ब्लॉगर मिट

कोणे एके काळची गोष्ट आहे. लेखकू नावाचा एक प्राणी असायचा. त्याला पब्लिशर प्रसन्न झाला की त्याची पुस्तकं तो छापायचा आणि मार्केटला विकायचा. लोकं पण फक्त प्रसिध्द लेखकांचीच पुस्तकं विकत घ्यायचे. त्यामूळे नविन लेखकांना संधी अगदी ’न’ च्या बरोबरीतच होत्या. कदाचित म्हणूनच असेल की बऱ्याच लेखकांमधे प्रतिभा असूनही ती  पुस्तकं न छापल्या्मूळे त्यांच्याबरोबरच संपुष्टात आली.

इंटरनेट सुरु झालं आणि सगळंच बदललं. सुरुवातीला इंग्रजी लिहिणाऱ्यांना ब्लॉग नावाचं एक व्यासपीठ मिळालं. मराठी भाषेचा दुःस्वास अजूनही सुरु होताच.  म्हणजे काय की निरनिराळ्या चार पाच लिप्या कार्यरत होत्या. त्यांचे फॉंट्स डाउनलोड केल्यावरच ती साईट दिसायची. अचानक एक आनंदाचा क्षण आला, मराठीच्या लेखकांच्या जीवनात! युनिकोडींग सुरु झालं मराठी भाषेचं. आता कुठलाही फॉन्ट वगैरे डाउनलॊड करणं आवश्यक नव्हतं कुठलिही साईट वाचायला. तुम्ही बरहा, गमभन वगैरे सॉफ्टवेअर वापरून लिहीले की ते कुठल्याही कॉंप्युटरवर वाचता येऊ लागलं.

लवकरच बरेच मराठी भाषा प्रेमी सुद्धा मराठी मधे ब्लॉग लिहू लागले.  आपण लिहिलं की ते कोणीतरी वाचलं पाहिजे, नाहीतर लिहिण्याचा काय फायदा? लोकांचंही लेखनात सातत्य नव्हतं. लोकं कधी तरी महिना पंधरा दिवसातून लिहायचे. ब्लॉगर्स ने  काही लिहिलं की ते लोकांना कसं समजणार म्हणून मग ’मराठी ब्लॉग विश्व’ ही साईट सुरु झाली. या साईटवर एकदा ब्लॉग रजिस्टर केला, आणि मग ब्लॉगरने एखादा लेख लिहिला  की  या साईटवर ताबडतोब त्याची माहिती प्रसिध्द होते. कुठल्याही वाचकाला या साईटवर गेलं की नविन  काय लिहिलं गेलंय हे समजायला लागलं .  याच साईटमुळे सगळ्या  मराठी ब्लॉग्जना वाचकवर्ग मिळाला.

नियमीत लिहीणारे ’लेखक नसलेले लेखक’ सुद्धा तयार झाले होते. प्रत्येकाच्याच मनामधे काहीतरी नेहेमीच खद्खदत असतं- वृत्तपत्रातल्या बातम्या, किंवा अवती भवती घडणाऱ्या घटना. ते आता ब्लॉगच्या रूपाने लिहिले जाउ लागले. लोकांनाही त्यांच्या सारख्याच सामान्य माणसांनी लिहिलेले खरे खरे अनुभव वाचणे  आवडायला लागले. ब्लॉगचा आपला एक वेगळाच वाचकवर्ग तयार होत होता.

निरनिराळ्या विषयांचे ब्लॉग्स   सुरु केले लोकांनी. काही तर फक्त सिनेमा किंवा कथा, कादंबऱ्या, प्रवास वर्णनं, ओमरखय्याम च्या रुबाईयां, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तर होत्याच  पण सोबतच कविता, इतिहासाची दैनंदिनी, खाद्ययात्रा, मातृत्व या विषयांवरचे ब्लॉग सुरु झाले. लोकं ब्लॉग वाचायचे आणि आपले मत काय आहे ते लेखकाला कळावे म्हणून मुद्दाम कॉमेंट्ससुद्धा लिहायचे. लेखक- वाचक ॠणानुबंध निर्माण झाला. आता हे वाचक कोण? तर हे  म्हणजे इतर ब्लॉग लिहिणारे ’इतर  ब्लॉगर्स’ किंवा ब्लॉग नसलेले पण मराठी वाचनाची आवड असलेले इंटरनेट सॅव्ही वाचक.  मराठी ब्लॉग्जची संख्या जी एक वर्षापुर्वी ९०० च्या आसपास होती ती एकदम दुप्पट झाली आहे ( हे आकडे फक्त मराठी ब्लॉग विश्व वर रजिस्टर केलेल्या ब्लॉगचे आहेत).

पत्रकारांचे साहित्य, बातम्या हे तर वर्तमानपत्रामधे नियमितपणे प्रसिद्ध होतच असते. पत्रकारीतेमधे लेखनावर असणाऱ्या मर्यादा असतातच, वर्तमानपत्राच्या धोरणानुसार संपादकाला जसं अभिप्रेत असतं तशाच प्रकारचं लिहून द्यावं लागतं. बरं, समजा ,एखाद्या लेखकाला मनाप्रमाणे लिहायला मिळालं, तरीदेखील आजचा प्रसिध्द झालेला लेख म्हणजे उद्याची रद्दी.. ही संकल्पना आहे आणि ती टाळता येत नाही. कितीही उत्कृष्ट लेख लिहिला, तरी पण उद्या तो शिळा होणार, म्हणून पत्रकारांनासुद्धा आपलं प्रसिद्ध झालेलं चांगलं साहित्य एकत्र ठेवायला ब्लॉग हे एक चांगलं माध्यम सापडलं. माझा वैयक्तिक अनुभव आहे, की एक वर्ष जुना लेखसुद्धा ब्लॉग वर वाचला जातो .

या ब्लॉगिंग मुळे लोकांना त्यांच्या मनातल्या गोष्टी लिहायला एक व्यासपीठ मिळालं. पण माझ्या मते इतकंच कारण नाही. प्रत्येक माणूस अगदी माझ्या सारखा सर्वसामान्य माणूस ज्याने ज्याने कधीही कुठेही लेखन केलेलं नाही,  तोदेखील आपल्याला काय वाटतं हे लोकांना सांगू इच्छितो आणि ब्लॉग हे त्यासाठी एक उत्कृष्ट साधन आहे. कविता तर प्रत्येकच माणुस आयुष्यात करतो कधी ना कधी. आपली कविता ऐकली आणि कोणी कौतुक केलं की होणारा आनंद शब्दातीत आहे.  एक बाकी आहे, अशीही वदंता आहे की, जितके ब्लॉगर्स आहेत त्यांच्या घरची मंडळी त्यांचं लेखन कधीही वाचत नाहीत. आता घरी कोणी ऐकत नाहीत किंवा कोणी वाचत नाही म्हणून लिहिणे थांबवणे मर्द मराठ्याला शोभत नाही नां.. म्हणुन !!!

तुम्ही ललित लेखनाबद्दल म्हणाल, तर सगळ्याच वृत्तपत्रांचे कॉर्नर्स प्रतिथयश लोकांच्या लेखांनीच व्यापलेले असतात. म्हणजे तुमच्या आमच्या सारख्यांचे  लेख प्रसिध्द होणे अवघड आहे. त्यामुळे ब्लॉग हेच असे एक साधन आहे की जे सर्वसामान्य माणसाला आपले लेखन विनामूल्य प्रसिध्द करण्याची संधी देतं. तसेच  ब्लॉग मुळे स्वतःमधे असलेली लेखन क्षमता तपासण्याची एक सुवर्णसंधी मिळालीय आमच्यासारख्यांना. असंही म्हणतात, ‘प्रॅक्टिस मेक्स अ मॅन पर्फेक्ट’. तसेच इथे लेखन करून हळू हळू पर्फेक्शन येइल कधी तरी आमच्या मधे, या आशेवरच मी ब्लॉग लिहिणं सुरु ठेवलंय एक वर्ष आणि तीन महिन्यांपासून.

इतके ब्लॉग झाले, वाचक वर्गदेखील तयार  झाला, ब्लॉगरच्या चुका, त्याला ताबडतोब दाखवून दिल्या जायला लागल्या. जरी कोणी चुका दाखवल्या, तरीही ब्लॉगरला आनंद व्हायचा, कारण चुका काढल्या याचा अर्थ म्हणजे  आपला ब्लॉग लक्षपूर्वक  वाचला गेला — (आणि एवढीच जाणीव पण पुरेशी आहे ब्लॉगर्ससाठी. 🙂  बऱ्याच ब्लॉगर्सशी  नियमीत असलेल्या संवादामुळे ( कॉमेंट द्वारा) एक ओळख  निर्माण झालेली होती.  सारखं वाटत रहायचं, की हा माणूस कसा असेल? एखाद्या वेळेस भेटला तर बरं होईल असंही वाटत रहायचं .

पुण्य़ाला एक मराठी ब्लॉगर मेळावा घेण्यात आला. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहिला, आणि मुंबईमधेसुद्धा ब्लॉगर मेळावा घ्यावा अशी सगळ्यांचीच इच्छा दिसली. या संदर्भात एकदा सुरेशजी पेठे, सलील ची एकदा भेट झाली होती. तेंव्हाही हा मुद्दा चर्चिला गेला  . एक पोस्टदेखील टाकली होती सुरेशजींनी या विषयावर.    रोहनचीसुद्धा एकदा भेट झाली आणि असा मेळावा घ्यायचा हे नक्की केले. रोहन तर अमेरिकेला निघुन गेला, पण इथे कांचन कराई, सुहास, यांच्याशी याच संदर्भात प्रमोदजींच्या घरी झालेल्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली आणि हा मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. ढोबळ रुपरेषा तयार करण्यात आली   .

याच मेळाव्याबद्दल कांचनच्या ब्लॉग वर एक पोस्ट टाकलं आणि त्याला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आम्हाला खूप हुरुप आला.पुन्हा फोनाफोनी सुरु झाली. एक विजेट बनवलं, ते विजेटदेखील बऱ्याच ब्लॉग वर दिमाखात झळकतांना पाहून खात्री पटली की हा कार्यक्रम एकदम मस्त होणार!

मेळावा घ्यायचा तर कुठे? सेंट्रल आणि वेस्टर्न च्या लोकांना आणि बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी  मुंबईला मध्यवर्ती ठिकाण म्हणून दादर ही जागा निवडण्यात आली. घरचं लग्न कार्य असल्याप्रमाणेच सगळे जण कामाला लागले, मेळावा घ्यायचा तर जागा हवी! आणि जागासुद्धा मध्यावर्ती ठिकाणी हवी. कांचनने बऱ्याच जागी स्वतः   भेट दिली आणि तिथली व्यवस्था पाहिली , सुरुवातीला तर शिवाजी पार्क ला घ्यायचा मेळावा म्हणून ठरवलं होतं, पण  येणाऱ्या पाहुण्यांना  ( मुख्यत्वे करून स्त्रियांसाठी) मुलभूत आवश्यकता म्हणजे प्रसाधन गृह ( टॉयलेट्स ) वगैरे तरी असाव्या म्हणून  इथल्या दादर सार्वजनीक वाचनालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहामधे हा कार्यक्रम घ्यायचा असे सर्वानुमते  ठरले.

या मेळाव्याची रूपरेषा अजून निश्चित करण्यात आलेली नाही कार्यक्रमाची संपूर्ण  रूपरेषा लवकरच दुसऱ्या एका पोस्ट वर वाचता येईल. . दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ४-३० ते ५ च्या सुमारास हा कार्यक्रम सुरु होईल.आजपर्यंत जवळपास ५० लोकांनी आपली नांव रजिस्टर केलेली आहेत, पण जर तुम्ही येणार असाल – ( नाही अवश्य याच) तर तुमची नांवे आणि सेल फोन नंबर कॉमेंट्स मधे द्या किंवा या गूगल डॉक मधे सेव्ह करुन ठेवा.
मुंबई येथे आयोजित होणार्‍या ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यास उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी कृपया http://www.mogaraafulalaa.com/2010/03/blog-post_29.html या दुव्यावर जाऊन किंवा खालच्या पोस्टवर जाऊन ऑनलाईन फॉर्ममधे आपली नाव नोंदणी करावी. ज्यांनी आधीच नोंदणी केलेली आहे, त्यांनी पुन्हा आपले नाव नोंदवण्याची आवश्यकता नाही.

भ्रमणध्वनी क्रमांकाचा पर्याय सोडून इतर पाचही पर्याय अनिवार्य आहेत. आधीच्या फॉर्ममधे बर्‍याच जणांना आपली नाव नोंदणी करता आली नव्हती म्हणून हा बदल करण्यात आला आहे.
तुमच्या ब्लॉग वर  “मराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावामुंबई” चे विजेट लावायला खाली दिलेला कोड कॉपी करा…
<a href=”http://bit.ly/duQ9TH” target=”_blank”><img alt=”मराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावामुंबई” src=”http://bit.ly/bZEpqh” /></a>

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक. Bookmark the permalink.

45 Responses to ब्लॉगर मिट

  1. Aparna says:

    अगदी मनातलं लिहिलंत महेंद्रकाका आणि ती घरच्यांनी आपलं लिखाण न वाचलं गेल्याची वंदता तर एकदम भीडलीच…:)
    नशीबाने मी तेव्हाच भारतात आहे त्यामुळे मी नक्की असेन…अमेरिकेतही बरीच मंडळी मराठी ब्लॉग लिहितात आणि वाचतात त्यातलं कुणी येणार आहे का माहित नाही पण आता ब्लॉगनिमित्ते झालेल्या ओळखी, आवडीचे ब्लॉगर्स यांना प्रत्यक्षात भेटणं हाही एक वेगळा अनुभव ठरावा….

    • अपर्णा
      वाट पहातोय. त्या दिवशी भेट होईलच.
      घरचे लोकं वाचत नाहीत हे खरंय ना, आणि त्याबद्दल आभारच मानायला हवे, कारण केवळ त्याच कारणाने, ( कोणी आपलं ऐकत नाही, आपल्या बोलण्याकडे लक्षं देत नाही, आपल्याला वेड्यात काढतात वगैरे वगैरे गोष्टींमुळे) तर आपण ब्लॉग वर लिहू शकतो नां….
      🙂

  2. bhaanasa says:

    महेंद्र, वा! मुंबईकरांची ब्लॉगर्सची मिट होणार होणार… म्हणता म्हणता आलीच की जवळ. जवळ जवळ सव्वावर्ष होत आले ना…. किती ब्लॉगर्स व वाचकही आता अगदी घरातलेच झालेत. सगळ्यांना भेटण्याची ही सुवर्णसंधी, पण…. 😦 फोटू काढा, चित्रफिती घ्या म्हणजे दुधाची तहान ताकावर तरी भागवण्याचा प्रयत्न करेन. प्रत्यक्ष नसले तरी मनाने असणारच आहे मेळाव्यात. खूप एक्साईटमेंट वाटतेय…. 🙂

  3. रोहन says:

    मस्तच … 🙂 आता कधी एकदा हा प्रोग्राम होतोय असे झाले आहे.. मी लवकरच येतोय मुंबईत… 🙂

    • तू सोळाला येणार नां? भेटू या इथे आलास की. तो पर्यंत मी पण जरा टुर्स वगैरे आटॊपून घेतो सगळे. 🙂

  4. मी says:

    वॉव !!!
    च्या आयला, मला याही‌वेळी‌ उपस्थित रहाता येणार नाही. भारतातल्या दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रीय़ भाषेत असे मुक्तछंद लिहिणारे एकत्र येत नसतील, किंबहूना एवढ्या विविधांगी विषयावर लिहिणाऱ्यांचा एवढा सुरेख वैचारिक संगम होत नसेल. १२व्या शकताकानंतरची उत्तरेकडील आक्रमणं असोत कि‌ शिवकालापूर्वीच देवगिरीच्या पाडावानंतरच सुलतानी राज्य असो, शेदिडशे वर्षाचं इंग्रजी राज्य किंवा स्वतंत्र भारतातल्या काही नेत्यांचे ‘मराठीला पाणिपत’ करण्याचे प्रयत्न असोत, या सर्वात मराठी टिकून कशी राहू शकते याच उत्तर म्हणजे हा मेळावा आहे. अ. भा. / विश्व – साहित्य सम्मेलन या गोष्टींनी जरी हे सिद्ध होत असलं तरी त्यातून होणाऱ्या चर्चा मात्र “लिहिणारे किती‌ ? वाचणारे किती‌ ? आम्हाला आर्थिक मदत करा ? मराठी भाषा जगणार का मरणार ?” या दिशेत जातात व ‘कॉमन मॅन’ ला खर-काय-खोटं-काय हा प्रश्न पडतो. या पार्श्वभूमीवर हातात लेखनी आणि भगवा झेंडा घेऊन इंतरेनेटवर नेटाने मराठीची‌ घोडदौड करणारे मावळे मात्र सर्व भाकित, शंका, चुकीच्या ठरवत, कोणताही आर्थिक, सामजिक, राजकिय मोबदला न घेता ..केवळ गंमत म्हणून ही‌जी ‘वाग्विलासिनीची सेवा करत आहेत ती अनमोल आहे … हा प्रवाह मराठी माणसाला, साहित्याला, भाषेला “too good to ignore” या नियमाने किर्तिमान करो हेच माऊलीच्याकडे मागणे !

    .. जय हे !

    • सोमेश
      अतिशय सुंदर आणि मुद्देसुद प्रतिक्रिया. ( नुकताच तो कऱ्हा ते मिसिसिप्पी वाचलं म्हणून नांव समजलं 🙂 तसंही इंटरनेटवर फार दिवस लपून रहात येत नाहीच म्हणा)

      पुण्याच्या मेळाव्याला भरपूर लोकं आले होते. इथे पण आत्ता पर्यंत ५० च्या वर नांवं नोंदवली गेली आहेतच. जवळपास १०० चा आकडा तरी क्रॉस होईल असे वाटते.

      आणि वर लिहिलेली प्रतिकरिया म्हणजे एक संपुर्ण पोस्टंच आहे. धन्यवाद म्हणत नाही, कारण एकदा धन्यवाद म्हंटलं की मग नातं संपतं.. 🙂 आणि इथे तर ते नातं जिवंत आहे नेहेमीसाठीच 🙂

  5. काका, तुम्ही तर ब्लॉगिंगचा पूर्ण इतिहासच रेखाटलाय इथे..! खुपच मस्त झालाय लेख!

    अपर्णा आणि सोमेश दादाच्या प्रतिक्रियाही आवडल्या!

    • विशाल
      अरे औरंगाबादहून काही फार लांब नाही, येऊन जा एकदा… 🙂 याच निमित्ताने सगळ्यांच्या भेटी तरी होतील.

  6. उत्तम माहिती.
    <>
    या सुविधा असायलाच हव्या. त्या केवळ उपलब्ध असु नये तर उपयुक्त असाव्यात. या बाबत आंतरजालावर जागृती आपल्या ब्लॊगर नीधप करीत आहेत. त्यांचा प्रयत्न सुत्य आहे सर्वांची साथ हवी
    १) स्वच्छतागृहाची सफाई२) स्वच्छतेच्या बैलाला३) परत एकदा स्वच्छतेच्या बैलाला

    • प्रकाशजी
      आपलं म्हणणं अतिशय योग्य आहे. जागा ठरवतांना प्रसाधन गृह हा मुद्दा सगळ्यात आधी चर्चिला गेला आणि केवळ म्हणूनच विनामुल्य असलेले शिवाजी पार्क सोडुन त्या ऐवजी हे दासावा निश्चित् केले.

      आपण मेळाव्याला आलात तर आनंदच होईल. रात्री ७ ते ८ पर्यंत सगळं आटोपेल असे वाटते.

  7. dinesh says:

    Mahendraji,
    Melavyala Khup khup shubhechchya, Tasa mi faqt blog vachakach aahe, to hi naveen tarihi Melavyala yayachi khup ichcha aahe, pan 9 tarkhela vadodaryala meeting aslyamule hazar rahat yenar nahi, tyabaddal vait vatatay.

    Krupaya Badodyatil khadadi baddal (famour hotels) mahiti dyavi… tevdhach aswad gheta yeil (maza email id dilela aahe)

    Dhanyawad
    Dinesh

    • अजय
      तुम्ही आला असता तर बरं वाटलं असतं.. पण .. असो..
      खाली यादी दिलेली आहे मला माहिती असलेल्या चांगल्या रेस्टॉरंट्सची. त्यामधे संकल्प रेस्टॉरंटचे नाव गिनिज बुकात आहे. तिथे साउथ इंडीयन खूप छान मिळते. एकदा अवश्य ट्राय करा..

      मोती महल , अलका पुरी रोड, , हॉटेल एक्सप्रेस .
      राजधानी. बडोदरा सेंट्रल मॉल च्या समोर.
      संकल्प रेस्टॉ. जीईबी च्या बाजूला अल्का पुरी

  8. मस्त लिहिले आहे एकदम टू द पॉईंट. हा मेळावा नक्कीच आनंददायी होईल.

    • सोनाली
      आलिस का परत? कशी झाली ट्रिप??
      मेळाव्याला नक्की ये a ला घेऊन. सगळ्यात लहान ब्लॉगर म्हणून त्याला चॉकलेट देऊन सत्कार करु 🙂

      • काल सकाळीच आले. ट्रिप एकदम मस्त झाली.
        होय, मेळाव्याला छोटा ब्लॉगर ’a’ येणार आहेच, त्याला चॉकोलेट मिळणार मग तर काय एकदम खुशच हॊउन जाईल तो.

  9. sahajach says:

    मस्त झालाय मराठी ब्लॉगांचा प्रवास…..या विश्वाचा एक लहानसा घटक असल्याचा (सार्थ) आनंद नेहेमीच होतो मला…. आणि या विश्वाची ओळख तुमच्यामुळे झालीये त्यामुळे तुमचे तर नेहेमीच आभार!!!

    मी येण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे….. पण नेमक्या त्याच सुमारास इथे परिक्षा असतात शाळांमधे आणि तसेही आमची भारतवारी आहे जुनमधे!!! बघू या कसे जमते ते…कारण मी एकटी आले तरी गौराईचा प्रश्न आहेच…..तुम्हा सगळ्यांना भेटायचे मात्र अगदी आहे मनात…..यावेळेस जमले नाही तरी ट्रेकला गाठतेच तुम्हाला….तोपर्यंत फोटो आणि वृत्तांतावर समाधान 🙂

    • तन्वी
      करा प्रयत्न.. जमवा कसंही करून. अपर्णा पण येणार आहेच. श्री चं काही नक्की नाही अजूनतरी.
      हो, श्रावणात ब्रह्मगिरी ट्रेक नक्की आहेच.. दुसऱ्या सोमवारी 🙂 रोहनला पण बोलावतो तेंव्हा.

  10. sharad says:

    BLOG MELAVYALA HARDIK SHUBHECHCHA!!! TUMCHYA PHOTUCHI ANI MELAVYACHYA BATMICHI VAT PAHAT AHE… STUTYA UPAKRAM…

    • शरद
      तुमच्या शुभेच्छांची गरज आहेच. पण जमल्यास या मेळाव्याला. सगळ्यांच्या भेटी होतील.

  11. विनय says:

    महेंद्रजी,

    ह्या मेळाव्या बद्दल कळविल्याबद्दल शतश: आभारी आहे!!

  12. छान लिहल आहे ब्लॉगबद्दल….
    मी नक्की येणार…

  13. सचिन says:

    काका, भेटु या आता ब्लाग संमेलनात.

  14. काका, या ब्लॉगर मेळाव्यात ‘स्काईप’ थ्रू काही करता आलं तर बघा न जरा प्लीज. म्हणजे आमच्यासारखे जीवही इ-अटेंड करू शकतील मेळावा.

    • मेळाव्यात स्काइप थ्रू काय करता येईल? लॅप्टॉपला हाय स्पिड इंटरनेट कनेक्शन लागेल+ स्क्रिन+ एलसिडीप्रोजेक्टर… बराच व्याप दिसतोय, पण बघतो एक्स्पर्ट्स लोकांना विचारून.

  15. vidyadhar says:

    हेरंबशी सहमत….
    मी २८ मे ला येतोय….थोडक्यात हुकणार संधी!

  16. मला पण यायला आवडलं असतं पण मी १६ मे ला येतेय…….माझंही थोडक्यात हुकणार 😦

  17. vidyadhar says:

    काका,
    आमच्यासारख्यांसाठी ह्याच्या माध्यमातून काही होऊ शकतं का बघा ना! मलाही ठाऊक नाही हे एग्झाक्ट्ली कसं चालतं, पण कोणी माहिती देऊ शकेल इथलं वाचून. इथे पूर्वी एक इव्हेंट झाल्याचं आठवतंय.
    http://www.dimdim.com/

    • शब्द बंध तर्फे एक झाली आहे अशी मिट. पुन्हा एकदा शेडूल केलेली आहे त्यांनी . पुन्हा वेगळी मिट करण्यापेक्षा त्यांच्याच ( शब्दबंधच्या ) मिट मधे आपणही सामिल होऊ.

  18. सागर says:

    काका

    मी पन प्रयत्न करतो नक्की…रात्री परत इथे उशिर आलो तर रात्र बाहेर काधवी लगेल :(…बघु कस जमतय ते..

  19. ngadre says:

    vel thodi lavkarchi thevali tar mumbai baherun yenaryana,especially Pune, parat jayla margin rahil..

    8 nantar bus pakadali tar midnight la kadhitari Punyala pochnar..

    • नचिकेत
      ती जागा सायंकाळी ५ नंतरच अव्हेलेबल आहे. दुपारी दुसऱ्या कोणीतरी बुक केलेली आहे. आम्ही आधी तोच प्रयत्न केला होता.

  20. sharad says:

    mumbait 14 may la yenar ahe mee. thopdkyat sandhi huknar mazi… pan tumcha sagla report pahuch.

  21. Pingback: ’सकाळ’ मधे ’काय वाटेल ते’ « काय वाटेल ते……..

  22. Pingback: मराठी ब्लॉगर्स मेळावा -२०११ | काय वाटेल ते……..

Leave a reply to महेंद्र Cancel reply