काय बोलावं आणि काय नाही?

केवळ नविन लग्न झालेल्या लोकांच्या साठीच हे लिहित नाही, तर अगदी मुरलेल्या लोकांनीही हे वाचलं तरी हरकत नाही. आजकाल एसएम एस मुळे बरेच विनोद मित्र पाठवतात. त्यातले काही तर अगदी सो-सो असतात, पण एका मित्राने त्याच्या लग्नाच्या ९व्या वाढदिवसाला मी त्याला शुभेच्छा दिल्यावर पाचच मिनिटांनी  पाठवलेला विनोद (???) – तो म्हणतो, “आफ्टर मॅरेज आय हॅव बिकम कॅथलिक, ऍंड नाउ आय हॅव गॉट नन टु स्लिप विथ”  हा विनोद म्हणूनच घ्यायचा कां  ?? हे ठरवु शकलो नाही मी.

लग्नानंतर ५-६ वर्षानंतर स्त्रिया जास्त इन्व्हॉल्व्हड होतात त्या मुलांमधे, आणि अर्थातच नवऱ्याच्या जेवण खाणं या पेक्षा, “इतर गरजांकडे” बरंचसं दुर्लक्ष होतं.पण पुरुषातला पुरुष हा अजूनही जागा असतोच, आणि त्याची पुर्तता झाली नाही की मग मनातली भडास अशी काढली जाते.

बऱ्याच गोष्टी असतात त्या कुठेच बोलल्या जाऊ शकत नाहीत. कारण काहीही असो, मेसेज आल्याबरोबर त्याला फोन केला तर तो  खूप वेळ बोलत होता. बऱ्याचशा पर्सनल गोष्टी पण बोलला. ह्या मित्राचं आधी एका मुलीबरोबर अफेअर होतं, पण घरच्या लोकांच्या विरोधामूळे ते लग्न होऊ शकलं नाही. लग्न झाल्याबरोबर त्याने हनिमून पिरिअड मधेच ही गोष्ट बायकोला सांगून टाकली, आणि  त्या नंतर जेंव्हा कधी भांडणं व्ह्यायची, तेंव्हा या गोष्टीचा उल्लेख त्याची बायको न चुकता करायची. त्याने बायकोला लग्नाआधीच्या घडलेल्या गोष्टी सांगणं योग्य होतं कां? किंवा लग्नापुर्वीच्या आयुष्याबद्दल कितपत आपल्या जोडीदारास सांगावे?? हा विषय मनात आला, म्हणून हा लेख लिहायला घेतला.

बायकांना  आणि पुरुषांना प्ण अजून एक् वाईट सवय असते, की मला तुझ्या पेक्षा चांगली स्थळं आली होती, किंवा माझं दुसऱ्या कोणाशी तरी लग्नं होणार होतं – पण आईला तू आवडलास/आवडलीस म्हणून तुझ्याशी लग्नं केलं, म्हणून सांगायची. म्हणजे नकळत  जोडीदाराला तू माझा दुसरा चॉइस आहे हे सांगणंच नाही कां? जरी हे खरं असलं, तरीही हे न सांगितलं तरीही चालू शकतं. किंवा सांगितल्याने काही फार मोठा फायदा होणार आहे असेही नाही.. मग कशाला उगीच लग्नापुर्वीच्या मित्र मैत्रिणीं्बद्दल सांगायचं?

खरंच लग्नानंतर पहिल्यांदा जेंव्हा तुम्ही स्पाउस  बरोबर असता, तेंव्हा ती/तो रिसिव्हींग मोड मधे असतो, तुम्ही जे काही बोलत असता ते अगदी शांतपणे ऐकून आपल्या मेमरी मधे स्टोअर करुन ठेवत असतो. आणि नंतर काही वर्षांनी भांडणं सुरु झाली की या आपणच सांगितलेलया गोष्टींवरून ऐकून घ्यावंसं वाटतं.  अगदी असंच काहीसं स्त्रियांच्याही बाबतीत होत असतं. तिने पण मी तूला एक गोष्ट सांगू कां? असं म्हणून एखादी नको ती गोष्ट सांगितली, की तिचा उपयोग नकळत तिच्याच विरुध्द भविष्यात होणाऱ्या भांडणात न-कळत केलाच जातो- म्हणून लग्नापुर्वीचा बॉय फ्रेंड, किंवा गर्ल फ्रेंड बद्दल एकदा लग्न झालं की विसरून जाणंच योग्य ठरतं. अगदी प्रत्येकाच्याच आयुष्य़ात कधी ना कधी नाजूक संबंध जोडले गेले असतात. पण त्याची वाच्यता न करणे योग्य असे वाटते.

हे झालं, लग्नापुर्वीच्या गोष्टी बद्दल. काही दिवसांपुर्वी एक सर्व्हे वाचला होता आणि त्यावर एक पोस्ट पण टाकली होती. स्त्री पुरुष इंटरेस्टींग सर्व्हे म्हणून. त्या मधे दिलेली आकडेवारी ही अतिशय मनोरंजक आहे. कितीही जरी नाही म्हंटलं तरीही मानवी स्वभाव काही बदलू शकत नाही.

जर नौकरी करीत असाल , तर मग को वर्कर शेजारच्या क्युबिकल मधे बसणारा का असेना, पण त्याची तारिफ केलेली स्पाउसला अजीबात आवडत नसते. आता दिवसभरातले ८ तास एकत्र काढल्यावर  ( स्पाउसबरोबरच्या सकाळच्या दोन तास आणि संध्याकाळी ७ वाजता घरी आल्यावर ३ तास  म्हणजे टॊटल ५ तासापेक्षा जास्तंच) एखाद्या अपोझिट सेक्स च्या व्यक्तीशी मैत्री होणं सहाजिकच आहे – कदाचित थोडं अट्रॅक्शन पण वाटू शकतं. तेंव्हा  नुसती मैत्री जरी असली, तरी त्या मित्राची किंवा मैत्रीणीची तारिफ ऐकायला तुमच्या जोडिदारास अजिबात आवडणार नाही.

या उलट तुम्ही ऐश्वर्या राय कित्ती सुंदर आहे, किंवा स्त्रीने अभिषेक कित्ती क्युट आहे नं.. असं म्हंटलं, तर चालतं… पण को वर्कर्स ची तारीफ… ऍब्स्लोल्युटली नो – नो. त्यातल्या त्यात मुलींनी बॉसची केलेली तारिफ ऐकली की नवऱ्याची मनातल्या मनात चिडचिड जास्तच होतेच ,असेच पुरुष  पण एखाद्या ऑफिसमधल्या मुलीची तारीफ़ बायको समोर करतो तेंव्हा तिला पण ते फारसं आवडतं अशातला भाग  नाही – जरी शब्दांत बोलून दाखवलं नाही तरीही…!!!

हे असं कां होत असाव?  कदाचित या गोष्टीला कोणी पर्सनली जबाबदार नसतं, माझ्या मते उत्तर एकच आहे- ते म्हणजे  मानवी स्वभाव.असूया, किंवा  की  इन्सिक्युरिटी? कदाचित इन्सिक्युरीटी पण असू शकते. आपला नवरा किंवा बायको कुणा दुसऱ्या माणसात इंटरेस्ट घेते आहे , आणि दोघंच असतांना ” आपल्या विषयी” बोलण्या आधी दुसऱ्याबद्दल बोलते आहे – म्हंटल्यावर येणारा कॉम्प्लेक्स!!

नवरा किंवा बायको घरी असतांना नेट वर असतांना चॅट करणे शक्यतो टाळा. अरे मी समोर असतांना तू दुसऱ्या कोणाशी काय बोलत बसला/ बसली आहेस?? आपल्यातला संवाद संपला की काय? की तूला नेट वर मित्रांशी चॅट करीत वेळ घालवावा लागतोय़? असा प्रश्न नेहेमीच डोक्यात भुंगा पोखरत असतो .

स्त्रियांना आपल्या वजना बद्दल फारच जास्त कॉन्शसनेस असतो – जो पुरुषांना नसतो. कदाचित म्हणूनच असेल, की नेहेमी आरशा समोर उभं राहुन आणि केस विंचरतांना विचारला गेलेला ( दोन बोटांच्या चिमटीत  पोटाची साईडची वळी धरून )  ” मी फार लठ्ठ झाल्यासारखी वाटते  कारे?? किंवा एखादी जूनी जिन्स घालून   पोट आत ओढुन त्याची बटन लावल्यावर, पोट फारच ओथंबून आल्यासारखं वाटतं का  रे?  असं विचारलं की मग, यावर काय उत्तर अपेक्षीत आहे ते मी सांगायला नकॊ.

एखादी त्यातल्या त्यात सुंदर दिसणारी बायकोची मैत्रीण घरी येऊन गेली, की ती मी तिच्याइतकी लठ्ठ दिसते कां?  किंवा ती ( म्हणजे तीची मैत्रीण) माझ्या पेक्षा जास्त सुंदर दिसते कां? (  असे प्रश्न बायका का विचारतात?? हा पण एक प्रशनंच आहे) खरं बोललं तर आवडेल अशा प्रश्नांची उत्तरं देतांना?  ? संध्याकाळी घरी आल्यावर तुम्ही नुकतेच फ्रेश होऊन बसले आहात.  तुम्ही दोन मिनिटं जरी गप्प राहिलात तरी ” काय झालं? बोलत का नाही??” काय झालं ऑफिसमधे??  आज माझा  अजिबात मूड नाही,   किंवा दोन साड्या हातात धरून कुठली नेसू – किंवा कुठली जास्त चांगली दिसते? – बरं नविन लग्न झालेलं असलं की रात्री नाइटी पण दोन दाखवेल रात्री .. कुठली घालू म्हणून?  हे असे प्रश्न म्हणजे नुसता डोक्याला ताप असतो.

जेवायला बसल्यावर एखादी नविन डिश केली असेल , आणि तुम्ही काही बोलला नाहीत , म्हणजे छान झालंय बरं कां असं म्हंटलं नाही तर- ” आवडली नाही कां ?”  आणी हो म्हंटलं, तर मग मी विचारण्यापुर्वी सांगितलं कां नाही म्हणुन डॊळॆ भरून येतील – आम्ही आपलं एवढं प्रेमाने मरमर करून करायचं, आणि तुम्ही मात्र दुर्लक्ष करायचं…

या व्यतिरिक्त एक प्रश्न ज्याला मी सगळ्यात घाबरतो तो म्हणजे आज काय आहे??? आता या प्रश्नाचं उत्तर काहीही असू शकतं – तिच्या भावाच्या मुलाचा वाढदिवस ते तिचा वाढदिवस, किंवा लग्नाची ऍनिव्हर्सरी – तुम्हाला कदाचित वाटेल की या प्रश्नाचं उत्तर ” आज टेस्ट आहे हे मला माहिती नव्हतं” हे द्यावसं वाटलं तरीही देऊ नका . य प्रश्नाचं उत्तर कधी चुकलं की तुम्ही संपलात!!असे प्रश्न टाळले तर  आयुष्य खूप सोपं होईल ना पुरुषांचं.

हे वर दिलेलं झालं स्त्रियांचं, पुरुषही काही कमी नाहीत या बाबतीत, कधीही आणि काहीही बोलतात, आणि नंतर मग समजूत काढत बसतात.   जसे बायकोने जुनी जिन्स घातली,की  ’ती जिन्स जरा आटल्यासारखी वाटते कां?’-  असे प्रश्न अगदी जोक म्हणून विचारले तरीही त्याचा काय इम्पॅक्ट होईल ते सांगता येत नाही. बरेचदा ’तू अगदी तूझ्या आईसारखी वागतेस  ’ हे वाक्य तर टाइमबॉम्ब चं काम करतं, कधी एक्स्प्लोड होईल ते सांगता येत नाही. अगदी कोंबडीचे पिसं उपटल्या सारख्या भुवया कोरून आली असली, किंवा केस कापून आली असली, तर त्याकडे कधिच दुर्लक्ष करू नका. किती मस्त कापले गं तुझे केस असे म्हंटले की दिवस चांगला जातो – ( तुमचा हो- दुसऱ्या कोणचा?? 🙂  )

स्त्रिया सगळ्यात जास्त सेन्सिटीव्ह असतील तर त्या आपल्या केसांबद्दल. तेंव्हा केसांची तारिफ केली की आनंद चेहेऱ्यावर त्वरीत दिसेल. कोणास ठाउक का बरं, पण स्त्रियांना भडक रंगाचं लिप्स्टीक लावायला आवडतं ते भडक लिप्स्टीक  लावल्यावर जरी बायका डान्सबारमधल्या बायकांसारख्या दिसतात असे  तुम्हाला जरी वाटत अ्सेल, तरीही ते   “त्या” (???) बायकांसारखं दिसतं , ही गोष्ट सांगण्याचा अजिबात  प्रयत्न करू नका. आपली आवड निवड आपल्यासाठीच ठेवा.{ कदाचित तिच्या एखाद्या मित्र मैत्रीणेने ही शेड खूप सुंदर आहे म्हणूण सांगितले असेल, त्यामुळे तुमच्या मताची किम्मत अजीबात नसते  ( शुन्य असते) तिच्या समोर} तुम्ही नाही म्हंटलं आणि लावलं, की मग अपमानाचे घोट मनातल्या मनात गिळत तिचा तो डान्सबार लूक एंजॉय करायची वेळ येईल त्यावर काही न बोलता  आपला मान स्वतःच राखून घ्या .

अधुन मधून तु हल्ली जरा रोड दिसतेस म्हणून म्हणत जा. त्यामूळे तिला बरं वाटेल. तसेच ’ तू इतकी सुंदर, आणि मी हा असा, तू माझ्याशी लग्नं कसं केलंस? किंवा मला हो कसं काय म्हणालीस?? असे प्रश्न  पेरत रहाणं बरं असतं. तसेच तु जवळ आलीस की खूप सुंदर वास येतो ( आता इतका महागाचा फ्रेंच पर्फयुम आणला तुम्ही सुगंध येणारचं) असं म्हणत जा – ते बरं असतं..

तू हल्ली फारच थंड वागतेस, तुझे मित्र मैत्रीणी मला आवडत नाहीत,तुझा माझ्यातला इंटरेस्ट कमी झाल्यासारखा वाटतो वगैरे बोलण टाळा. अशा अनेक गोष्टी आहेत, पण आता थांबवतो इथेच, तुम्हीच कॉमेंट्स मधे लिहा.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , . Bookmark the permalink.

77 Responses to काय बोलावं आणि काय नाही?

  1. रोहन says:

    काय रे.. मला वाटते मेळाव्याबद्दल पोस्ट टाकलीस की काय… ‘काय बोलावं आणि काय नाही ते’ हेहे.. जाउदे ह्यावर प्रतिक्रया नकोच.. आत्ता कुठे अनुभव सुरू झाले आहेत.. तेंव्हा.. बघुया पुढे पुढे अजून काय काय होतय!!! हेहे

  2. जया वर्णिता शीणली वेदवाणी अशा प्रकारच्या विषयावर लेख लिहिण्याइतके का बरे सटकलात.. असा मनाशी आलेला विचार ह्या टिप्पणीमार्फत झटकून टाकतोय…

    मनाची शते…!

    • Mahendra says:

      शिरिष
      अगदी खरं आहे. कितीही लिहिलं जाउ शकतं. मित्राचा तो टेक्स्ट मेसेज, आणि नंतर झालेलं बोलणं यावरुन हा लेख लिहावासा वाटला..

      • मी इतका सटकलाय की आजकाल मला २-३ दिवसात एकही मो.कॉल येत नाही… अशा अवस्थेपर्यंत पोहोचणे हेच ध्येय असायला हवे आयुष्यात… ज्याला हवे तो येऊ दे प्रत्यक्ष इथवर मजलदरमजल करत… असे काहिसे…

        ॐ शांतिः शांतिः शांतिः

        • Mahendra says:

          नशिबवान माणसाची लक्षणं आहेत ही,. आमचं कर्णपिशाच्च काही कानावरून उतरत नाही.

        • मी says:

          आपली ही कमेन्ट ‘विस्मय’कारक वाटली.

  3. महेंद्रजी,
    इतरांचं माहित नाही…पण एक गोष्ट.. मी तुमच्या कडुन – ब्लॉगवरुन – जीवनाबद्दल – बर्‍याच गोष्टी शिकलोय – शिकतोय – आणि हे उघडपणे मान्यही करतोय. कितीतरी गोष्टी – कोणत्या ते सांगत नाही – पण तुमचे अनुभव – विचार ऐकुन – वाचुन मी आजमावल्यात – अगदी १००% सक्सेस रेट आहे!

    ही पोस्ट म्हणजे आमच्या अनुभवात अजुन एक धडा!

    अनेक आभार!

    • Mahendra says:

      दिपक
      लाजवू नका हो. अगदी सहज मनात आलं की जे स्वतःला पटेल ते लिहितो. काय वाटेल ते मूळे सगळं सोपं पडतं लिहिणं

  4. श्रद्धा says:

    खरच खुप छान लेख लिहिलाय तुम्ही… अगदी असच होत असतं नाही आपल्या जीवनात? जोडीदाराला काही सांगताना लक्षात पण येत नसते की याचे परिणाम पुढे काही वगळे होणार आहेत ते….

    • Mahendra says:

      श्रध्दा
      लग्नानंतर फक्त दहा वर्षानी अशी वेळ यावी हे किती वाईट नां? त्याच्याशी बोललो आणि त्याला डिस्टर्ब झालेला बघितला. टोटली लॉस्ट!!!
      म्हणून हे पोस्ट लिहिले आज.लग्नानंतर स्पाउसला ’जेवढं आवश्यक तेवढंच ’सांगणं कधीही योग्य असे माझे तरी मत आहे.
      लग्नापुर्वी माझी मैत्रीण होती, किंवा नुसता मित्र होता एवढं जरी सांगितलं, तरीही हे मैत्रिचे संबंध कुठपर्यंत गेले होते हा किडा नेहेमीच मेंदू पोखरत रहातो.

      • sukhdevjadhav says:

        हे अगदी तंतोतंत खरे आहे .

        • सुखदेव
          बरेचदा नकळत भावनेच्या भरात काहीतरी बोललं जातं, आणि मग त्याचाच परिणाम नेहेमीसाठी भोगावा लागतो. प्रतिक्रियेकरता आभार.

  5. vidyadhar says:

    काका होमपीचवर!

  6. vikram says:

    लग्नापुर्वीच्या मित्र मैत्रिणीं्बद्दल सांगायचं असेलतर त्यासाठी दोघेही तेवढेच समजदार पाहिजेत आणि तसे मिळणे महाकठीण असते

    याबाबतचा एक किस्सा सांगतो आमचे एक डॉक्टर मित्र आहेत त्यांच्या मित्राने लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोला आपल्या पहिल्या ३-४ मैत्रिणीची नावे सांगून झाकी मारण्याचा प्रयत्न केला, आता नवरा एवढ्या विश्वासाने सर्व खर सांगत आहे म्हंटल्यावर बायकोला राहवलं नाही आणि तिनेही आपल्या पूर्वीच्या ५-६ मित्रांची नावे सांगून टाकली परंतु आता त्यांच्याशी माझा काही संबंध नाही हे सांगायला विसरली नाही
    आता यापुढे काय झाले असेल हे सांगायची गरज वाटत नाही मला

    • विक्रम
      जेंव्हा सांगितलं जातं तेंव्हा त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पण नंतर जेंव्हा थोडं जरी भांडण झालं, तरीही त्याचा रेफरन्स हा असतोच.

  7. कुणीतरी म्हणून गेलंय ना, “जोडीदार मित्र असावा पण मित्र जोडीदार असू नये.”

  8. Smit Gade says:

    काका कोचिंग क्लासेस झिंदाबाद !!!!

  9. तो says:

    farach chan zalay post….
    tumhi sangitalelya gosti lagna nantar nakki lakshat theven (thevavya lagatil)
    🙂

    • साधा मार्ग आहे. अगदी कमी बोलायचं.. बस्स!! उगिच जास्तिचं काही सांगायची गरज कधिच नसते..

  10. Bharati says:

    पहिल्या भेटीतून जे बोलले जाते ते भले नाही आवडले चालेल.पण सांगणे योग्यच ! जोडीदाराला आपला मूळ स्वभाव तरी कळतो.जर जोडीदार संशयी निघाला तर आपली निवड चुकली, आपण नाही.दुसर्यासाठी आपण आपले खरेपणाचे वागणे का बदलायचे? लग्न हा आयुष्याचा प्रश्न आहे आपली निवड केली यात जोडीदाराने काय समजायचे ते समजू नये का? तिथेच जर अविश्वास असेल तर पारखूनच लग्न करावे.नाहीतर आहेच.. पदरी पडले…पवित्र ज़ाले! छान विषय निवडला आहे.

    • भारती
      माणसाचं मन फार विचित्र असतं. आज जर सांगितलं की एक मुलगा माझा मित्र होता, तर त्यावर मैत्री कुठल्या लेव्हलपर्यंतची होती हा संशय कायम मनात राहिलंच.. निवड चुकली, तर पुढे पुर्ण आयुष्यभर त्या विषयावर बोलणी ऐकायची तयारी ठेवावी लागेल.
      जास्त खरेपणा पण काही कामाचा नाही असे माझे मत आहे.

      • Prashant says:

        मला भारती आणि निरंजनचं मत पटतं….
        सुरवातीलाच एकमेकांबद्दल जाणून घेण्याची वेळ असते तेव्हा हे सगळं स्पष्टपणे बोललेलं योग्य.
        उगाच वेळ दवडून नंतर सांगीतलं तर जोडीदाराच्या मनात जोडीदाराच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय येउ शकतो. कोणत्या गोष्टी बोलायच्या आहेत किंवा नाही….. कधीपर्यंत हे सगळं समोरची व्यक्ती काय अपेक्षा करते त्यानुसार करावं.
        सहसा काही लोकांत अशी भावना असते की या गोष्टी मुळीच बोलू नये. मला अशा लोकांचा प्रचंड तिटकारा वाटतो. जर नात्याची सुरवातच मोकळेपणाने झाली नाही तर मनं हमखास दुखावणार. यासाठी प्रामाणिकपणा व समजुतदारपणा असावा.

        एकदा विवाहाचा निर्णय झाल्यावर महत्वाच्या वाटू शकतात अशा गोष्टी उशीरा सांगीतल्या तर ती परिस्थिती थोपवल्याप्रमाणेच होणार…. प्रेमाखातर लोक सहन करतातही. पण जाणून बुजून दुखावल्याच्या भावनेचं काय? “पुर्ण आयुष्यभर त्या विषयावर बोलणी ऐकायची तयारी ठेवावी लागेल” हे सुद्धा म्हणणं कितपत योग्य आहे ?

        प्रत्येकाने समोरच्या अपेक्षेनुसार वागावं हेच योग्य.
        आणि अशा गोष्टी बोलण्याची योग्य वेळ म्हणजे लग्न ठरण्याआधीच! त्यामुळे एकमेकांवरचा विश्वास टिकून राहतो.

        • प्रशांत
          मत भिन्नता असू शकते. पण
          थिअरॉटिकली एकदा सगळं सांगितल्यावर- म्हणजे स्पष्टंच लिहितो, लग्नापुर्वीची अफेअर्स सांगितल्यावर त्या बद्दल कायम मनात संशय राहिलच असे वाटते.
          माझ्या मित्राच्या बाबतीत तर कुठलंही भांडण झालं , तरीही तो रेफरन्स हा येतोच!! म्हणून माझे मत तसे तयार झाले असावे.
          असो. तुमच्या मताचा पण आदर आहेच.
          प्रतिक्रियेकरता आभार.

  11. Bharati says:

    नेहमी खरे बोलणारा जर लप्वचप्विने वागू लागला किव्हा खोटे बोलू लागला तर नेमके ते उघडकीस येते कारण त्याचा /तिचा स्वभाव. उद्या तू तुज़ा मित्राबदल कडी बोलली/ बोलला नाहीस म्हणून पण संशयी संशय घेणारच ना महेंद्राजी ! कारण त्यांचा स्वभावच मुळात संशय घेणे.बाकी तुमचे बोलणे अनुभवाचे नि तत्थ्याचे पण आहेच यात प्रश्नच नाही.

  12. महेंद्र जी

    पोस्ट छान झाली आहे

    काही ठिकाणी पोलीटीकली करेक्ट असायला पाहिजे, नाही का?

    विनोद

  13. bhaanasa says:

    हा हा…. इतका गहन आणि अतिशय ट्रिकी विषय आहे. भावनांच्या भरात खरेखुरे बोलावे तर आपल्याच पायावर आपल्याच हाताने कु~हाड मारून घेण्यासारखे. मूळ उद्देश राहतो बाजूलाच आणि घडते भलतेच….. बरेच जण ( स्त्री-पुरूष ) खोटे बोलून स्पाउसच्या मनातले काढून घ्यायचा घाट घालतात….. आणि मग याला जोडीदार बळी पडला की मी असे काही केलेच नव्हते पण त्यामुळे तुझे खरे रूप मला कळले नं… 😦 मग आयुष्यभर काहीही झाले की हे बाहेर आलेच पाहीजे… थोडेफार पझेसिव्ह असावेच.. . नाहीतर काय सर्वसंग परित्याग केल्यासारखे झाले तर रोमान्स संपूनच जाईल…. पण संशयी नसावे. शिवाय अगदी प्रत्येक गोष्ट एकमेकांच्या कानाला लागायची काही गरज नसते…. त्याने निष्कारण नको ती संकटे ओढवतात…

    • विषय तर सेन्सिटीव्ह आहेच. म्हणूनच लिहितांना थोडं काळजीपुर्वक लिहावं लागलं.
      बहुतेक प्रत्येकच जण या सापळ्यात सापडण्याची शक्यता असते. फक्त काही लोकं वाचतात , आणि बरेचसे अडकतात..
      संशय नसला, तरी पण भांडणामधे हा विषय निघतोच प्रत्येक वेळेस हा विषय निघतोच आणि हुकुमाचा एक्का म्हणून वापरला जातो .

  14. महेंद्र,

    लग्नाच्या जोडीदारासोबत खरं काय ते सर्व मोकळेपणे बोलावं असं मला वाटतं. जोडीदार ह्या गोष्टींचा नंतर बाऊ करत असेल तर असा जोडीदार काही नं सांगता सुद्धा कुठ्ल्याश्या गोष्टीवरून बाऊ करेल. आजच्या फ़ेसबूकच्या जमान्यात न सांगितलेली गुपितं बाहेरून कळली तर मोठी पंचाईत!

    ह्या बाबतीत आम्ही नशिबवान. दोघांचाही मित्रमैत्रिणी परिवार मोठा. पण त्याचा बाऊ कधी झाला नाही, कारण एकमेकांवरचा विश्वास.

    • निरंजन
      मी मित्र मैत्रीणींच्या बद्दल लिहिलेलं नाही तर लग्नापुर्वीच्या बॉय फ्रेंड आणी गर्ल फ्रेंड सदृष्य रिलेशनशिप बद्दल लिहिलंय.
      मित्र परीवार तर बराच मोठा असतो,पण त्यातल्या त्यात नाजूक संबंधांबाबत बोलतोय मी.

  15. एकूण एक शब्द पटला. अगदी खरंय.. लेख नेहमीप्रमाणेच मस्त..

  16. गौरी says:

    मस्तच अनुभवाचे बोल … फक्त ते एकमेकांच्या पूर्वीच्या / ऑफिसमधल्या मित्रमैत्रिणींविषयी न सांगण्याचं पटलं नाही. लग्न ठरायच्या आधीच एकमेकांना विश्वासात घेऊन सांगितलेलं बरं असं माझं मत आहे. जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या भूतकाळासकट आणि घराबाहेरच्या वर्तमानासकट स्वीकारू शकत नाही, तिच्याबरोबर तुमचं शेअरिंग फार मर्यादित राहिल असं वाटतं. सुदैवाने लग्न ठरण्यापूर्वी नवर्‍याशी हे सगळं मोकळेपणाने बोलायची संधी मिळाली, आणि अजूनतरी कुठल्या भांडणात या दारूगोळ्याचा वापर झालेला नाही 🙂

    • गौरी
      एखादी गोष्ट सांगायची, आणि मग त्याने / तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पाहिजे अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा ती गोष्ट तशीच अध्यारुत ठेवल्याने काय फरक पडणार आहे मोठासा?? असो.
      तेवढीच गोष्ट शेअर न केल्याने काही फरक पडत नाही खरं तर. ऑफिसमधले मित्र मैत्रिणी ठिक आहे, पण त्यांची तारिफ करण्याऐवजी शाहरुख खानची केली तर ती जास्त लाईटलीघेतली जाते.

      • Prashant says:

        महेंद्र, एकदम चूक.
        मला गौरीचं पटतं

        शिवाय, मित्रमैत्रिण आणि रोमॅंटिक रिलेशन्स किंवा फ्लर्टिंग यातला फरक आपल्या मनाला कळत असतो.
        मला नाही वाटत अशाप्रकारे माहिती लपवून काही साध्य होईल.
        भूतकाळ आणि आता त्या व्यक्तीशी कशी वागणूक आहे, याबाबतीत बोलण्यात पूर्णपणे प्रामाणिकता असावी असं माझं मत आहे.

  17. trupti salvi says:

    काका,
    अनुभव नाही पण तुमचा शब्दानशब्द पटला….काय तर्राठ लिहिता तुम्ही…

  18. sonali kelkar says:

    🙂 🙂 🙂
    kai pratikriya dyavi tech kalat nahiye.

  19. Aparna says:

    काका तुम्ही आमच्या नुस्त्या खादाडीजगताचे नाही तर या समस्त मराठी ब्लॉगजगताचे राजे आहात असंच म्हणायला पाहिजे….इतक्या नाजुक विषयावर पण तुमची P.hd. झाली आहे…सही आहे….:)

  20. जबरी 🙂 बस एवढच म्हणेन.
    नातेसंबंधावरील विषय हाताळण्यात तुमचा हात कोणी कोणी नाही धरू शकणार…

  21. abhijit says:

    ब-याच दिवसांनी प्रतिक्रिया देतोय. मला बायकोला सगळं सांगायची खूप इच्छा होती पण तिला सांगावे असे खास अजून काही घडलेच नाही !
    🙂

  22. ngadre says:

    Mahendraji..

    Ekdum sixer post ahe hee..

    Number one..

    Nachiket

    • नचिकेत
      बऱ्याच दिवसानंतर??
      बिझी कां? पण त्या ब्लॉगर्स मीटला नक्की यायचं बरं कां..

  23. ngadre says:

    Tumhihi majhya blog var baryaach kalaat ala nahit vatate..halli kahi entries kelya ahet..

    • बघतो आता:) मध्यंतरी ठराविक वेळच नेट वर असायचो, म्हणुन ब्लॉग वाचणं बरंच कमी झालं होतं.

  24. अनिकेत वैद्य says:

    50!!!
    50 !!!

    लेख झकास आहे.

  25. मकरंद says:

    महेंद्र्जी

    लेख छानच आहे.
    अविवाहितांसाठी मोलाचा लेख.
    जर ह्या चुका केल्यातर तर उपाय काय?
    ह्यावर सुद्धा एक लेख लिहावा ही विनंती.
    (आपला अभ्यास दांड्गा दिसतोय :-)) म्हणून ही विनंती.)

    धंन्यवाद.

    • मकरंद
      कसला अभ्यास.. ब्लॉगचं नांवच काय वाट्टेल ते आहे , त्यामूळे काहीही लिहिता येतं.
      चुकांवर काही उपाय नाही असे वाटते मला तरी. एखाद्या पोलिसचौकिच्या परिसरात एखादा गुन्हा घडला की कसे आधी सगळ्या सुधारलेल्या कैद्यांना बोलावून चेक करत्तात , तसेच इथे पण सुरु आते. मग सारखं जागरूक रहावं लागतं झालं.

  26. 🙂 अगदी पटेश !!

  27. Prashant says:

    हा एक लेख पहा:
    http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=38419:2010-01-08-12-35-13&Itemid=1

    अशा गोष्टी योग्य वेळेस बोलल्या गेल्या पाहिजे.

    हनिमूनच्या वेळेस बोलणे म्हणजे फारच उशीर. शुद्ध मुर्खपणा.

    जोडीदारांतला संवाद व आपल्या नात्याबद्दल प्रामाणिकपणा, हेच सुखी प्रेमिकांसठी गुरुकिल्ली आहे.
    तसंही दोन व्यक्ती ह्या इतक्या भिन्न असू शकतात, की तुम्हाला अजून झाकपाक ठेवून आयुष्य कठीण करुन घेण्यात का धन्यता वाटावी हेच समजत नाही.

    • प्रशांत
      ही कॉमेंट स्पॅम ला गेली होती. माझं मत एवढंच आहे की गरज नसतांना उगिच जुन्या गोष्टी सांगून कॉम्प्लिकेशन्स वाढवून ठेउ नये. पुरुषाच्या दृष्टीने तर सोपं आहे ते, पण एकदा स्त्रिने आपले जुने प्रेमसंबंध सांगितले, की तिचं पुढलं आयुष्य कसं राहिल हे वेगळं सांगायची गरज नाही.

      भारतामधे अजूनही योनी शुचिता चे खूप जास्त महत्व आहे. आणि मुळ पुरुषी स्वभाव जो मुळातच संशयी असतो त्याला हे ऍक्सेप्ट करणं फार अवघड जातं की त्याच्या बायकोचे लग्नापुर्वी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम होतं.

      पुरुष सांगेल, तर स्त्री एक वेळ माफ करेल, पण पुरुष कधीच माफ करू शकणार नाही. त्याच्या मनात हा संशय नेहेमीसाठीच राहिल की हीचे संबंध कुठ्पर्यंत पोहोचले असावेत ???? आणि हा संशयाचा भूंगा कितीही एक्सप्लेन केलं तरी दूर होणारा नाही.

  28. ngadre says:

    Though it sounds against all ideal theories, I kind of agree with Mahendraji..all things before marriage are so non applicable that it’s better not to mention them and accept that there must have been someone in each other’s life before marriage.

    It’s really really difficult to KNOW your spouse’s affair and still forget it..especially if THAT person is still around..

  29. चांगल्या टिप्स दिल्या आहेत,लक्षात ठेवाव्या लागतील ….काउंसलिंगचा बिज़िनेस चांगला करु शकता तुम्ही… 🙂

  30. मी says:

    लय भारी पोस्ट,
    एका अवघड जागेवरच्या दुखण्याला हात लावलाय तुम्ही‌, पण ‘यिन्ग-यान’ वेगवेगळे आहेत म्हणूनच मजा आहे.
    जाताजाता : या पोस्टचा ‘रेफरन्स’ स्पाऊसला पाठवण्याच धाडसही‌ बहुतेकांनी केलं नसेल. 🙂

    • पण मजा आली. माझी बायको तर नेट वर नसतेच, म्हणून मला काळजी करायचं काहीच कारण नाही. 🙂 जर असती तर माझी अगदी बिनपाण्याने केली असती हे नक्कीच!!!

      ’ती’ कोण? किंवा अशी कोणी होती कां?? हा प्रश्न छळत राहिला असता नेहेमीसाठी. 🙂

  31. Sarika says:

    काका,

    पोस्ट मस्त झाली आहे. माझा स्वत:चा अनुभव नाहि पण आपण हे का मोकळेपणाने बोललो असा पश्चाताप नंतर होइल असा जोडीदार कोणालाच मिळु नये. आणि तसाही खरा स्वभाव हा बर्याच काळानंतर कळ्तो ना…

    • स्वप्नातली दुनिया आणि वास्तव या मधे बराच फरक असतो, ही गोष्ट विसरुन चालता येत नाही.

  32. trupti says:

    khup chhan vatale post vachun. majhya aathavani tajya jhalya. mala aalela anubhav asa aahe ki lagna aadhi jenvha kahi divasani doghe jenvha ekmekana thode olakhayala lagatat tenvha sangayala kahich harakat nahi. pan sarakhe sarakhe tya vishayavar bolayache talane kinva tyabaddal vichar na kelelach bara ase mala vatate.

  33. Shilpa Gaikwad says:

    Mastach lekh kaka,khup avdla 🙂

  34. Love marraige jal asltri navryach adhich n atach prem kami jalay va kalji aplukj javalik lagnachya 1month adhich kami jal tr kas jagav bayko ne
    Shivay navra ajibat ch bolat nasel tr ky karav kas vagav
    Plz give me tips about happy married life

Leave a comment