इमु..

काल सकाळी वाड्याला जाउन आलो. सकाळी जेंव्हा निघालो, तेंव्हा अपेक्षा होती की काम आटोपून आपल्याला परत यायला रात्र होईल. पण काम थोडं लवकर  ( संध्याकाळी ५ वाजता)आटोपलं, आणि लवकर निघालो.

हा भाग कोंकणात येत नाही. वाडा म्हणजे भिवंडी आणि जव्हार च्या मधल्या भागात येतं . हा भाग आदिवासी भाग म्हणूनच ओळखला जायचा. अजूनही इथे जव्हार पर्यंत सिंगल लेन रोड आहे, आणि रस्ता खराब आहे.जातांना दोन्ही बाजुला ओसाड शांतता दिसत होती. भिवंडी क्रॉस केल्यावर थोड्याच वेळात, अचानक रस्त्याच्या डाव्या बाजुला एक बोर्ड दिसला- ’ईमु फार्मींग’ चा!! या इमु फार्मिंग बद्दल बरंच ऐकलं होतं, त्यामुळे मनात एक गोष्ट रजिस्टर झाली.. की घरी परत जातांना जर अंधार झाला नाही, तर नक्कीच हे फार्म बघायचं- म्हणजे खरा इटरेस्ट त्या ’इमुला’ बघण्यात होता.

दुपारचं काम आटोपल्यावर मनसोक्त खाणं झालं, आणि आम्ही मुंबईला परत निघालो. सदु साहेब सोबत होतेच.. म्हणजे खादाडी अगदी मनसोक्त, आणि व्यवस्थित होणारच!!  कडकडीत उन्हातून एसी रेस्टॉरंट मधे शिरलं की  एकदम थंड पेयाची इच्छा होतेच.. काम झालं होतंच, म्हणून मग किंग फिशर +तंदुरी पापलेट आणि प्रॉन्स कोलीवाडा ऑर्डर केलं. आता ते प्रॉन्स इतके लहान होते, की त्याल झिंगे म्हणायचे की प्रॉन्स.. याचा विचार करित एक प्रॉन्स चा तुकडा जिभेवर सरकवला.. माझ्या सारख्या मत्स्याहारी खवय्याला प्रॉन्स म्हणजे पर्वणी, पण शेल फिश ची असलेली ऍलर्जी लक्षात घेता, फक्त दोन तीन पिस खाल्ले. पापलेट तर अप्रतीम होतं.. झाल्यावर पुन्हा फिश करी राइस संपवून आत्मा शांत झाला. 🙂

imu

इमु कॅमेऱ्यावर चोच मारण्याच्या तयारीत.

असो..तर परतीच्या वाटेवर , तेच रोड साईन पुन्हा दिसलं. इमू फार्मचं..त्या बोर्ड वर एक नांव अन सेल फोन नंबर होता. त्या नंबरला फोन करुन फार्म कुठे आहे? आणि आम्हाला पहाता येईल का ?? अशी चौकशी केली. फार्मच्या मालकाचाच तो नंबर होता. त्याने फार्म वर कसे जायचे ते विचारले . फार्मचा मालक म्हणाला की तो तर फार्म मधे नाही, पण तुम्ही फार्म वर जाउन पक्षी बघू शकता, फार्म वर  शंकर नावाचा एक माणुस आहे त्याला भेटा, तो सगळं दाखवेल.

मुख्य रस्त्यावरुन डावीकडे वळलॊ, आणि कच्च्या रस्त्यावर गाडी घातली. ड्रायव्हरच्या चेहेऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता, खराब रस्त्यावर गाडी न्यायला लावली म्हणुन. पुढे दोन किलोमिटर कच्चा रस्ता तुडवल्यावर समोर एक घर दिसलं. बाजुला एक मोठा गोठा, त्यात गाई, म्हशी, अन घोडे- अरे हो.. खरंच दोन घोडे पण होते. मालक शौकीन दिसत होता 🙂

imu

चार ते पाच फुट उंच असतो हा पक्षी..

आमची गाडी पार्क केली – समोरच्या दारावर कुत्र्यापासून सावधान  असा एक बोर्ड दिसला. त्या फार्मच्या समोर एक मरतुकडा कुत्रा बसलेला होता.. तेंव्हा आता कुत्र्याला घाबरायचं की अजुन कुठल्या दुसऱ्या कुत्र्याला??    सोबत सदु साहेब होते ते एकदम हसायला लागले -म्हणाले तो कुत्रा ज्याला घाबरायला सांगितलंय तो दुसरा…असेल हो.. जरा सांभाळून  चला.  एखादा मोठ्या कुत्र्याच्या  अपेक्षेने   आम्ही जरा सांभाळून समोर गेलो.  तेवढ्यात त्या मरतुकड्या कुत्र्याने आमच्या कडे एक तुच्छ दृष्टी ने पाहिले, आणि पुन्हा डोळे बंद करुन आपल्या वामकुक्षी मधे बिझी झाला.मोठा कुत्रा दिसला नाही कुठेच.

न पाहिलेल्या कुत्र्याला घाबरत आम्ही आत शिरलो.  समोर याक सारख्या उग्र वासाचे भले मोठे पक्षी होते एका कंपाउंड मधे . त्याला तारेचं कम्पाउंड घातलं होतं. आम्ही जसे तारांच्या जवळ पोहोचलो, तेवढ्यात तो शंकर आला धावत.त्याला सांगितलं की तुझ्याच साहेबाने दाखवायला सांगितलं फार्म,तर काहीच चौकशी न करता त्याने मान

इमु, imu farming

ऑलमोस्ट कॅमे्यावर चोच मारलीच होती त्याने ..

डोलावली.

आम्ही त्या तारेच्या कंपाऊंड जवळ गेलो तर बरेच पक्षी आत बागडत होते. आता करायला काहीच काम नाही तर करतील तरी काय ?? जसे आम्ही जवळ पोहोचलो तसे त्या पैकी दोन फ्रेंडली इमु आमच्या कडे आले. आणि मान उंचावून बघू लागले. इतका भारदस्त आणि सुंदर पक्षी कधीच पाहिला नव्हता. शहामृगाच्या कुळातला हा पक्षी खूपच सुंदर दिसतो . स्पेशली याचे डोळे खूप बोलके वाटले. जसा मी फोटॊ काढायचा प्रयत्न केला तसा, त्याने मान उंचाउन सेल फोनचा घास घ्यायचा प्रयत्न केला. आणि जमलं नाही म्हणून चोच मारणे सुरु केले . कॅमेरा उंच केला, तर त्याने पण आपली मान उंच केली. जवळपास ५फुट उंचीचा हा पक्षी खूप ग्रेसफुल दिसतो

imu

यांना वाटलं की आम्ही खायला आणलंय काही म्हणुन.. हे दोघं ओव्हर फ्रेंडली होते..

थॊडावेळ तिथेच त्याची चोच चुकवून फोटो काढले. शंकर म्हणाला, साहेब हे पक्षी आता अडीच वर्षाचे आहेत. अजुन सहा महिन्यात यांची वाढ पुर्ण होईल. आणि मग ते बाजारात पाठ्वले जातील. शंकर बोलत होता, मी त्या पक्षाकडे पहाण्यात व्यस्त होतो. त्याचे ते खोडकर ब्राउन डोळे सारखा माझा मागोवा घेत होते. एक लक्षात आलं की हा पक्षी खूप हुशार आहे..:) आणि याचं पण वाईट वाटलं याचं आयुष्य अजुन फक्त सहाच महिने????

शंकर सांगत होता, ह्याचं नॉर्मल लाइफ हे २५ वर्ष असतं. या पैकी काही माद्या पाळल्या जातिल अंड्य़ांसाठी. यांचं अंड हे खरबुजा इतकं मोठं असतं, पण आम्हाला पहायला मिळालं नाही. एका वर्षात मादी साधारण ३० अंडी देते.  कालच मार्केटला पाठवलीत असं म्हणाला तो माणुस. याचं अंडं दोन ते अडिच हजार रुपयाला एक या भावाने, आणि मांस ४०० ते५०० रुपये किलॊ च्या भावाने विकले जाते. केवळ खाण्यासाठी म्हणूनच याचं प्रजनन आणि संगोपन केलं जातं.

शेतकऱ्यांना कॅश पैसा मिळवून देणारा हा पक्षी पाळणं खूप सोपं आहे. आणि कदाचित अर्जुनही याचं फार्मिंग कॉमन होईल लवकरच असे वाटते.. इथे आल्यावर सुरुवातीला रोग राई ने बळी पडेल असे वाटले होते, पण लवकरच ह्याने भारतीय हवामानाशी जुळवून घेतले.

याच्या शरिराचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. पिसांपासुन तर चामडी पर्यंत. यांच्या स्किन मधुन तेल निघतं, ते पण उपयोगी असतं

कंपाउंड बरंच मोठं असल्याने चांगली जागा आहे त्यांना फिरायला.

असं म्हणतात.. भारतीय शेतकरी आपल्या ठरावीक साच्यातून बाहेर येत आहेत हे पाहून बरं वाटल्ं. फक्त जशी गोट फार्मिंगची खूप गाजावाजा करुन सुरू झालेली योजना बंद पडली, तसं याचं होऊ नये..

तिथुन निघालो, पण निघतांना तो सुंदर भारदस्त पक्षी – की उडता येत नाही म्हणून त्याला  प्राणी म्हणायचं? त्याने माझ्या मनात घर केलं.. आणि नकळतंच  त्याचे ते ब्राउन डॊळॆ आठवत स्वतःलाच प्रॉमिस केलं.. हा पक्षी  कधीच खायचा नाही..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

38 Responses to इमु..

  1. gouri says:

    शहामृगाचा धाकटा भाऊ वाटतोय हा इमु.

    तुम्हाला परत निषेध खलिते येणार बघा … इमुविषयीची पोस्ट असली, तरी तुम्ही खादाडीचा फोटो टाकलाय त्यात 🙂

    • ते ओघा ओघाने आलं. मुद्दाम नाही टाकलं ते.. आमचे सदु साहेब असले की खाण्यापिण्याची चंगळ असते.. 🙂

  2. mugdha says:

    Chennai javal ek asaach IMU chaa farm aahe…tyachi aathvan aali photos pahun..

  3. अरे वा पहिल्यांदाच ह्या पक्ष्या बद्दल ऐकण्यात आला, अगदी छोट शहामृगच वाटत. नक्की भेट देईन तिथे जर ऑन द वे जाता आला तर…

    • दिसायला पण अगदी शहामृगासारखाच दिसतो. याच्यापासुन काढलेलं तेल पण खुप महाग असतं.. ८००रुपये २०० एम एल..
      खुप भारद्स्त प्राणी आहे .. अवश्य पहायला हवा..

  4. तुम्ही सारखे सारखे खाण्याचे फोटो का टाकता? इकडे जठराग्नी प्रदिप्त होतो ना! मी देखील इमू पालना बद्दल ऐकलं होतं. तुमच्या पोस्टने इमू फार्मची व्हर्च्युअल सहलच की हो घडवली! गोड दिसतोय हा पक्षी. कॅमे-यावर चोच मारतोय, पण हसतोय असं वाटतं. त्याच्या खालचा तो दोन ओव्हर फ्रेंदली इमूंच्या फोटोमधला डावीकडचा इमू तर खूपच एक्साईटेड दिसतोय आणि तो पहिला – कॅमेऱ्यावर चोच मारण्याच्या तयारीत असलेला इमू… अरे बापरे… इतक्या जवळ जाऊन फोटो काढलेत? हे पक्षी माणसाळल्यामुळे खूप धीट बनलेत असं वाटतंय. मी एकदा अष्टविनायकाच्या यात्रेला जातान बसमधून एका फार्मचं दृश्य पाहिलं होतं. खूप हिरवळ आणि त्यावर दोन घोडे चरत होते. त्यावेळी कॅमेरा सोबत नसल्याची खूप चुटपूट लागून रहिली, इतकं सुंदर दृश्य होतं ते!

    • आवडीची गोष्ट आहे ती..त्यामुळे कुठल्याही पोस्ट मधे ते टाकल्या जातातच.. 🙂 खरंच खुप मस्त आहे हा पक्षी . असा घुमल्या सारखा आवाज काढतो. खुप माणसाळलेला आहे. कंपाउंडच्या शेजारची जागा मी बदलली की हा पण माझ्या सोबत यायचा.
      त्याला सारखं वाटत होतं की सेल फोन म्हणजे खायची वस्तु आहे काही तरी म्हणुन. ह्याच्या पाठिवर बसता येतं म्हणे घोड्यासारखं.. खुप ताकतवर पाय आहेत याचे..

  5. sahajach says:

    पोस्टचे नाव वाचले तेव्हाच ओळखीच वाटले होते ….मागे कधीतरी लोकसत्ता मधे हा लेख वाचला होता ईमू पालनावर..
    मस्त आहेत फोटो, इथे मस्कतला मोठा ऑस्ट्रीच फार्म आहे………….सहा फुट माणसापेक्षाही उंच उंच पक्षी डौलदारपणे चालताना पहायला मजा येते……

    • मी पण लोकसत्ता मधेच वाचलं होतं. त्यामुळे बरेच दिवसांपासुन इच्छा होती. सुरुवातीच्या काळात बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला, फक्त फारच थोड्या लोकांना यांचं संगोपन जमलं. आता तर रेगुलर जाहिराती असतात .. 🙂 टिव्ही केबल वर. मुंबईला पण मिळतं याचं मीट… ४०० रु- किलॊ…

  6. Rohan says:

    ‘इमू’ खातात का रे ??? मी अजून तरी ऐकले- वाचलेले नाही. ‘याच्या शरिराचा प्रत्येक भाग उपयोगी आहे.’ म्हणजे खात असतील … हेहे .. ट्राय करायला हरकत नाही … 😀

    • हो .. खातात नां.. रेड मिट असतं याचं.. जरी पक्षी असला तरी. आणि जरी रेड असलं तरी पण ते तब्येतिला चांगलं असतं म्हणतात.. वाशीला मिळतं म्हणे.. बघ हवं असेल तर..

  7. सोनाली says:

    मला पण पहायचा आहे हा इमु प्राणी/पक्षी, पेपरमध्ये वाचलयं बरेचदा याच्याबद्दल. एखाद्या weekend ला जायला हवे या farm वर. मी शाकाहारी असल्यामुळे खाण्यासाठी तरी काही उपयोग नाही याचा मला 🙂
    सोनाली

    • काही हरकत नाही. खुप वास येतो याचा ’याक ’ सारखा.. पक्षी सुंदर आहे .. मस्त वाट्तं याच्याकडे बघायला, आणि एकदम लाइव्हली पण आहे..

  8. anukshre says:

    इथल्या ऑसट्रीच फार्म बद्धल लिहिणारच होते. तेव्हढ्यात हा भाऊ प्रकटला. आता नंतर पोस्ट करीन. शहामृगाची कथा पण काहीशी अशीच आहे. असो मला ही माहिती होती पण पाहून आंनद झाला

    • सध्या तरी नविनच प्रयोग आहे हा. बऱ्याच लोकांना खुप नुकसान झालंय.. असं ऐकलं आहे..
      पण आता नविन लसीकरणाने बराच पायाबंद बसलाय या पक्षांच्या अपमृत्युला..

  9. bhaanasa says:

    शहामृगाची लहान प्रतिकृती वाटतेय रे. मी कधी पाहीला नाहीये प्रत्यक्ष पण वाचलेय. त्या जोडगोळीचा फोटो मस्त. खरेच खोडकर वाटतोय हा प्राणी/पक्षी.चोच मारायच्या तयारीत असलेल्या इमुच्या डोळ्यातले भाव…तू चोच मारायला देत नाहीस हे पाहून मागे तर नाही ना लागला? हीही…. अरे कसले जबरदस्त वेगाने पळत असतील इमु…तुझी पळताभुई थोडी झाली असती ना.

    • मी त्या फार्म वर जवळपास अर्धा तास होतो. तारेचं कंपाउंड होतं त्यांना घातलेलं. मी एका बाजुने चालत निघालो अन दुसऱ्या बाजुला गेलो तर पुर्ण वेळ ही जोड गोळी माझ्या सोबत होती. लहान मुलं यावर बसु पण शकतात…
      यांच्या पायात खुप जोर असतो.. त्यामुळे हे खुप वेगात पळू शकतात. नक्कीच पळता भुई थोडी झाली असती.. जर हे बाहेर असते तर.. 🙂

  10. Shree says:

    काय वाटेल ते , माहीतीसाठी खुप सारे धन्यवाद . ह्याची अंडी , मांस कुठे विकलं जातं ? ४०० रु. किलोच मांस कोण खातं ?

    • Shop No. 1, Opp. Gavanpada Fish Market,
      Gavanpada,
      Mulund (E),
      Mumbai – 400 081.
      Tel. : 25632345
      Shop No. 4, Navmonika Apt.,
      Uthalsar Naka,
      Opp. Holy Cross School,
      Thane (W).
      Tel : 25477725

      इथे आहे अव्हेलेबल. अहो ४०० रुपये देतात लोकं.. हॉटेलमधे गेल्यावर पण ३०० रुपयांचं सिझलर्स खातातच नां? ४०० म्हणजे काही फार नाही मध्यम वर्गियाल.

  11. ह्यांच्या अंड्यांचं omelet मस्त मोट्ठ बनतं असेल नां? 😉 एका मित्राने दक्षिण आफ्रिकेत शहाम्रुगाच्या अंड्यावर ताव मारला होता, तो सांगत होता.

    • ह्याचं अंड दोन किलोचं असतं असं म्हणतात. आता यावरुन तुम्ही कल्पना करा किती मोठं आम्लेट बनेल ते.. 🙂 पण किम्मत दोन ते अडिच हजार रुपये..

  12. छान माहिती आहे, इमु आवडला…

    • मस्त आहे पक्षी. आणी धिट असल्यामुळे दुर पळुन जात नाही तुमच्या पासुन, अगदी जवळ जवळ करतो.. खुप फ्रेंडली वाटला .. 🙂

  13. हा मुदलाताला इमूच आम्हाला माहीत नव्हता. तर त्याचं फार्मिंग वगैरे माहित असणं म्हणजे फारच झालं 🙂 .. छान आहे पक्षी. धीट वाटतोय खूप. शहामृगाची आठवण आली.

    • असं ऐकलंय की १९९८ पासुन ह्याच्या फार्मींगचा प्रयत्न सुरु आहे. तो आत्ता कुठे थोडा स्थिरावलाय. व्हेट्स कडुन रेग्युलर चेक करुन घ्यावा लागतो याला..

  14. आमच्या इथेही (बोइसरला) आहे एका ठिकाणी इमुचा फ़ार्म पण अजुन तरी गेलो नाही तिथे…बाकी तुम्ही चांगलच दर्शन घडवलत त्याच.बाकी तो सर्वात पहिला जो फ़ोटो टाकला आहे (आम्हाला जळवायला) त्याची काही गरज न्वहती… 🙂 ).

    • तो पहिला फोटो म्हणजे सगळ्यात आवडीची गोष्टं….. आपोआपच लोड झाला तो कॉम्पुटरवर.. मी नाही टाकला तो 😀

  15. Nikhil Sheth says:

    Mahendra Sir, tumacha email ID milel ka? Mala blog sandarbhat kahi prashna hote ani pratikriyemadhye te lihine barobar nahi. Mhanun jar itar margane sampark karata ala tar bare hoil…
    thanking you

  16. Aparna says:

    इमु इथल्या एका झु मध्ये पाहिला होता. पण तरी ते खाण्यासाठीचं फ़ार्मिंग वाचुन थोडं वैट वाटतंय..अर्थात कोंबड्यांचंही तेच करतो आपण…आणि तुम्हाला वाड्यामध्ये एसी रेस्टॉरन्ट कुठे मिळालं?? माझी मावसबहिण तिच्या रेसिडेन्सीसाठी वाड्याला होती तेव्हा गेलेले आणि एक पोस्टमार्टेम पाहायचं नशीबात आलं…लिहेन कधीतरी त्यावर..पण तेव्हा आम्ही तिच्या हॉस्पिटल क्वार्टरच्या किचन मध्ये घरीच बनवुन खाल्लं होतं…नशीब पोस्टमार्टेमच्या वेळी खाल्लेलं बाहेर नाही आलं ते…आज हे सगळं आठवतेय…श्या….

    • वाड्याला आहे नां एक रेस्टॉरंट.. वाडा ते भिवंडी मार्गावर . गोमा इंजिनिअरींग म्हणुन कंपनी आहे, तिच्या जवळ आहे. खुप मोठं आहे ते हॉटेल. आणि चांगलं पण आहे..
      हा पक्षी मला खुप उनाड आणि खॊडकर वाटत होता.. सारखा खेळायचा प्रयत्न करायचा.. म्हणुन असेल थोडं अटॅचमेंट झाल्या सारखे झाले, केवळ अर्ध्या तासात.. 🙂

  17. Girish says:

    MBK, old mumbai pune highway var, vadgoan ani kamshet chya madhye ek chan hotel ahay, Toni da Dhaba.. sundar jevan milte. Tya tikhani suddha barech Emu ahet ani tikde emu khayla pan detat mhane. Me emu tikde pahila ahay..

    • गिरिश
      अरे पण तुझं ते ’पेटा’ त्याला कसा चालला इमु?? की ’पेटा’ चं सदस्यत्व सोडलंस?? 😀

  18. dinesh says:

    Mahendraji,
    Magil mahinyatach Emu pahnyacha yog ala. Companytlya eka Engineerchya ghar cum farm house madhye party hoti. Medha mhanun gaon aahe, Roha te Nagothane road var (Rohya pasun 5 KM distance var).Pan ratrichya andharamule neet pahta aala naahit.Photo mule neet pahta aala. Thanks!
    Emuche maas khane mhanaje amanavi vatate!

    • मी ज्याला बघितलं त्याचे डोळे खुप बोलके होते… आणि खुप हुषार पण वाटला तो इमो..
      माझी पण इच्छा होणार नाही खायची..

  19. Vikramaditya says:

    Kaka tumhi Amachya IMU baddal lihal aahe…………….

    We have a IMU farm of 35 birds…………….

    Great efforts of exploring new things….

    I am Agriculturist from Karad, if you will in this area please don’t forget to buzz me………..I will show more interesting things than this………

    • अरे वा.. तुमचा फार्म आहे का तो?? जग एकदम लहान आहे.. नाही??? मी फोन केला होता ते तुझे कोण?? भाउ का? फार्म खुपच छान ठेवलाय . मजा आली होती. फक्त अर्धा एक तास असेल तिथे फार्म वर. कऱाड्ला येणं झालं कधी तर करीन बझ.. नक्की..

Leave a comment