भिमबेटका च्या २५ हजार वर्ष जुन्या गुहा, आणि गुहा चित्रं.

kayvatelte, कायवाटेलते, महेंद्र कुलकर्णी

ह्या पाटी मुळे खूप सोपं जातं जागा सापडायला.

आपल्याकडे काय आहे, आणि त्याचं महत्त्व किती    आहे हे आपल्याला दुसऱ्या  कोणी तरी सांगितल्या शिवाय समजत नाही. “भिमबेटका” या २५-३० हजार वर्ष जुनी चित्र असलेल्या गुहांबद्दल  पण असंच काहीसं घडलं.  जो पर्यंत २००३ मधे युनेस्कने या जागेला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा दिला  नाही, तो पर्यंत या जागेकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.     इथे लोकं यायचे ते फक्त आर्किओलजिकल सर्व्हेचे!   वर्ल्ड हेरीटॆज साईट्स बद्दल मला एक वेगळंच आकर्षण आहे. एक गोष्ट  मात्र प्रकर्षाने जाणवली,   की बऱ्याच वर्ल्ड हेरीटॆज साईट्स  आपल्या देशात असूनही त्यांच्याबद्दल स्थानिक लोकांना सुद्धा फार कमी माहिती आहे. कदाचित आपल्या देशात अशा खूप साईट्स असल्यामुळे  लोकांना याचं महत्त्व जाणवत नसेल.

आज जुने फोटो पहातांना एकाएकी काही जुने फोटो समोर आले, आणि त्या बद्दल लिहावं असं वाटलं ते फोटो होते भिमबेटका गुहांचे. शाळेत असल्यापासूनच आपण केव्हमेन किंवा पाषाण युगा बद्दल वाचत असतो. त्यांच्या बद्दल एक सुप्त आकर्षण प्रत्येकाच्या मनात असतं.  त्यांची रहाणी, जीवन पद्धती आणि ते कसे रहात असतील- काय खात असतील ? शाळेत असतांना तर अशा असंख्य गोष्टी  मनात यायच्या. एखादा अणकुचीदार दगड सापडला, की असेच दगड लाकडी काठीला बांधून ते शिकार करत असतील का हा प्रश्न तर मला   नेहेमीच पडायचा.

भोपाळला तुमच्यापैकी किती लोकं जाऊन आले आहेत? बरेच असतील, पण  भिमबेटका ही वर्ल्ड हेरीटेज साईट पहायला किती लोकं गेले होते- हा प्रश्न विचारला तर नक्कीच फार कमी लोकं हात वर करतील. मी कोणालाही या गोष्टीसाठी दोष देत नाही, मी स्वतः पण कित्येक वर्ष भोपाळला जाऊनही इथे गेलो नव्हतो. भोपाळ  पासून फक्त  ३५-४० किमी अंतरावर  भिमबेटका ही  एक जागा. कित्येक वर्ष ही जागा बुद्धीस्ट केव्ह च्या नावे ओळखली जायची.  या गुहा  बुद्धकालीन नाहीत हे कसे समजले याची पण एक कथा आहे.

उज्जैनच्या एका कॉलेज मधे प्राध्यापक आणि हे जगविख्यात  इतिहास संशोधक असलेले श्री वाकटकर  एकदा  १९५७ मधे भोपाळला ट्रेन ने जात होते. जाता जाता त्यांचं लक्षं या  ठरावीक विशिष्ट पद्धतीने रचलेल्या दगडी ढिगार्‍याकडे गेलं, आणि त्यांच्या  लक्षात आलं की हे काही तरी वेगळं प्रकरण आहे. नंतर त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी संशोधन करून इथे अशाच प्रकारच्या २४३  गुहांचा अभ्यास करून त्या बौद्ध कालीन गुहा नाहीत तर अती प्राचीन म्हणजे २०-३० हजार वर्ष जुन्या आदीवासी लोकांच्या रहाण्याच्या जागा आहेत  हे  सिद्ध केले.  या गुहां मधल्या  काही केव्ह पेंटींग्ज चे  फ्रान्स आणि स्पेन मधल्या गुहांशी असलेलं साधर्म्य  लक्षात आल्यावर,  त्यांनीच  ही गुहा चित्रे १० हजार ते ३० हजार वर्षापूर्वी काढलेली आहेत,आणि या  गुहामध्ये आदिमानवाचे वास्तव्य होते  हे  सांगितले.

वाकटकरांनी शोधल्यावर पण फक्त आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट सोडलं तर इथे कोणी फारसं येत नव्हतं. तसं म्हंटलं, तर  सर्वसामान्य लोकांना इथे गुहांमधे पहाण्यासारखं आहे तरी काय  हा प्रश्न आहेच. जुनी खंडहर पहाण्यासाठी पण एक  आवड असावी लागते. विंध्य पर्वतावर असलेल्या या गुहा साधारण पणे १० हजार ते २५ हजार वर्ष जुन्या आहेत. या गुहांमधे पूर्वी केव्हमेन ( आदीमानव ) रहायचे ,तेंव्हा  काढलेली पेंटींग्ज आहेत- पण त्यांना पेंटींग म्हणण्यापेक्षा भित्तीचित्रे म्हणणे जास्त योग्य होईल.

इ.स. २००३ मधे या गुफांचे महत्त्व  लक्षात घेता  युनेस्को ने वर्ल्ड हेरीटेज च्या यादी मधे या गुहाचा समावेश केलेला आहे. दुर्दैवाने जरी वर्ल्ड हेरीटेज मधे समावेश केला गेला असला, तरीही इथे  टुरिस्ट लोकांची फारशी वर्दळ नसते .

मला स्वतःला तसाही पुरातन वास्तू मधे किंवा आर्किओलॉजिकली महत्वाच्या जागांमधे फार जास्त इंटरेस्ट आहे. एकदा मी कामानिमित्य मुंबई हून भोपाळला जास्त असता एक ब्रिटीश माणूस शेजारी बसला होता. त्याने जेंव्हा या जागेबद्दल सांगितले , तेंव्हा  माझी मलाच ही जागा माहिती नसल्याबद्दल लाज वाटली होती.  पण तरीही ही जागा पहाण्याचा योग काही बरीच वर्ष येऊ शकला नाही.

त्या दिवशी भर दुपारची वेळ – साधारण चार वाजत आले होते. उन्हाचा दाह जरी कमी झाला असला, तरीही भोपाळचं उन्ह अंग भाजून काढत होतं . गुफांसाठी उजवी कडे वळा अशी एक पाटी पाहिली, आणि एकदा वळल्यावर फक्त पाच   मिनिटात गुहांपर्यंत पोह्चलो. कार थांबल्यावर पण एसी मधून बाहेर येण्याची इच्छा होत नव्हती. समोरच आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट चं एक तिकिटं घर दिसत होतं. थकला भागला एक जीव तिथे उगाच काहीतरी टाइमपास करत बसला होता. जर कोणी येणारच नसेल तर त्याने तरी काय करायचे??दोन तिकीट घेऊन आम्ही गुहा पहायला निघालो.

जरी एकंदर २४३ गुहा असल्या तरीही फक्त १८ गुफा लोकांना पहाण्यासाठी उघड्या ठेवल्या आहेत. समोर दोन मोठे दगडी पहाड दिसत होते. विंध्य पर्वताचा एक भाग असलेला तो पहाड  २५ हजार वर्षापूर्वीच्या तिथल्या समाज जीवनाचा एक भाग होता ही जाणीव मनाला स्पर्श करून गेली.  इथे या जुन्या  गुहा पहाणं म्हणजे एक अनुभव आहे, तो शब्दांमधे मांडणे फार कठीण आहे.  इथे अजूनही बरीच झाडी दिसते, पण पूर्वीच्या काळी इथे घनदाट अरण्य असावे . जितकं जास्त झाडी तितकी जास्त गुहांची गरज. जंगली प्राण्यांपासून आणि उन्ह पावसापासून संरक्षणासाठी गुहा या हव्याच.

गुफांमधे रहात असतांना तेंव्हाच्या आदिमानवांनी काढलेली चित्रं ही जगातल्या पहिल्या कलाकृतींपैकी एक आहे. इतक्या उंचावर चढण्याची काही सोय नसल्याने  झाडावर चढून , एखाद्याच्या खांद्यावर उभे राहून ही चित्रं काढली गेली असावी . पहिल्या गुहे मधले चित्र जेंव्हा आपण पहातो तेंव्हा ते एखाद्या लहान मुलाने काढलेल्या चित्रासारखे वाटते. पांढऱ्या रंगाच्या रेषांनी तयार झालेले ते चित्र पाहिल्यावर, हे चित्र २५ हजार वर्षापूर्वी  काढले आहे ही जाणीवच एकदम अंगावर शहारे आणणारी ठरली. चित्र पहात होतो, पण मनात मात्र विचार सुरु होते, कसे रहात असतील बर ते आदिमानव इथे??

इथे या गुहा पहात असतांना तुम्ही पण त्या काळात जाऊन पोहोचता. भिंतीवर पांढऱ्या , लाल रंगात २५ हजार वर्षापूर्वी काढलेली चित्रं अजूनही पहाता येतात.  २५ हजार वर्ष उन्ह, पाऊस, वारा, थंडी झेलुन पण ही चित्र इतक्या चांगल्या अवस्थेत कशी काय राहिली हा प्रश्न पडतो. मिनरल्स, झाडांपासून तयार केलेले रंग,झाडाचा गोंद, रक्त  वापरून ही चित्रं बनवलेली आहेत. या रंगाचा ज्या दगडावर ही चित्र काढ्ली आहेत, त्या दगडावर  रंगाचा – ऑक्सिडेशनचा परिणाम झाल्याने ही चित्रे आजपर्यंत शाबूत आहेत.

एकंदर १८ गुहांचा हा समुह लोकांना पहाण्यासाठी ठेवलेला आहे. दिड दोन किमी अंतरामधे या गुहा पसरलेल्या आहेत. या रस्त्यावरून चालत जातांना आपल्या नकळत आपण त्या काळात जाऊन पोहोचतो आणि हा दिड दोन किमी चा ट्रेक एक वेगळाच अनुभव देऊन जातो.

जगा मधे अशा प्रकारची केव्ह पेंटींग फक्त स्पेन आणि फ्रान्स मधे आहेत असे म्हणतात. इतकी महत्त्वाची जागा आपल्याकडे आहे हे सांगायला युनेस्कोला यावं लागतं, आणि वर्ल्ड हेरीटेज म्हणून घोषित करावं लागतं. आणि युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज म्हणून घोषित  केल्यावर पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही हे वाक्य मी इथे येणाऱ्या व्हिजिटर्सच्या संख्येवरून लिहितोय. असो.. जर कधी भोपाळला गेलात तर एक वेळ बडी मस्जिद, बडा तलाव वगैरे पाहिला नाही तरी हरकत नाही, पण  ही जागा पहायला  मात्र नक्की विसरू नका. एक वेगळाच अनुभव देणारी जागा आहे ही .

This slideshow requires JavaScript.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , . Bookmark the permalink.

44 Responses to भिमबेटका च्या २५ हजार वर्ष जुन्या गुहा, आणि गुहा चित्रं.

 1. वाह… मीसुद्धा ह्याबद्दल कधी ऐकलं नाही 😦 😦

  २५ हजार वर्ष जुन्या म्हणजे निव्वळ अल्टिमेट. एका अर्थी बरंय जास्त वर्दळ नाही इथे, पण एकदम दुर्लक्षित नको व्हायला. गुफा मस्त आहेत. फोटो आवडले. 🙂 🙂

  • अप्रतीम जागा आहे.फोटोग्राफी मधे इंटरेस्ट असणाऱ्याने नक्की पहायला हवी अशी जागा आहे ही.

 2. kadhee na paahilelee jaagaa pahayala miLaalee. photo chaangale aahet-krishnakumar

 3. ninad says:

  मस्त माहिती दिलीत.
  आता केट सोबत भारत दर्शनच्या यादीत हे ठिकाण सामील करण्यात आले आहे.
  बाकी २५००० वर्षापूर्वी युरोप आणि भारतातील आदिमानवांच्या भित्त चित्रांमध्ये सारखे पणा होता हे वाचून नवल वाटले. आता गुगल अंकल ला विचारून अजून साम्य स्थळ शोधून काढतो.

  • निनाद

   अवश्य जाऊन ये .. छान जागा आहे, गर्दी पण फारशी नसते. खाण्यापिण्याचे सामान बरोबर नेले नाही तरी चालू शकते, फक्त पाण्याच्या बाटल्या बरोबर ठेव.

 4. काका, तुम्ही अशा जुन्या जागांबद्दल लिहिता तेव्हा त्या वर्णनामुळे तुमच्याबरोबर तिकडची ट्रीप झाल्यासारखी वाटते आणि प्रत्यक्ष भेट न दिल्याची हळहळही तेवढीच वाटत राहते !! Ancient Aliens मध्ये या गुंफांचा उल्लेख आहे बहुतेक. पहिल्या किंवा दुसऱ्या सिझनमध्ये..

  सुपर्ब पोस्ट !

  • हेरंब
   मला पण आठवतं अ‍ॅनशिअंट एलियन्स मधे अशीचित्रं पाहिल्याचं> पण तीचित्र स्पेन मधलीहोती असे वाटतेल

 5. Raj Jain says:

  धन्यवाद काका, मी जाणार बघायला !!!!

 6. chalatmusafir says:

  छान वाटलं वाचून. जुन्या आठवणी जाग्या झाल्या!

  मध्य प्रदेशातून ४-५ वर्षांपूर्वी एकदा कारने प्रवास करताना भीमबेटकाला थोडा वेळ थांबलो होतो. इथे लिहिलंय पहा:
  http://chalatmusafir.wordpress.com/2009/05/05/198/
  —-
  पंचमढी तिथून एकदम जवळ आहे. (सुमारे १५० किमी). त्याबद्दल इथे लिहिलंय:
  http://chalatmusafir.wordpress.com/2009/05/04/quiet-charms-of-pachmarhi/

  • संजीव

   धन्यवाद.. मस्त ब्लॉग आहे तुमचा. बऱ्याच जागा कव्हर केल्या आहेत.. 🙂 धन्यवाद.

 7. Vikram Kulkarni says:

  भिमबेटका ची आख्यायिका अशी सांगतात की ते एकावर एका ठेवलेले दगड भीमाने ठेवलेले आहे.

  अशीच अजून एक जागा पहाडिया म्हणून होशंगाबाद जवळ आहे.
  तिथे पण भित्तीचित्रे आहेत. त्या ठिकाणी तर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचे पण लक्ष गेलेले नाहीये.

  तसेच जवळ भोजपूर आहे. जगातले सर्वात मोठे शिवलिंग भोजपूरला आहे.

  • विक्रम
   ती अख्यायिका मला माहिती नव्हती.. नाहीतर लेखात कव्हर केलीअसती. होशंगाबादला कधी गेलो, तर मी त्या जागी नक्की भेट देईन .

 8. shradha Kulkarni says:

  mast post kaka. photo avadale.

 9. या गुफ़ांबद्दल ऐकले होते पुर्वी कधीतरी. पण तुम्ही तर डोळ्यांसमोरच उभ्या केल्यात दादा. एकदा का होइना जायला हवे इथे. आभार्स पुन्हा एकदा 🙂

  • विशाल
   एक जिवंत अनुभव आहे इथली भेट म्हणजे. २३ हजार वर्षापूर्वीचे चित्रं पहातांना खरंच मनात काय्काय विचार येतात ते सांगता येत नाही. एक वेगळाच अनुभव आहे इथली व्हिजिट म्हणजे.

 10. bolMJ says:

  अप्रतीम फोटो 🙂

 11. Mangesh Nabar says:

  अत्यंत माहितीपूर्ण असा लेख. धन्यवाद मानावे तितके थोडे. आमच्या सर्व भटक्या व इतिहासात रुची असणा-या मित्रांना तुमच्या अनुदिनीचा दुवा पाठवत आहे.
  मंगेश नाबर.

  • मंगेश

   धन्यवाद.. भटक्यांना नक्कीच आवडेल अशी जागा आहे ही. मी इथे चार तास काढले.. 🙂

 12. alak patil says:

  Bhimbetaka baddal lihilet he phar bare kele, konala ya jagebaddal kahihi mahit naste. kiti vegli jaga aahe, aapla sanskrutik thevach ki ek. photo pan surekha aahet,jayla aavdel agdi.

 13. arunaerande says:

  नेहेमीप्रमाणेच अप्रतीम लेख आणि फोटोज.

 14. अप्रतिम लेख आणि Photos …! 😀
  अजून एकदा ज्ञानात खूप छान भर पडली , खरच आपणच आपल्या ऐतिहासिक वास्तुंच जतन करून ठेवायला हव
  आणि अश्या वास्तुना आवर्जून एकदा तरी भेट द्यायलाच हवी प्रत्येकाने … 🙂

  • आदिती,
   मी स्वतः भोपाळला २५ पेक्षा जास्त वर्षापासून जातोय, पण इथे जाणे झाले नव्हते. वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही.. 🙂 प्रतिक्रियेसाठी आभार.

 15. kiran more says:

  kup chan mahiti deli aahe

 16. pratima says:

  खरय काका , आपल्याकडे काय आहे, आणि त्याचं महत्त्व किती आहे हे आपल्याला दुसऱ्या कोणी तरी सांगितल्या शिवाय समजत नाही. असो पण अशा जागा बघताना एक वेगळाच अनुभव मिळतो.लेख अप्रतिम ….आणि फोटोंमुळे अगदी प्रत्यक्ष बघितल्या सारखे वाटते.

 17. महेश कुलकर्णी says:

  सुंदर माहिती .मस्त ब्लोग फोटोंमुळे अगदी प्रत्यक्ष बघितल्या सारखे वाटते…;;;;;”””””””’

 18. Guru says:

  मायला इतका रिसर्च झालाय त्याच्यावर की मला ती साईट सोडावी लागली रिसर्च मधनं माझ्या…… पेलियोलिथिक युग म्हणजे प्रथमपाषाण युगातली ही चित्रे आहेत. जबरजस्त चीज है!!!!! धन्यवाद काका मस्त फ़ोटो टुर झाला

 19. Yogita says:

  Khup chan mahiti dili ahe tumhi.ani kahi photo tar apratim ahet agadi!aplyakade etka sunder theva asunpan aplyala tyachi janiv naste he vachun vait vatal.

 20. Suhas says:

  mast lekh lihila aahe ….kharach aashe barech sundar spot aahet je aajun prasidhis nahi aale ……photos pan chan aahet …….aata kadhi jaycha yog aala tar nakki pahavase vatel … 🙂

  • सुहास,
   नक्की भेट द्या.. मस्त जागा आहे.

   • Suhas says:

    sir …tumchya peksha khup lahan aahe me vayane…adarane tar me bolnar na… 🙂 …. aajun student aahe me …..mala aata aata vachnachi savay lagat aahe… khup divas ugach vaya gele ……mhanla aaplya matrubhashe pasunach survat karu…blogs ani kahi choti pustaka vachayla survat keli ……pan kharach vachanat pan maja aahe he adhi lok bolay che mala samjay cha nahi ….pan aata me hi anubhavat aahe ……. ssb interviews madhye vicharnar vachnachi aavad aahe ka nahi mhanun khara survat keli …pan etke sundar material aata milat aahet vachayla …ki kharach vata ugach etka ushira aakal aali mala… 🙂

 21. ni3more says:

  kaka ekdum masata lekh lihila ahe tumhi aani tumhi je photo kadhale ahe te hi chan ale ahet tumchya mule ajun ek mahiti milali mala

 22. maze vichar says:

  kaka ,khupach chan sangitala aahe
  kharach ithe ekda tari jave ase vatate
  aani mee ekda jaelach hya thikani

  tmhala sangto
  ashich ek jaga aahe

  amche mul gaon
  jalgaon jilha kanalda gaon ahe
  hya thikani aaplya bharat deshache nav jya rajyachya navavarun thevle aahe tya bharat rajachya janmache thikan ,hya thikani puranatil rishi vishwamitra aani swarga apsara urwashi
  yanchi kannya SHKUNTALA hicha mulaga raja BHARAT yancha janma zala aahe
  pun aajun hee he thikan konala mahiti nasav ase mala watate,
  hya thikani khup mothe kholwar ashya 7 guffa ahet ,aani ek ashram ahe MAHABHARATACHYA purviche amhi nehami ithe jato pun ase watate ki hya thikani sanshodhan zale pahije pun hi jaga baherchya kwachit lokanna aani hya gawatlaya lokanpuratach mahit ahe
  pun tumhi sangtat tase he thikan jashe puratatwa vibhagala mahit nasave,maze aajoba ethalya kahi goshti sangatat ………….aajun barech kahi aahe hya thikani jar jamel tar nakki jaun ya ithe ekda tari……………..

  • वाह.. क्या बात है.. ही जागा कानल्डा गाव जवळच आहे का जळगावच्या? कधी गेलो तर नक्की जाईन. कसं जायचं?

 23. Yashwant Wagh says:

  Atishay mahatvapurn mahiti milali Sir,shalet abhyaskramat bhimbetkacha kala itihas shikavtana aaplya maulyavan mahitichiyachi nakki madat hoanar aahe .Dhanyawad Sir.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s