१० वी नंतर काय ?

मुलं लहान असताना , अगदी उन्हाळ्याच्य सुटयांमध्ये पण मुलांना कुठले तरी क्लासेस लावून द्यायचे, कराटे वगैरे शिकवायचे, गाणी , किंवा एखादे वाद्य वाजवायला शिकवण्याची पद्धत सुरु झाली आहे. मुलांचया बाबतील असलेला पझेसिव्हनेस फक्त मुलगा/मुलगी १० वि किंवा `१२वी पर्यंत असतो. मुलांच्या करियर च्या बाबतीत इतके जागरूक असलेल्या पालकांना एकदा १० वी झाली की एकदम थ्री इडियट आठवतो, आणि मुलांना तुम्ही जे करायचे ते करा, आम्ही तुला सपोर्ट करू वगैरे म्हणणे सुरु करतात.

खरं तर या वयात मुलांना भविष्या बद्द काही फार समाज नसते, आपले चार मित्र जे करतात, तेच करणे म्हणजे कूल…. असा काहीसा गैरसमज झालेला असतो. त्यांना ज्या गोष्टी मध्ये फार कष्ट करावे लागत नाही, किंवा थोडे कष्ट केल्यावर खूप कौतुक केले जाते, अशा गोष्टींमध्ये जास्त रस वाटायाला लागतो , आणि अर्थात अभ्यासाकडे दुर्लक्ष केले जाते. मग या मध्ये शनिवार रविवारी ट्रेकिंग ला जाणे, किल्ल्यावरचा कचरा स्वच्छ करणे वगैरे गोष्टी पण आल्या.

इंजिनिअरिंग किंवा मेडिकल तर काय, कोणीही करते, त्यात काय विशेष? मी काहीतरी जगावेगळं काही तरी करायचे आहे असे जर आमचा मुलगा/मुलगी म्हणत असेल तर त्याला नकार ना देता, तुला हवे ते तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच असे म्हणणारे पालक जरा जास्त वाढले आहेत. आपल्या मुलाला आंधळे पणाने सपोर्ट करताना, आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल आपण काही जबाबदार आहोत ही गोष्ट पालक विसरतात. अहो, १६ -१७ वर्षांचा मुलाचा आयक्यू तो किती? त्याला भविष्या बद्दल समज असते का ? आणि मग अशा परिस्थिती मध्ये मुलांना आंधळे पणाने पाठिंबा देणे कितपत योग्य?

लहानपानापासून अशा काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये लहान मुलांना भाग घ्यायला लावायचा, आणि मग एखाद्या कार्यक्रमात बक्षीस वगैरे मिळाले कि नातेवाईकांत आणि शेजार पाजार्यात कौतुक झाले की मुलांना अभ्यासा पेक्षा या अशा ऍक्टिव्हिटीनेज मध्ये जास्त रस वाटू लागतो, आणि अभ्यासा कडे दुर्लक्ष होते.

हा प्रश्न अगदी वैय्यक्तिक आहे,पालकांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आजचा त्यांचा निर्णय मुलांचे भविष्य बनवू किंवा बिघडवू शकतो.

जवळपास ५ -६ वर्षांनंतर काही लिहितोय, लिखाणाची लिंक नीट लागत नाही, असो..

Posted in Uncategorized | Tagged , , | 3 Comments

आयुष्य

पण सांग ना, जर मी गेले, तर तु पुन्हा लग्न करशील?

काहीतरी वेड्यासारखी बोलू नकोस. आधी लवकर बरी हो, नंतर बोलू. Continue reading

Posted in Uncategorized | 6 Comments

जी एस टी – नेमकं काय आहे?

मी काही चार्टर्ड अकाउंटंट नाही, पण माझा स्वतःचा व्यवसाय असल्याने ह्या जिएसटी कडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन इथे मांडण्याचा प्रयत्न म्हणजे हा लेख.

एखादी वस्तु एखाद्या फॅक्टरी मधे तयार होते, तेंव्हा त्यावर पुर्वी सर्वप्रथम १) एक्साइज ड्युटी, २) सेल्स टॅक्स – प्रत्येक स्टेट च्या नियमा प्रमाणे – व्हॅट किंवा सेंट्रल सेल्स टॅक्स  लावुन डिलर्स कदे वस्तु पोहोचवली जायची.

एक साधे उदाहरण पहा. मी जनरेटर्स विकतो. आता ह्याच जनरेटरची मुंबई मधली किंमत निरनिराळे सेल्स टॅक्स चे ऑप्शन वापरुन कशी बदलते ते पहा.

१) बेसीक किंमत समजा १००००० + १२.५% एक्साईज + व्हॅट १३.५% +ऑक्ट्रॉय ५.५% ( टोटल किंमत रु.१३४५१०.००) ( या मधे महाराष्ट्र व्हॅट लावुन बिल केलेले आहे)

२) दुसरा ऑप्शन सी एस टी ( सेंट्रल सेल्स टॅक्स )बिलींगचा. बेसिक किंमत  १००००० +१२.५% एक्साईज + सीएसटी २% फ़ॉर्म सी सहित +५.५% ऑक्ट्रॉय ( टोटल किंमत १२१०६१/-) इथे व्हॅट म्हणजे महाराष्ट्र सेल्स टॅक्स न भरता सेंट्रल सेल्स टॅक्स भरुन विक्री केली गेलेली आहे, जो केवळ २टक्के असतो.  जास्त खोलात शिरत नाही, पण फॉर्म सी _-ई १ वर ट्रॅन्स्झॅक्शन करुन टॅक्स वाचवता येतो. या मधे विक्री करणारी कंपनी आधी दुसऱ्या स्टेट मधे स्टॉक ट्रान्सफर करुन असा सौदा करु शकते.

३) तिसरा ऑप्शन म्हणजे विक्रेत्याने एक ऑफिस गुजरात मधे उघडायचे.  महाराष्ट्र व्हॅट १३.५% टक्के तर   गुजरात चा व्हॅट ५ टक्के होता.तिथला सेल्स टॅक्स नंबर घेऊन नंतर गुजरात मधुन महाराष्ट्रात ५ टक्के व्हॅट वर बिलिंग  करता यायचे. म्हणजे यात महाराष्ट्राचे नुकसान, पण कस्टमरचा फायदा.
बेसिक समजा १००००० + १२.५% एक्साइज + गुजरात सेल्स टॅक्स ५% + ऑक्ट्रॉय ५.५% ( टोटल १२४६२१?-) ( गुजरात सेल्स टॅक्स भरुन बिल केलेले आहे, या मधे सी फॉर्म देण्याची गरज नाही)

अजुनही काही पर्याय आहेत, पण हे सगळे पर्याय जर लिहित बसलो, तर इथे एक खुप कंटाळवाणी पोस्ट तयार होईल म्हणुन आवरतो. पण जस्ट थोडक्यात समजावे की टॅक्स मधे किती घोळ असतो, म्हणुन वर उदाहरण दिले आहे. वर दिलेली तिन्ही उदाहरणे अगदी १०० टक्के लिगल आहेत, पण टॅक्स ची अमाउंट किती बदलली आहे ते पहा.

“आता जिएसटी आल्यामुळे कुठल्याही स्टेट मधुन बिलींग केले तरीही किंमत बेसीक + १८% जीएसटी इतकीच राहिल. जिएसटी सुरु झाल्यामुळे आता एक्साइज ड्युटी  आणि इतर टॅक्सेस बंद झाले आहेत. तसेच ऑक्ट्रॉय पण बंद केला गेला आहे. तेंव्हा टोटल किंमत   जी एम् व्हॅट वर  १३४५१०.  ती आता जिएसटी वर रू/ १,१८०००/-  होईल. म्हणजेच कस्टमरचा  जवळपास १६००० चा फायदा झालेला आहे. या वरुन तुमच्या लक्षात येईल की ऑटोमोबाईल कंपन्या किंमती मधे कपात करुन कस्टमर्स ला बेनिफिट पास ऑन कशा करु शकतात ते!”

सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस ह्या जीएसटी मुळे बंद झालेले आहेत आणि त्यामुळॆ लोकांचा फायदाच होईल. पण विक्रेता हा फायदा पास ऑन करतो की स्वतः ठेऊन घेतो हा प्रश्न आहेच..

समजा मी जिएसटी देऊन कंपनीकडून एक मशिन विकत घेतले १००००० रु. ना, त्यावर जीएसटी ( १८%) लावल्यावर  होतो रु. १८०००/-
नंतर हेच मशीन मी १, २०, ०००/- या किंमती ला विकले. त्यावर १८% जिएसटी हा रु. २१६००/- कस्टमरला चार्ज केला, आणि कस्टमरला दिलेल्या बिलात पण तो मेन्शन केला. आता विक्रेता म्हणून मी सरकार कडे रु.
पण तो टॅक्स दाखवला. आता मी विक्रेता म्हणुन सरकार कडे २१६०० -१८०००= ३१६० रु टॅक्स जमा करेन. समजा कस्टमर जी एसटी मधे रजिस्टर असेल तर तो पण भरलेल्या जीएसटी च्या अमाउंटचा इनपुट क्रेडीट म्हणुन वापर करेल.

थोडक्यात बऱ्यापैकी सरळ झालेलं आहे टॅक्सेशन- आधीपेक्षा. सगळॆ चित्रविचित्र प्रकारचे टॅक्सेस आता या पुढे ऍबोलिश करण्यात आले आहेत. तुम्ही भारतात रहाता? तर मग एकाच देशात दोन राज्यात टॅक्स चा दर वेगळा नसावा आणि प्रत्येकाला टॅक्सेशन मधे सुविधा मिळावी म्हणून जी एस टी लागु केला गेला आहे.

प्रत्येक वस्तू वर एक रेट ०% ते २८% टक्के सेट केला गेला आहे. जिवनावश्यक वस्तूंवर शुन्य ट्क्के टॅक्स , तर चैनिच्या वस्तूंवर २८% अशी सरळ धोपट वर्गवारी केली गेली आहे जी मला पटलेली नाही .

आणि हो, पुर्वी ऍमेझॉन वर तुम्हाला बऱ्याच गोष्टी ऑन लाइन स्वस्त का मिळायच्या ह्याचे उत्तर म्हणजे वर दिलेला ऑप्शन क्र. ३. म्हणजे महाराष्ट्राच्या १३.५% व्हॅट ऐवजी तुम्हाला २ टक्के ते५ टक्के लावुन बिल केले जात होते. आता या पुढे ऑन लाइन वरची किंमत आणि दुकानातली किंमत या मधे फारसा फरक रहाणार नाही हे नक्की.

Posted in Uncategorized | 6 Comments

एकांत.

घरा मधे इनमिन तिन माणसं. राजाभाऊ, रमा आणि राहुल. वन बिएच के म्हणजे फार लहान नाही मुंबईच्या मानाने. एक हॉल  , किचन,   एक बेडरुम आणि सोबतच एक ३ बाय ५ चे लॅटबाथ हे हॉल ला लागुन, असे की हॉल मधे झोपणाऱ्याला आणि बेडरुम मधे झोपणाऱ्याला असेस करता यावे!बेडरुम मधे झोपलेल्या व्यक्तीला जर रात्री टॉयलेटला जायचं काम पडलं, तर हॉल मधुनच जावे लागायचे. तसे राहूल एकटाच हॉल मधे झोपायचा, त्यामुळे त्याला कधीच ह्या गोष्टीने आपली प्रायव्हसीएकांत जाते असे वाटले नव्हते.

तसे म्हंटले तर मुंबईच्या मानाने “चांगलाच” मोठा फ्लॅट! ह्याच फ्लॅट मधे गेली ३२ वर्ष राजाभाऊ , बायको रमा आणि मुलगा राहूल राहत होते. तिघांसाठी फ्लॅट पुरेसा वाटायचा त्यांना, त्यामुळे त्यांनी कधी मोठा फ्लॅट घ्यायचा विचारच केला नव्हता.  कशाला  घ्यायचा? खाली उतरलं की बस स्टॉप रस्ता ओलांडला की स्टेशन, भाजी, दुकानं, सगळं काही अगदी हाकेच्या अंतरावर.

बिल्डींग मधले बरेच लोकं आपली रहाती जागा विकुन मोठ्या जागेच्या लोभाने  विकुन आलेल्या पैशातुन  तिकडे डोंबिवली, विरार कडे मोठा फ्लॅट घेऊन रहायला गेले होते, पण राजाभाऊ मात्र गिरगावातच ठाण मांडून बसले होते, काहीही झालं तरी हा भाग सोडायचा नाही हे अगदी मनावर पक्के ठसले होते. Continue reading

Posted in Uncategorized | 16 Comments

एका लग्नाची गोष्ट

पण मला इतक्यात लग्नच करायचं नाही. सोज्वळ अगदी ठामपणे म्हणत होती. गेले अर्धा तास लग्न या विषयावरच दोघांचाही संवाद/विसंवाद सुरु होता.

अगं पण नाही का म्हणतेस? चांगली २५ वर्षाची झालीस, आता नाही तर कधी करणार मग लग्नं? तुझ्या वयाची असतांना तुझ्या आईला तु झाली होती, चक्क दोन वर्षाची होती तु.

केलं असतं हो बाबा, पण चांगला मुलगाच मिळत नाही नां, मी तरी काय करु? कुठल्याही मुलाशी लग्न करु का?

मी तसं म्हंटलं आहे का? चांगल्या मुलाशीच कर म्हणतोय ना? एखादा पाहुन ठेवला असेल तर सांग, आमची काही हरकत नाही, आम्ही करुन देऊ तुझे लग्नं.

तसे नाही हो बाबा. आता पुन्हा ऑन साईटला बहुतेक लॉंग टर्म जावे लागेल, मग आता लग्न केले तर करीअर ची वाट लागेल.

कशी काय वाट लागेल? आम्ही एक मुलगा बघुन ठेवलाय, Continue reading

Posted in Uncategorized | 1 Comment