मुलं लहान असताना , अगदी उन्हाळ्याच्य सुटयांमध्ये पण मुलांना कुठले तरी क्लासेस लावून द्यायचे, कराटे वगैरे शिकवायचे, गाणी , किंवा एखादे वाद्य वाजवायला शिकवण्याची पद्धत सुरु झाली आहे. मुलांचया बाबतील असलेला पझेसिव्हनेस फक्त मुलगा/मुलगी १० वि किंवा `१२वी पर्यंत असतो. मुलांच्या करियर च्या बाबतीत इतके जागरूक असलेल्या पालकांना एकदा १० वी झाली की एकदम थ्री इडियट आठवतो, आणि मुलांना तुम्ही जे करायचे ते करा, आम्ही तुला सपोर्ट करू वगैरे म्हणणे सुरु करतात.
खरं तर या वयात मुलांना भविष्या बद्द काही फार समाज नसते, आपले चार मित्र जे करतात, तेच करणे म्हणजे कूल…. असा काहीसा गैरसमज झालेला असतो. त्यांना ज्या गोष्टी मध्ये फार कष्ट करावे लागत नाही, किंवा थोडे कष्ट केल्यावर खूप कौतुक केले जाते, अशा गोष्टींमध्ये जास्त रस वाटायाला लागतो , आणि अर्थात अभ्यासाकडे दुर्लक्ष केले जाते. मग या मध्ये शनिवार रविवारी ट्रेकिंग ला जाणे, किल्ल्यावरचा कचरा स्वच्छ करणे वगैरे गोष्टी पण आल्या.
इंजिनिअरिंग किंवा मेडिकल तर काय, कोणीही करते, त्यात काय विशेष? मी काहीतरी जगावेगळं काही तरी करायचे आहे असे जर आमचा मुलगा/मुलगी म्हणत असेल तर त्याला नकार ना देता, तुला हवे ते तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच असे म्हणणारे पालक जरा जास्त वाढले आहेत. आपल्या मुलाला आंधळे पणाने सपोर्ट करताना, आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल आपण काही जबाबदार आहोत ही गोष्ट पालक विसरतात. अहो, १६ -१७ वर्षांचा मुलाचा आयक्यू तो किती? त्याला भविष्या बद्दल समज असते का ? आणि मग अशा परिस्थिती मध्ये मुलांना आंधळे पणाने पाठिंबा देणे कितपत योग्य?
लहानपानापासून अशा काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये लहान मुलांना भाग घ्यायला लावायचा, आणि मग एखाद्या कार्यक्रमात बक्षीस वगैरे मिळाले कि नातेवाईकांत आणि शेजार पाजार्यात कौतुक झाले की मुलांना अभ्यासा पेक्षा या अशा ऍक्टिव्हिटीनेज मध्ये जास्त रस वाटू लागतो, आणि अभ्यासा कडे दुर्लक्ष होते.
हा प्रश्न अगदी वैय्यक्तिक आहे,पालकांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आजचा त्यांचा निर्णय मुलांचे भविष्य बनवू किंवा बिघडवू शकतो.
जवळपास ५ -६ वर्षांनंतर काही लिहितोय, लिखाणाची लिंक नीट लागत नाही, असो..
तुमचे लिखाण खूप मिस केले.. मी गेली 4-5 वर्षे अधूनाधून तुमचे ब्लॉग वाचत असतो. तुमच्या आयुष्यावर लिहिलेली लेखमाला 2-3 वेळा वाचली आहे. लिहिते रहा.
कृपया दररोज लिहीत जा. तुमचं लिखाण सोप्या भाषेत जरी असेल तरी मनातून, रास्त लिहिता. विषय मग कोणताही असो तुमचे मत तुम्ही व्यक्त करता हे खूप महत्त्वाचे आहे.
खुप छान वाटलं सर, तुमचं लिखाण पुन्हा वाचताना …