कुच बिहार…

साधारण २० एक वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा माझं पोस्टींग कलकत्त्या ला होतं . कलकत्ता ऑफिस  मधे सर्व्हीस इंजिनिअर म्हणून साधारणतः ७-८ महिने काढले. दार्जिलिंग डुवाट्स टी गार्डन चा एरिया ,असाम,  बिहार मधे टुर ला जावं लागयचं.

८ महिन्यांच्या पोस्टींग पैकी जास्तीत जास्त वेळ मी सिलिगुडी लाच राहुन तो सगळा एरिया कव्हर करत होतो. अगदी धुला बाडी  हा नेपाळ बॉर्डर आणि ईंडॊ भुतान बॉर्डर पर्यंत.

माझा एक स्वभाव आहे . मी नेहेमीच ओव्हर कॉन्फिड्न्स   असयचो. कुठलंही काम असलं तरी केंव्हाही तयार !कारण तरुण वय, काहीही करण्याची जिद्द, आणि अंगात असलेली रग, ह्या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे त्यावेळचा “मी”.

एकदा कलकत्ता ऑफिस मधे बसलो असतांना आमचे त्या वेळचे बॉस जयदेव ह्यांनी बोलावले आणि सांगितले की तुला कुच बिहार ला कामासाठी जायचे आहे. ही गोष्ट आहे साधारणतः ५-६ महीन्या  नंतरची. तशीही मला आता सवय झाली होती , कधी बिहार, तरी उत्तर बंगाल ला जाण्याची.

बिहारचा बराचसा भाग अजुन ही पाहिलेला नव्हता. पण जेंव्हा सांगितलं की कुच बिहारला जायचयं, तेंव्हा कुच बिहार म्हणजे नक्कीच कुठेतरी बिहार मधे असेल असा मनाशी अंदाज बांधला आणि सरळ   कुणालाही   न विचारता मी सरळ बॅग उचलली आणि हावरा स्टेशन ला पोहोचलो. ब्लॅक डायमंड एक्स्प्रेस जी कलकत्ता ते धनबाद होती ती्ची वेळ झालीच होती, ती पकडली आणि सरळ धनबाद्ला पोहोचलो.

बरं, धनबादला पोहोचे पर्यंत कोणालाही काहीच विचारावेसे वाटले नाही. जेंव्हा स्टेशन उतरलो आणि बस स्टॅंड वर जाउन चौकशी करणे सुरू केले- कुच बिहारके लिये कौनसा बस जायेंगा? तेंव्हा, एक माणुस म्हणाला, साहब, आप सिधा कलकत्ता जाइये वहांसे आप कुच बिहार जा सकता है.

म्हणजे काय.. मी तर उडालोच, आणि  क्या कुच बिहार ,बंगाल मे है?? हा म्हणजे माझ्या साठी एक शॉक होता.भामट्या सारखा परत परत कलकत्त्याला गेलो आणि नेक्स्ट डे ला कुच बिहारला गेलो.

काम करुन परत आल्यावर ही गोष्ट जेंव्हा माझ्या ऑफिस मधे सांगितली तेंव्हा सगळे जण माझ्या मूर्खपणा वर हसत होते.. आणि मी सुद्धा…. कधी कधी किती मूर्खपणा करतो आपण नाही?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged . Bookmark the permalink.

3 Responses to कुच बिहार…

  1. Aparna says:

    mast maja aali wachatana…ani kahi lokach itke pramanikpane aaplya fajitiche warnan karu shaktat….

  2. देवेंद्र says:

    its not strange..baryach vela hote aapli ashi faziti atiutsah dakhvalyavar
    mag aaplyala svthavarach hasavas vatat…

  3. आता हसु येतं पण त्या वेळी मात्र अगदी तोंड लपवून पळुन जावं असं वाटत होतं….नंतर कित्येक दिवस मित्र चिडवत होते ह्या विषयावरुन..

Leave a comment