म्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.

काही वर्षापुर्वी आमच्या नागपूर ऑफिस ला कामानिमित्य जाणे झाले. तसं पाहिलं तर नागपूर ऑफिस लहानसे होते. इन मिन १६ लोकं होते काम करणारे, आणि एक १७वी चंदा नावाची मुलगी. ती रोज सकाळी येऊन झाडणे, टेबल स्वच्छ करणे डस्टबिन्स स्वच्छ करणे वगैरे काम करायची. पण ह्या वेळी मात्र चंदा सोबतच अजून एक मुलगी दिसली. साधारण पंचविशी मधली असावी. कपाळावर ठसठशीत कुंकू, गळ्यात दोन पदरी मंगळसुत्र आणि जुनीच पण स्वच्छ साडी नेसलेली. ती टेलेक्स मशिन वरून आलेले  टेलेक्स मार्क करून प्रत्येकाच्या टेबल वर आणुन ठेवत होती. आमच्या ऑफिस मधे नवीन भरती, आणि ती पण प्युनच्या लेव्हलची गेल्या कित्येक वर्षापासुन बंद होती, तेंव्हा ही कोण? हा प्रश्न अस्वस्थ करत होता.

समोर बसलेल्या मित्राला विचारले, ही कोण रे? तर म्हणाला ही संजय ची बायको रोहिता! संजय  म्हणजे कंपनीच्या जीपचा ड्रायव्हर. नबाब खान म्हणून एक ड्रायव्हर रिटायर्ड झाल्यावर, त्याच्या जागी ह्या संजयला डेली वेजेस वर ठेवले होते कामाला. २५-२६ चा संजय एक दिवस अचानक पणे हार्ट बर्न ने गेला. अगदी काही  कारण नव्हते जाण्याचे! . घरची परिस्थिती म्हणजे हातावरचे पोट. आकस्मित पणे वारल्या मुळे त्याची मुलगी आणि लहान मुलगी एकदम रस्त्यावर आली ,शेवटी नागपुरच्या ब्रांच मॅनेजरने  तिला मदत म्हणुन डेली वेजेस वर कामावर ठेवलं.  तशी रोहिता शिकलेली. चक्क दहावी पास झाली होती. तेंव्हा आलेले टेलेक्स वगैरे किंवा डाक कोणाच्या नावे आहे, ते तिला समजायचे,म्हणून प्युन चे काम तिला दिले गेले.  तिचा काम करण्याचा आवाका वाखाणण्यासारखा. नोकरीची गरज असलेला माणुस कधी पण लक्षात येतो.तर असो, इथे विषय रोहिताचा नाही.

एक गोष्ट मात्र सारखी खटकत होती,संजय वारला, म्हणजे ही विधवा, मग गळ्यात मंगळसुत्र आणि कपाळाला कुंकू कसे काय? थोड्या वेळाने ती टेबलवर चहा घेऊन आली, तेंव्हा तिला विचारलेच, तर म्हणाली,  आज हे जरी नसले तरी आजही ह्या मंगळसुत्राचा आणि कुंकवाचाच तर आधार आहे. सुरुवातीला काही दिवस हे वापरणं बंद केलं होतं, तर लक्षात आलं, की विधवेकडे पहाण्याचा लोकांचा दॄष्टीकोन अजिबात चांगला नसतो, इनडायरेक ऍडव्हान्सेस, आणि इतर वेळी हिचा नवरा नाही , म्हणजे ही आता ऍव्हेलेबल आहे, ह्या भावनेतुन लोकांच्या केल्या गेलेल्या कॉमेंट्स चा खूप त्रास व्हायचा. स्वतःचाच राग यायचा, मी काय ’तशी” बाई आहे का? आणि जर  नाही तर माझ्याकडे हे लोकं असे का ऍप्रोच होतात? पण नंतर मात्र  गळ्यात काळी पोत, आणि कपाळाला कुंकू  पुन्हा चिकटवले आणि  लोकं एकदम अदबीने वागतात, एक प्रकारचा दरारा असतो ह्या कुंकू/मंगळसुत्राचा! कोणी तरी आहे, ह्या स्त्री च्या मागे, ही एकटी नाही . म्हणुन पुन्हा वापरणे सुरु केले आणि हा त्रास   अगदीच संपला जरी नाही तरी आटोक्यात आला.

तसेही अगदी लहान असतांना पासुन कपाळावर टिकली लावायची सवय , लग्न झाल्यावर कुंकू मधे बदललं. सवयीचा भाग म्हणुन संजय गेल्यावर काही दिवस रोज सकाळी कुंकवाच्या बाटली कडे हात जायचा, पण नाही, आता ते लावायचं नाही , कारण संस्कार आडवे यायचे. पण आता मात्र  विश्वास बसलाय की कुंकवाची टिकली आणि मंगळसूत्र म्हणजे स्त्री चे एक अदृष्य शस्त्रंच असतं. कोणाची हिंमत होत नाही सहजपणे वाईट नजरेने बघायची.

एकदम पटलं तिचं बोलणं. घरात अगदी म्हातारा नवरा असला, तरीही समाजात किंमत असते स्त्रीला, ही गोष्ट वाईट की चांगली ह्याचा उहापोह करत नाही. पण ही एक सत्य परिस्थिती आज नाकारता येत नाही. लग्न न झालेली सिनेमा नटी , सगळ्यांची स्वप्न सुंदरी असते, पण एकदा तिचे लग्न झाले की मग मात्र बऱ्याच जणांच्या स्वप्नातूनही तिची हकालपत्ती होते. मानवी स्वभाव आहे हा. एखादी अती सुंदर स्त्री जर एखाद्या अगदी मरतुकड्या माणसाबरोबर जात असेल, तरी पण तिला छेडायचा कोणी प्रयत्न करत नाही. एक अनामिक भिती असते लोकांच्या मनात. हेच कारण असावे, की पुरातन काळापासून एक म्हण चालत आली आहे, “म्हातारा नवरा, कुंकवाला आधार!” अगदी चार शब्दात स्त्री चं आयुष्य  रेखलं आहे. पटॊ अथवा, ना पटॊ, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक, Uncategorized. Bookmark the permalink.

2 Responses to म्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.

  1. Deeoak says:

    chhan vishay mandalay

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s