावलंबी आहे. कॉलेजमध्ये एक मुलगी आवाडायाची पण ती समोर आली माझी वाचाच बसायची. साधं Hi, Hello नाही झालं तर प्रपोज करणे सोडाच. सध्या आई तिला मदतीला कोण हवे आहे ते स्वत: शोधते आहे. आम्ही ह्या बाबतीत काही कामाचे नाही आणि आमच्याने काही होणार नाही ह्याची घरच्यांना खात्री आहे. सध्या आमची गाडी अरेंज मॅरेजच्या हाइवेवर सुसाट धावते आहे. आत्ता कुठे जाऊन थांबते ते पाहु.

  • कसंही झालं तरी चालेल.. फक्त लवकर करा. शुभेच्छा.. लव्नाला मी मात्र नक्की येइन. तुमच्या कोंकणात म्हणे फिश करी असते लग्नाच्या जेवणाला?? 🙂

 37. हो, फिश् नसतं पण वडे मटणाचं गावजेवण असतं. जे मटण नाही खात त्यांना कोंबडी :-). लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा झाली की मग एक दोन दिवसात हळद उतरण्याचा कार्यक्रम असतो. हळदकाढणी म्हणतात त्याला. तुम्हाला माहीत असेलच म्हणा पण तरी देखील सांगतो, लग्नातल्या नॉनव्हेजचा आनंद मुंबईमध्ये पण घेऊ शकता. एखाद्या आगरी समाजातल्या माणसाबरोबर ओळख असेल तर आगरी लग्न समारंभाला जा. कोकणातलं वडे मटणाचं जेवण झक मारतं असं ऐकलं आहे मी.

  कोकणात चक्कर मारायला माझ्या लग्नापर्यंत वाट नका पाहु. पुढची रत्नागिरी ट्रिप असेल तेंव्हा सांगेन तुम्हाला. बघा जमवून. बहुतेक मे महिन्यात. मासे, मटणाबरोबर हापूस आंब्याचा पण समाचार घ्या.

  • आगरी मित्र नाही कोणी.. पण कोंकणात अवश्य जाईन पुढल्या आठवड्यात.. गोवा अन रत्नागिरी ला.. 🙂

 38. Nilima says:

  Mahendra ji ek dam mast idias aahet MR. na dete hi link 🙂
  well mala ti 5 no chi khup awadli zhkas te kase kartat sanga ki kiva ekhdi web chi link dya plzzzzz

 39. Pingback: प्रेम दिन विशेष « मन उधाण वार्‍याचे…

 40. govind says:

  mi tichyashi khup prem karato pan tila bolayala ghabarato please suggest me

  • गोविंद
   हा खुप पर्सनल प्रश्न असतो. काय सांगु यावर?? मला तरी असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपोआप होत असते.. जस्ट लेट द थिंग टेक इट्स ओन टर्न.

 41. तुम्हाला लव गुरू सारखे रात्री कॉल्स वगेरे येत नाही ना:) ..आजही न राहवून पोस्ट वाचली..तेवढीच आवडली परत 🙂

 42. Ashish says:

  Amachya Kolhapuri Bhashet sangayacha tar “NAADKHULA”!!!!

 43. kiran patil says:

  आयडीया मस्त आहे. !!

 44. पिंगू says:

  लय कामाची पोस्ट हे.. कांचनतायने लिंक दिली

 45. sandeep kadam says:

  lay bhari buva aapan jam khush jhaloy………………………………….vachhun ho

 46. Mahadeo divate says:

  good ideas

 47. swapna says:

  o kaka, divas banvlat tunhi maza….. aamcha lagna honar aahe 1/1/11 la… 5 varshanchya lamblachak prem prakarana nantar… aani aaj kal asa vatatach navta ki prem uralay… thoda kantal vana zala hota… pan tumhi ekdam maragal ghalavlit mazi… laggech URL copy karun navryala pathvali…
  khuuuup khuuup aabhar…..

  • आवडायलाच् ह्वं. प्रत्येक प्रेमात पडलेल्याला आवडेल अशीच हीपोस्ट आहे.. 🙂
   बरेच तर अनूभवाचे बोल आहेत 🙂
   एक दोन कथा पण आहेत याच ब्लॉग वर.. जरूर वाच.
   (तू काका म्हणालीस, म्हणून एकेरी लिहिलंय तुला.) 🙂
   बाय द वे, लग्नाकरता शुभेच्छा. तारीख पण मोठी मस्त काढली आहे शोधून. १/१/११

 48. Dhundiraj says:

  wow….मस्त आहे….पण test करण्याजोगी कोणी भेटलीच नाहीये अजून 🙂

 49. Nivedita mahajan says:

  wow…
  khup chaan chaan ideas ahet ho..!
  Actually mi pan khup romantic ahe.. mala ase surprices den agdi manapasun awdt..!
  really great for guyes..! he jar saglya mulani kel na tar muli tyanchyasathi vedya hotil.. ani ajun jasti prem kartil.. i am sure..!

 50. Nivedita mahajan says:

  धन्यवाद !!!

 51. mazejag says:

  kai kai sapdel ithe kalpa karuch shakar nahi mi….kharach tumhi Gr8 aahat…

 52. chaitanya says:

  kaka kharetar ajun “Ti” aaushyat aleli nahi parantu “Ti” laukarch yavi ase vatate….aso.
  Pan jari “Ti” nasali tari bavis tips kiman chavrechalis vela tari vachalya astil 🙂
  “Ti” yeeparaynt “Theory” cha sarav karin ani nanter “Practical”……..:) 🙂
  Khupach chan post aahe hi…!!

  • चैतन्य
   नक्कीच फायदा होईल ह्याचा.. थिअरी पाठ असली की प्रॅक्टीकल एकदम सोपं जातं.. बेस्ट लक..

 53. shridharkulkarni says:

  Nice article but one has to dare for this implimentaion& both should interested.

 54. मग ते असो Love Marraige किंवा Arrange Marrage असावा फक्त विश्वास..
  विश्वास आपल्या जोड़ीदारावर आपल्या जीवन साथी वर…
  तो साथी आयुष्याचा आयुष्यभर सोबत असेल फक्त विश्वासाच्या जोरावर..
  ह्याच्या पेक्षा वेगळ काय देणार आपल्या जोड़ीदारास
  If ur talkng abt gift then Kiss on her Forehead, with full of Emotions…..

 55. Gurunath says:

  ३)तिच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक जुन्या बाजारातून विकत घ्या. त्यावर त्या लेखकाची फेक सही स्वतःच करा ( सहीचा नमुना कुठेही सापडेल ) आणि तिला गिफ्ट रॅप करुन द्या.

  he ashe chaarminaari item sangat ja dada ajun,!!!!! kharch tevdhach kami!!!!! hehehehe

 56. Sharda Morya says:

  Solid Ideas…..
  Try karun baghayala pahije….

 57. Gurunath says:

  अं एक शंका…… नुसते नजरेतुन बोलणे कशी आयडीया आहे???? मला तसेच आवड्ले, तिला कळले म्हणजे बास!!!!!!!! 😀

  • नजरेतुन बोलणं ? अरे ते दिवस गेले आता. १९५० च्या सिनेमात दाखवायचे तसे काहीतरी 🙂

 58. Shweta Nare says:

  😉

  लेख वाचला नि व. पु. काळे ह्यांचं एक वाक्य आठवल.. ” प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी नेहमी आपण एक रहस्यच बनून रहाव… कारण रहस्याने कुतुहूल वाढत, कुतुहुलाने ओढ आणि ओढीने प्रेम वाढत..” 🙂 🙂

  म्हणूनच कदाचित जेव्हा संसारात एखादा पती / पत्नी म्हणते न, “तुझ्यातल अजून खूप काही जाणन माझ बाकी आहे” किंवा ” लग्नाला अमुक अमुक वर्ष झालीत तरीही मी ह्यांना / हिला ओळखू शकलो नाही ” तेव्हाच कदाचित त्यांच्या संसारात अजून जगण्यासारख भरपूर काही आहे असा त्यांना सांगावस वाटत असाव… 🙂 🙂

  म्हणून आपल्या हक्काच्या व्यक्तीला भरभरून प्रेम देताना.. “surprises “most of the time work out करतात…. 🙂 🙂

  खरच छान छान टिप्स दिलात… 🙂 🙂

 59. Pravin Wawre says:

  khupach mast…actually yatalya baryach ideas mi use karto (bayakovar nahi ha gf var)…ani ti khush pan hote…

 60. SnehaL says:

  😀 😀
  एप्रिल मधे engagement झाली आमची .. महिन्याच्या १ तारखेला एक एक रेड रोझ घेउन जातेय मी .. सोलिड एन्जॉय करतो पण मान्य करत नाही 😀

  December नंतर ही सरप्राईझ try करेन .. 😀 😀

  Dhanywaad .. 😀 😀 😀 😀 😉

 61. अनन्या वर्तक says:

  तुमचा ‘रोमॅंटीक आयडीयाज’ हा लेख मला मात्र फार आवडला.

  पाच वर्षाच्या प्रदीर्घ long distance प्रेमानंतर आम्ही गेल्याच वर्षी लग्न केले. हळू हळू रोजच्या routine मध्ये आणि वेगवेगळ्या जबाबदारया सांभाळत सांभाळत आम्ही बऱ्याच वेळेस long drive ला जाणे, एकत्र कूकिंग करणे, एकत्र पार्टी arrange करणे, मराठी पारंपारिक पद्धतीने बहुतेक सण साजरे करणे, हे सगळे आम्ही आनंद घेवून करतो. पण त्याच बरोबर आम्ही वेगवेगळ्या रूम मध्ये बसून फोन वर गप्पा सुधा मारत राहतो. त्याला माझा फोन वरचा आवाज जास्त जवळचा वाटतो. मग त्याच सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा दाटून येतात. एकंदरीत आयुष्य हे फार सुंदर आहे आणि निखळ निर्मल प्रेंम हे त्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे.

  मी ही लिंक त्याला पाठवली आहे.

  धन्यवाद,

  • अनन्या,
   प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार- आणि ब्लॉग वर स्वागत.
   लहान लहान गोष्टींमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करीत राहिलो की मस्त वाटतं. शुभेच्छा.

 62. काय मुलींना sex विषयी जास्त गप्पा कराव्या वाटतात का. आणि त्या कशा करतात. अहो romantic chat म्हणजे असते काय नेमके. नेमके काय बोलतात त्यात. नेहमी जेवण केली का असंतरी विचारता येत नाही मग काय बोलतात. कृपया मला विशेष सांगा.

  • वैभव
   ्जेवण झालं का? वगैरे विचारण्या ऐवजी, आधी पासून चार पाच टॉपिक डोक्यात ठेवायचे आणि आपल्याकडूनच काही तरी सांगायचं. जसे दिवसभरात केलेले एखादे काम, मित्राबरोबर केलेली मजा,मजा करतांना पण ती असती तर बरं झालं असतं, तिला मिस केलं, पुस्तकावर गप्पा, सिनेमा, कॉलेज, असे अनेक विषय असतात बोलायला. बोलतांना विषय नाही- असे व्हायला नको. गप्पांचा विषय सुरु करणे मुलाचे काम असते, मुलीचे नाही.. थोडक्यात पिकॉकिंग करायचं.. 🙂
   अर्थात मी काही मास्टर वगैरे नाही या विषयात, तरी पण काही तरी सांगतोय. 🙂

   • Vaibhav Dhotre says:

    pan tumhala yeta. you are love guru for me.

    • वैभव,
     असं काही नसतं. स्वतः आहे तसे वागायचा प्रय्रत्न कर , शक्य तो बोलण्यासाठी विषय तयार ठेवत जा. एकदा एखाद्या विषयावर बोलणे सुरु झाले की मग त्यातून भरपूर विषय मिळतात गप्पा मारायला.. जेवण झालं का? हा प्रश्न चुकुनही कोणाला विचारू नकोस.. 🙂

 63. ekta says:

  avivahit tarunina kahitri suchva boyfrnd la khush karnyasathi

 64. Nitin says:

  फारच छान!
  खुप आवडलं.
  मार्गदर्शनासाठी खुप खुप धन्यवाद.

 65. मनिषा says:

  खूप छान कल्पना …सर्वच भारी आहेत ..सरप्राईजेस भन्नाट असतात ,मला तर फार आवडतात, मला कोणी देवो कि न देवो मी मात्र देत असते..(सरप्राईज म्हणतेय मी ) ..अख्खी यादीच होईल ..मी आतापर्यंत दिलेल्या सरप्राईज ची ….हा लेख जोडीदारासाठी आहे म्हणून ,मी माझ्या नवर्याला १४ फेब ला दिलेले सरप्राईज शेअर करते. डिसेंबर मध्ये लग्न झाल्यावर पहिला व्ह्य्लेन्तीन डे आला.एकत्र कुटुंब असल्याने वेगळे काही करता येणार नव्हते. काही गिफ्ट आणावे तर तेवढे पुरेसे पैसे नव्हते ..मग एक आयडिया सुचली २ दिवस आधी सगळी जुनी मासिके घेतली,त्यातली चित्रे कापून जीवन पट तयार होईल असे एका थीम नुसार चित्रे एका पेपरवर चिकटवली आणि त्यावर लिहित गेली, गाणी कविता ,एखदा विनोद ,मर्सिडीज चे चित्र ,कुठे ताजमहल ,कुठे युरोप चे चित्र,पार्कचे चित्र ,असे करत करत २० पाने एकमेकांना जोडली ,लांबलचक लखोटा तयार केला.व्यवस्थित गुंडाळून ठेवले.रंगीत रिबन ने सजावट केली .एका बॉक्स मध्ये ठेवून त्याच्या ऑफिसला जाण्याच्या बैग मध्ये ठेवून दिले. १४ ला सकाळी मला आठवन आहे असे काही दाखवलेच नाही. तो हि गेला ,दुपारी फोन आला. मी तुला संध्यकाळी हॉटेल मध्ये जाऊ म्हणून सरप्राईज देणार होतो,म्हणून सकळी मुद्दाम बोललो नाही ,त्याआधी तूच मला झकास सरप्राईज दिलेस. गेला अर्धा तास झालाय पत्र वाचतोय संपतच नाही……लग्नाला १० वर्षे झालीय,माझे सरप्राईज आजही त्याने जपून ठेवलेय.

 66. pravin says:

  khup chan.. ajun kahi navin asel tar sanga mala

 67. ravi says:

  mast aple tar kup awadali baba

 68. Dnyaneshwari says:

  Namskar .,Mahendra sir tumacha kay vatelte ha blag vachala chanch aaahe.,janu pratek streechya manatlach.
  Pan mala navryala khush karny sathi.,any tyala romantic banvnya sathi kahi tips miltil ka?
  Tumchya utarachi asha aahe .

 69. Suja says:

  khupach chan.

 70. Suja says:

  Khupach Chan

 71. आकाश शिरसाठ says:

  मला उद्या तिला प्रपोज़ करायचा पहाटे तर कसा करु

 72. vinod Gawade says:

  Very nice story

 73. Santosh says:

  9 आणि 14 आमच्या दोघांच्या आवडत्या ideas आहेत

 74. मंगेश रमेश वैद्य says:

  साला जाम खतरणाकय राव तुम्ही सगळेच । सॉल्लिड महेंद्रराव।।।।।असं वाटतय पुनः प्रेमात पडावं,उठावं, पुन्हा लग्न करावं,,,,,,,,अन बरच काही,,,पुनःपुन्हा,,

 75. सचिन says:

  अनोळखी मुलीला कस बोलाव

 76. suraj mahadik says:

  ek mulgi ahe ticha maj khup prem ahe pn ti mla kshi milel he mla sanga pn tich lgn zal ahe………

 77. संकेत होलकर says:

  माजा ब्रेकअप शक्ताका call me 8149805722

 78. पंकज says:

  सर लय भरू हा ।।।।।।

 79. पंकज says:

  सर लय भरू हा ।।।।।।

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s