विचार करण्याची क्षमता..

प्रत्येकामध्ये  विचार करण्याची क्षमता असते. मग ते विचार चूक असो किंवा बरोबर असो! प्रत्येक  घटनेवर प्रत्येकाची  मतं असतात,  काही ना काही तरी विचार पण  असतातच. बरेचसे लोकं आपल्या या विचारक्षमतेचा वापर करतात आणि बरेचसे नाही… का करत नाहीत? याची बरीच कारणं आहेत.

बरेचसे  लोकं आपले विचार  चूक असतील तर ? किंवा लोकं काय म्हणतील ? या भीतीने  कधीच   व्यक्त करत नाहीत आणि स्वतः पुरतेच मर्यादित ठेवतात,  आणि इतरांच्या विचारांना सरळ हो म्हणून  मोकळे होतात. स्वतःमध्ये असलेल्या या क्षमतेचा आपण  पुरेपूर  उपयोग करून घेतो का? आणि कितपत?  हा प्रश्न सगळ्यात जास्त महत्वाचा आहे

आपली मानसिक क्षमता कमी आहे म्हणून असे होते का?  आपली विचार शक्ती वापरायचा आलेला कंटाळा ? की स्वतःच्या निर्णय क्षमतेवर असलेला अविश्वास? की मिलियन डॉलर प्रश्न, की जर माझे विचार चूक असतील तर  लोकं काय म्हणतील ही  मनामधे असलेली एक मुलभूत भीती?

विनोदाचा भाग जरी सोडला तरीही  लग्न झालेल्या प्रत्येकालाच हा अनुभव  नेहेमीच  येत असतो, विशेषतः बायको मुलांसमोर बोलताना 🙂

बऱ्याचशा बाबतीत आपली मते फारच दृढ असतात.आपली  मते ज्या गृहितकावर आधारलेली असतात, ती गृहितके जरी चूक असली तरीही आपले मन  काही ते मान्य करायला तयार नसते . बरेचदा तर घेतलेले निर्णय    सोसायटी ड्रिव्हनही असतात.  म्हणजेच इतरांच्या अनुभवावरून आपले मत /निर्णय ठरवले जातात. इथे स्वतः विचार करण्याची गरज  नसते तर दुसऱ्याने  प्रदर्शित केलेले मत, किंवा आत्मसात केलेला विचार  फारसा विचार न करता मान्य करायचा  असा प्रकार असतो .   त्याने निर्णय घेतला ना, मग मी  पण तसाच घेतो म्हणजे त्याचे होईल ते माझे पण होईल . असेही असते. एका मेंढीच्या मागे जशा सगळ्या मेंढ्या जातात  (कळपाचे मानसशास्त्र)तसेच आहे हे .उदाहरणार्थ लहान गावातला शेतकरी ट्रॅक्टर  विकत  घेतांना  निर्णय कसा घेतो- तसेच! याला काय  वैचारिक किंवा मानसिक गुलामगिरी म्हणायचं का? नाही.. तसे नाही.

याची  सुरुवात कशी होते  ते पहाणे मजेशीर ठरेल!  एक कारण आहे व्यक्तीपूजे पासून.  एखाद्या नेत्याचे जर तुम्ही अनूसरण करत असाल तर त्या नेत्याने जे काही म्हंटले ते मान्य करण्याची परवानगी तुमच्या सबकॉनशस माईंड ने कॉन्शस माईंडला देऊन ठेवलेली असते. त्या मुळे तुम्हाला  नेत्याचे प्रत्येक वाक्य  ब्रह्म वाक्य आहे असे वाटते आणि ते बरोबर आहेच असे गृहीत धरुन अजिबात सारासार विचार न करता -तुमचे मन ते  सरळ मान्य करून टाकते. मग नेत्याचे विचार जरी चुकीचे असले तरीही!

आपला समाज हा अतिशय  भावना प्रधान आहे आणि    एखादी लहानशी घटना पण सामाजिक उलथापालथ घडवून आणू शकते. भावना दुखावण्यासाठी साठी  अगदी लहानसे कारणही पुरेसे ठरू शकते.

एखादी चूकीची गोष्ट समाजाला सारखी उगाळून सांगत राहिले की समाजाचा त्या घटनेकडे पहाण्याचा दृष्टीकोन तयार होतो. या मधे दूरदर्शन, वृत्तपत्रे ही माध्यमं पण खूप कारणीभूत ठरतात. कळत न कळत समाज मनावर या माध्यमांचा खूप परिणाम होतो. एखाद्याला तुम्ही सारखं कानी कपाळी ओरडून सांगितलं की तुझा अपमान होतो आहे, की मग  समाजातल्या त्या घटकाला त्याला प्रत्येकच गोष्टीत आपला अपमान होतोय असे वाटू  लागतं.

एखाद्या घटनेबद्दल स्वतःचे मत ठरवताना कुठल्याही प्रकारे पूर्वग्रहदूषित न ठेवता विचार  केला तर त्या प्रत्येक प्रॉब्लेमचे योग्य उत्तर मिळू शकेल.  जर तसा विचार केला तरच   तुमचे स्वतःचे विचार इतरांपेक्षा वेगळे असतात हे  लक्षात येईल.

बरेचदा आपले वेगळे विचार कुठे बोलून दाखवले तर   मग त्या लहानशा घटनेचा संदर्भ तुमच्या लॉयल्टीशी /देशप्रेमाशी जोडला जातो.   तुम्ही  समाज द्रोही /देश द्रोही , तसेच स्वतःच्या संस्कृती बद्दल अभिमान नसलेले म्हणून हिणवले   जाऊ शकता.    जेंव्हा  तुम्ही एका जथ्थ्याचा भाग होऊन वहावत न जाता स्वतः विचार करता – म्हणून तुमच्याकडे पहाण्याचा इतरांचा दृष्टीकोन एकदम वेगळा होतो .

नुकताच सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचला जेम्स लेन वर.  सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे तेवढे एक वाक्य ( जे पण ऐकीव   गोष्टींवर अवलंबून आहे ते )  सोडले तर त्या पुस्तकामध्ये काहीही आक्षेपार्ह नाही. ते एक सर्वसामान्य इतिहासाचे पुस्तक आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णया प्रमाणे आता ते वाक्य वगळून ते पुस्तक लवकरच प्रसिद्ध केले जाईल. जर कोणी सुप्रीमकोर्टाचा निकाल योग्य आहे असे म्हंटले तर त्याला मराठी द्वेष्टा, शिवरायांच्या बद्दल आदर नसलेला वगैरे असा केला जाईल. त्याचे विचार पुर्णपणे समजून न घेता.   खरे तर या विषयावर लिहायचे म्हणून  सुरु केलेले पोस्ट असे तयार झाले. लिहून झाल्यावर लक्षात आले की कालचे पोस्ट पण अशाच प्रकारचे होते.असो..


About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

38 Responses to विचार करण्याची क्षमता..

  1. sumedha says:

    सारासार विवेक वापरणे महत्वाचे , तेच आपण टाळतो .

    • सुमेधा
      सारसार विवेक तर महत्वाचा, पण त्याच बरोबर स्वतः विचार करून आपले विचार स्पष्ट पणे मांडणॆ अतिशय आवश्यकआहे. बरेचसे विचार तर मनातल्या मनातच विरून जातात.

  2. Pingback: Tweets that mention विचार करण्याची क्षमता.. | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

  3. काका, मला वाटतं इतरांना काहीही वाटो आपण आपले विचार कोणाचीही विनाकारण भीडभाड न ठेवता व्यक्त केलेच पाहिजेत. ते इतरांना पटतील की नाही हा वेगळा मुद्दा झाला. व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे प्रत्येकाची मतं वेगळी असणारच. आणि मतभेद असणं ही एक प्रकारे चांगली गोष्ट आहे कारण त्यामुळे समाज वेगवेगळया दिशेने विचार करतो आहे हे सिद्ध तरी होतं. सगळ्यांचीच मतं एकसारखी असली तर तर ही विचारप्रक्रियाच थांबली आहे असं होऊ शकतं.
    “I may not agree with what you say, but I will fight to the death for your right to say it” -Voltaire

    • हेरंब
      अगदी बरोबर!
      विचार मंथन त्यालाच म्हणतात, जर सगळेच लोकं सारखाच विचार करायला लागले तर प्रगती खुंटेल. न्युटनने सफरचंद झाडावरून पडताना पाहून वेगळा विचार केला म्हणून तर ग्रॅव्हिटीचा शोध लागला..अशी अनेक उदाहरणं देता येतील.

  4. महेंद्र (जी नको म्हणण्याइतपत आता तुम्ही आमच्या भावविश्वात आहात) छान पोस्ट आहे. व्यक्तिप्रामाण्य,ग्रंथप्रामाण्य का निर्माण होते? सुरक्षितते पोटी. मानवाच्या उत्क्रांतीचा टोळी वा समूह जीवनात टोळीप्रमुख हा आपले राज्य /सत्ता राखण्यासाठी नियम/कायदे/रुढी निर्माण करायचा त्यानुसार इतरांनी वागायचे. इतरांचा यात फायदा असा कि अनुनयात / अनुयायीत्वात भौतिक व मानसिक सुरक्षितता मिळायची. इतर टोळीपासुन संरक्षण मिळायचे. या टोळीप्रमुखाची पावर कमी होऊ लागली कि बंडखोर उचल खायचे व ते पद आपल्याला मिळावे यासाठी त्याच्याशी युद्ध करायचे बंडखोर जिंकले कि सत्तांतर व्हायचे. आजही समाजता सत्तारुढ प्रवृत्ती २ टक्के, बंडखोर प्रवृत्ती २ टक्के व उरलेले सगळे मागे मेंढरांसारखे. ही जैविक प्रवृत्ती आहे. उत्क्रांतीत ही टिकुन राहिली.
    बाकी सध्या लेनप्रक्ररण खुपच चर्चिले जाते ते बंदीमुळे. समजा त्यावर बंदी घातली नसती तर असे पुस्तक येउन गेले हे फारसे कुणाच्या लक्षातही आले नसते. खाली चर्चा पहा

    http://mr.upakram.org/node/2625
    जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी उठवली

    http://mr.upakram.org/node/2631
    परत एकदा जेम्स लेन

    http://www.misalpav.com/node/13138
    जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी उठवली.

    http://www.misalpav.com/node/13219
    जेम्स लेनच्या निमित्ताने उघडी पडणारी मराठी वैचारिक दिवाळखोरी

    • प्रकाश
      मनःपुर्वक आभार. अतिशय सुंदर लिंक दिल्या आहेत तुम्ही. काल सुटी मुळे घरी होतो आणि नेट बंद पडल्याने रिप्लाय देता आला नाही. तुमचे हे वाक्य ” समजा त्यावर बंदी घातली नसती तर असे पुस्तक येउन गेले हे फारसे कुणाच्या लक्षातही आले नसते” अगदी पुर्णपणे मान्य.
      पण खरं सांगतो, माझी इच्छा आहे वाचायची आणि मी शोधतोय कुठे मिळतं का ते. जर लिंक सापडली तर पोस्ट करेन ब्लॉग वर.

  5. Nikhil Sheth says:

    अगदी मान्य.. खर तर मीही लिहिणार होतो यावर पण मागेच त्यावर काही तरी खरडल्याने लिहिले नाही. ते पुस्तक खरंच वाचनीय आहे. इथे मिळत नव्हते तेव्हा दुसरीकडून मागवून वाचले होते. ‘शिवाजी महाराज’ ही जी संकल्पना आहे; ती त्यांच्या काळात कशी होती, त्यांच्यानंतर काय होती, पेशवाई काळात काय झाली, ब्रिटीश काळात कशी बदलली आणि आत्ता काय हे… असा प्रवास धार्मिक आणि राजकीय अंगाने मांडला आहे. त्यासाठी प्रत्येक काळातल्या संदर्भांचा उपयोग केला आहे. आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष खरे तर नवे काहीच नाहीयेत पण सगळे एकत्र आणि लिखित स्वरुपात इंग्रजी मध्ये पहिल्यांदा मांडले आहेत हे विशेष. अन्यथा सगळे इतिहासकार खाजगीमध्ये या विचार-प्रवाहांचा उल्लेख करतातच.

    • माझी इच्छा खूप आहे ते पुस्तक वाचायची. शोधतोय कुठे सापडतं का ते.
      पुस्तक न वाचताच त्यातले एक वाक्य घेउन त्यावर गदारोळ उडवायचा आणि मग बंदी घातली म्हणून जल्लोश, आणि बंदी उठवली कोर्टाने की मग पुन्हा दंगा…. काय बोलणार यावर?

    • लीना चौहान says:

      निखिल ने लिहिलेलं परिक्षण मी वाचलं होतं. आजच लोकप्रभा मधे राजू परुळेकर चा लेख वाचला. लिन्क देत आहे. http://www.loksatta.com/lokprabha/20100723/lkemistry.htm राजूनी अगदिच टोकाचं परिक्षण लिहिलं आहे.

  6. shivaji maharajanchi kirti evdhi thor hoti ki….eka pardeshi lekhakala hi tyavar pustak lihavese vatle….ya ghoshticha abhiman balganya evji tyavar bandi ghatli jate….agdi lajirvani bab ahe.

    • श्री शिवाजी महाराजांच्या बद्दल मराठी मनात असलेला आदर हा शब्दात व्यक्त करता येणारच नाही. श्री आबा पाटीलांच्या ब्लॉग वर पण मी कॉमेंट दिली होती, पण ती त्यांनी अप्रुव्ह केली नाही.. असो.

  7. मनोहर says:

    विचार करणे टाळले जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे आतापर्यंत म्हणजे पूर्वायुष्यात ज्या पूर्वग्रहानी आपले स्वतःचे जीवन (तथाकथितरीत्या) सुखकर बनविले ते सोडावे लागण्याची भीती हे होय.

  8. Vidyadhar says:

    काका,
    अगदी हेच…मी स्वतः जोपर्यंत जेम्स लेन वाचत नाही, तोवर कसं म्हणू त्याने अपमान केलाय की नाही आणि जरी असला, तरी त्याचे निषेध करण्याचे मार्ग आहेत.
    बाकी, न्यायालयाच्या निर्णयावरून पब्लिकनं भलतीच राळ उठवलीय, मी तर म्हणतो, न्यायालयाचा निर्णय म्हणजे राष्ट्रीय भूमिका नाहीय, एव्हढा बवाल करायला. पण लोक खरंच इमोशनल होतात, कारणं न जाणता.
    ह्यावर एक उदाहरण सांगतो,
    ‘वॉटर’ ह्या सिनेमाचं वाराणसीत शूटिंग करायचं होतं, त्याला फार मोठा विरोध केला गेला ज्यामुळे त्याचं शूटिंग दीपा मेहताने कॅनडात केलं. हा सिनेमा कसा होता ते सोडा, पण जेव्हा विरोध प्रदर्शन करणार्‍यांपैकी सामान्य लोकांना विचारलं की तुम्ही का विरोध करताय, तर एका ग्रामस्थानं उत्तर दिलं, “हमरी गंगामैया को ‘वाटर’ कहते हैं।”

    • तेच म्हणायचंय.. न वाचताच कसं काय इतके इमोशनल होतात लोकं? बरं कोणाचीच वाचायची पण इच्छा नाही- फक्त बंदी आणा म्हणुन गोंधळ सुरु आहे. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे तेवढे वाक्य काढुन पब्लिश करु द्यायला हरकत नाही कोर्टाची.मला वाचायचं आहे . शोधतोय कुठे सापडेल तर ( अर्थात फुकट)
      वॉटर ,फायर, दोन्ही वेळेस झालेले गोंधळ चांगले ध्यानात आहेत.

  9. लीना चौहान says:

    भारतातील १०० कोटींपैकी ७०-८०% टक्के लोकांना स्वतः विचार करणे जमत नाही. किंबहुना भारतात असचं शिकवलं जातं. त्यामुळेच तर राजकारणी आणि धर्मकारणी लोकांचे फावते. अगदी शिकलेले लोक सुद्धा याला अपवाद नाहीत. ज्याबद्दल स्वतःला काही माहिती नाही त्यावर सुद्धा लोक हिरिरीने भांडत असतात. मोठ्या लोकांबद्दल आदर असावा पण आधी त्यांचे मोठे पण तरी पारखून घ्यायला पाहिजे. इथे मोठे म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल मी बोलत नसून, जे राजकारणी पुस्तकावरून वादंग घडवत आहेत त्यांच्याबद्दल बोलत आहे. शिवाजीराज्यांबद्दल Hindu king in Islamic India असे म्हणल्यावर यांचे शिवाजी प्रेम एवढे ऊतू जाते, पण आज महाराष्ट्रातच इतिहास बदलला जात आहे. शिवाजी राजे रामदासांना कधी भेटलेच नव्हते, दादोजी कोंडदेव हे शिवाजी राजांचे गुरू नव्हतेच. अजून ५० -१०० वर्षांनी रामदास असे कोणी संतच झाले नव्हते असेही म्हणतील. मध्यंतरी साप्ताहिक सकाळ मधे सदानंद मोरे यांनी लिहिलेला एक लेख वाचण्यात आला. त्यात इतिहासकार राजवाडे यांच्याबद्दल तर इतकं लिहिलं होतं की तो लेख माहितीपूर्ण वाटण्याऐवजी १००% ब्राह्मणद्वेषातून लिहिल्या सारखा वाटत होता. महाराष्ट्रातला मराठा – ब्राह्मण द्वेष इतका पराकोटिचा आहे कि या पैकी कोणीही पुस्तक लिहिले तर ते एकांगी होण्याचीच शक्यता जास्त आहे. अश्या वेळेस एखाद्या तिऱ्हाईताने म्हणजे इथे जेम्स लेन, लिहिलेले जास्त खरे असू शकते.

    • लीना
      सदानंद मोरे, आणि इतर स्वघोषित इतिहासाचार्य स्वतःला वाटेल तसा इतिहास वाकवताहेत. ज्या बाबासाहेब पुरंदरेंना राज ठाकरे पण वाकुन नमस्कार करतात, त्या सारख्या माणसाचे पण एकेरी उच्चार करणे, किंवा त्यांना वाईट शब्द वापरणे, वगैरे अगदी कॉमन झाले आहे. समर्थ रामदासांचा पण असाच उल्लेख केला जातो. जातियवादी विषवेली पेरून काय मिळवणार आहेत हे लोकं कोण जाणे..
      यावर पुर्वी एक पोस्ट लिहिले होते..
      इथे आहे बघा ते..

      ई. सन. २३५९…

      • लीना चौहान says:

        एकदा मला आसारामबापूंच्या आश्रमात जावे लागले. म्हणजे माझी इच्छा नव्हती पण जावे लागले, तिथले वातावरण बघून मला अक्षरशः गुदमरायला झालं. लोक इतके बिनडोकपणे अनुकरण करत असतात. तिथे गेल्यावर तर असच वाटतं देवाने एवढा गुंतागुंतीची रचना असलेला मेंदू कशाला दिला असेल माणसाला, जर फक्त कोणाचे तरी अनुकरणच करायचे असेल, तर प्रत्येकाला मेन्दू हवाच कशाला. यांचे अनुयायी इतके कट्टर असतात की काही प्रश्न विचारणे म्हणजे त्यांचा अपमान करणे असेच समजतात. जसं जसे मराठी सोडुन इतर लोकांमधे मिसळण्याची संधी मिळाली, मला खरचं अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रात जन्मले आणि वाढले. कारण महाराष्ट्रात खरच खुप रॅशनल आणि प्रोग्रेसिव (या शब्दांना पर्यायी मराठी शब्द मला आठवत नाहियेत) विचारांचे लोक आहेत.

        • अशा सस्तंगी साधू, किंवा सेल्फ प्रोक्लेम्ड धर्म गुरुंबद्दल काय बोलणार? तो तर अजून एक संशोधनाचा विषय आहे.
          परवाच एक सुंदर पुस्तक वाचनात आले. अनिस तर्फे डॉ. पाटील यांनी लिहिलेले. “तुम्हाला बरे का वाटते?” असे नांव आहे. त्यात त्यांनी तुमच्या मेंदू मधे काय उलथा पालथ होते, आणि केमिकल्स चा रिसाव झाल्या मुळे कसे बरे वाटते ह्याचे उत्तम विश्लेषण केले आहे. मिळाल्यास अवश्य वाचा.
          जमल्यास त्या पुस्तकावर रिव्ह्यु लिहीतो लवकरच.

  10. bhaanasa says:

    वैचारिक व तात्विक मतभेद, मतांतरे असणे अंत्यत जरूरीचे आहे. अन्यथा सगळ्यांचा विचारप्रवाह/मते एकाच दिशेने प्रवाहित झाल्यास प्रगतीच खुंटेल. जसे तू म्हटलेस तसेच बरेचदा होत असते. निर्भिडपणे मते मांडण्यास ९०% लोक कचरतात. बाहेरचे जाऊच दे रे. घरच्यांसमोरही मांडू शकत नाहीत. ( दुर्दैव ) अजूनही कित्येक घरात असा समज आहे की मोठ्या माणसांसमोर आपले मत मांडणे म्हणजे चक्क अपमान करणे. एकच गोष्ट अनेकदा व अनेक तोंडानी सारखी बोलली, बिंबवली तर त्याचे सखोल परिणाम नक्कीच होतात. त्यावेळी विवेक बाजूलाच राहतो. कधी कधी तर कळत असते, की हे चूक आहे तरिही केले जाते. 😦 विशेषत: देशप्रेम किंवा देश-धर्मद्रोह याबाबतीत तर ह्याचा अतिरेकच आढळतो.
    महेंद्र, अतिशय महत्वाचा विचार मांडलास. पोस्ट भावली.

    • स्वतःचे विचार व्यक्त करता येऊ नये या पेक्षा वाईट काय असेल ? अगदी पती- पत्नी नात्यांमधे पण विचार व्यक्त केले जात नाहीत. बरेचदा तर “जाऊदे” कशाला उगिच रुसवा फुगवा म्हणून सोडून देणे हे तर नेहेमीच चालते.

      स्वतःला काय वाटतं हे आपण नेहेमी स्वतः पुरतंच का मर्यादित ठेवतो? का आपण बोलू शकत नाही हवे तेंव्हा आपले विचार? या प्रश्नाने तर नेहेमी हॉंटींग केलंय मला- पण उत्तर कधीच सापडत नाही.

  11. Pingback: विचार करण्याची क्षमता.. | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

  12. रमेश म्हात्रे says:

    आधी “कठीण निर्णय” आणि आता “विचार करण्याची क्षमता” दोन्ही पोस्ट छान आहेत.

  13. काका,
    एका जबरदस्त विषयावर लिहिले आहे तुम्ही‌. ज्याला ‘तर्कबुद्धीप्रामाण्य’ म्हणता येईल याचा वापरच बंद झाला आहे. गेले दोन अडीच वर्ष ‘विचार कसा करायचा’, मतं का आणि कशी मांडायची , स्वत:भोवतीच जग नव्या दृष्टीने पहात येईल का ? आपले जगण्यातले मूलभुत प्रश्न कोणते यावर विचार करत असताना,बऱ्याच नोटस जमा झाल्या, माईन्ड मॅपसारख्या टूल चा वापर आणि अभ्यास झाला आणी कधीतरी‌ असं वाटत होत की‌आपण मुलांसाठी – ‘हाऊ‌ टू‌ थिंक टू थिंक’ सारखी व्याख्याने द्यावित आणि त्यात तर्कसंगत विचार पद्ध्टि, माईन्ड मॅप आदी गोष्टी शिकवाव्यात .. अर्थात हे फक्त वाटत होत पण तुमच्या पोस्टने एक गोष्ट् नक्की झाली .. सगळीकडे बोब सारखीच आहे .. बघू मागेपुढे याचा व्यवसाय करता आला तर :)‌

    • सोमेश
      माइंड मॅप चा कन्सेप्ट खूपच छान आहे . मी स्वतः पण वापरलाय तो .
      मला नेहेमीच मनातले स्पष्ट न बोलल्याने होणारी कुचंबणा जाणवते. हाउ टू थिंक? मस्त आहे विषय .. काही हरकत नाही.. एक पोस्ट येउ दे या विषयावर.. 🙂

  14. माझ्या मते खरं तर हे सगळं माणूस लहानपणी शिकतो.
    १. विचार कधी करावा २. न केल्याचे दुष्परीणाम ३. स्वत:चे मत मांडणे किती महत्त्वाचे आहे ते

    आपले शालेय शिक्षण आणि एकंदरीत आपल्या लहानपणीचा इतरांसोबतचा वावर ..ह्यात जे आपण पाहतो , शिकतो तसेच घडत जातो

    मोठ्यांनी / शिक्षकांनी सांगितलेले प्रमाण मानून जगण्याची सवय होतेच

    जेव्हा ते उमगते तेव्हा हा बदल थोडासा अवघड जातो

    @सोमेश बारटक्के माइंड मॅप बद्दल वाचायला आवडेल नक्कीच

    • केतन
      लहानपणी आपण बऱ्याच गोष्टी शिकतो, मोठ्यांनी सांगितलेले प्रमाण मानून जगण्याची सवय हा वेगळा मुद्दा ठरेल. मला सामाजिक जीवनातल्या रोजच्या घटनांबद्दल म्हणायचं होतं. स्वतःचं मत व्यक्त न करता जगण्याची सवय अतिशय घातक आहे असे मला वाटते.. नेमकं तेच होत असतं नेहेमी, आपण शक्यतो निर्णय घ्यायचं टाळतो.
      सोमेश चा ब्लॉग .http://thelife.in/
      ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी आभार.

    • @केतन,
      माझ्या ब्लॉगवर- thelife.in अनेक माईन्ड मॅप्स टाकलेले आहेत, तसेच त्यावर काही लेख देखील आहेत.

  15. poojaxyz says:

    vichaar karnyachi kshmata baykanmadyech kamich aste, tyanchyawar sanskarach tase kele jatat. pan aata paristithi badalte aahe. striyaa sudha pathdibaaherchaa vichaar karu laglyaa aahet.
    aso, blog chaan hota.

    • पुजा
      तसे नाही. बायकांमधे पण भरपूर असते. फक्त पुरुषांपुढे बऱ्याचशा स्त्रिया आपले विचार व्यक्त करणॆ टाळतात. बरं , पुरुष पण स्त्रियांसमोर आपल्या मनातले खरे विचार सांगायला घाबरतात. दोन्ही बाजूनी हे सारखंच असतं..

  16. संजीव says:

    १. मी माझी जात ब्राह्मण अशी लिहितो कारण दुसरा पर्याय नाही. पण खरं तर मी शूद्र आहे. ब्राह्मणत्वाचे कोणतेही संस्कार माझ्यावर झालेले नाहीत. ब्राह्मण ही केवळ जन्माधारित योग्यता असू शकत नाही. उलट, ब्राह्मणाला वर्ज्य अशा अनेक सवयी मला आहेत ! (जास्त प्रश्न विचारू नका please!)
    २. VHP, RSS, बजरंग दल हे दुतोंडी आणि संधीसाधू लोक आहेत. याना हिंदू, हिंदुत्व या सगळ्यात काडीचा interest नाही. जातीभेद हा हिंदुधर्माचा सर्वात मोठा शत्रू आहे, मुसलमान नव्हे. पण दलितांचे खून झाले, खाप पंचायतीनी तालिबानी फ़र्मानं सोडली, की हे धर्मवीर शेपूट घालून लपतात. यांचं शौर्य फ़क्त गरीब, लाचार मुसलमानांपुढे झळकतं.
    ३. जो स्वतःला अभिमानाने हिंदू समजतो, तो माझा धर्मबंधू आहे. इतरांशी मला देणंघेणं नाही. मुसलमानांनी रामाला National Hero समजलं पाहिजे असं मला वाटत नाही.
    ४. पण जेव्हा मी असं ऐकतो / वाचतो की एका हिंदू मुलीनं / मुलानं मुसलमानाशी लग्न करून इस्लाम स्वीकारला, तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. आंतरधर्मीय लग्नं व्हावीत, पण हिंदू धर्मातून कोणी बाहेर जाऊ नये. यातून जन्मलेल्या मुलांचा धर्मही हिंदू असला पाहिजे. तसा कायदा करा भारतात हवं तर. धर्म ही व्यक्तिगत बाब असेल, पण हिंदूचे धर्मांतर होत असेल तर मग ती व्यक्तिगत बाब रहात नाही.
    ५. हिंदू धर्मात प्रवेश देण्यासाठी conversion procedure असली पाहिजे. आर्यसमाजी लोकांत अगोदरच अशी पद्धत आहे.
    ——
    Digression बद्दल दिलगीर आहे. तो ब्राह्मण-मराठा वाद इथेही आला म्हणून लिहिलं हे सगळं.

    • संजीव
      ब्लॉग वर स्वागत.
      तुम्ही लिहिलेले आरोप … त्या बद्दल काय बोलू? ब्राह्मण मराठा वाद नाही तो, त्याला तसे स्वरूप दिले जाते नेहेमीच.
      श्री शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना ( नांव चूक असल्यास दुरुस्त करा. मला जरा कन्फ्युजन आहे या नावाबद्दल) पुन्हा हिंदू केले होतेच नां? तेंव्हापासूनच आहे ती कन्व्हर्शन प्रोसिजर अस्तित्वात.

  17. अभय says:

    लीना
    आसाराम बापुंच्या आस्रमात तुम्हाला जो अनुभव आला तो तुम्ही प्रामाणिक पणे मांडला .पण ही गोष्ट तुम्हाला अनुभव घेतल्यावरच कळ्ली ना ?
    तुम्ही सदानंद मोरे यांचा एक लेख वाचुन त्यांना नावे का ठेवता ? तुम्ही स्वता राजवाडें बद्द्ल किंवा त्यांनी लिहलेले काही वाचले आहे का ? जर सदानंद मोरे यांचे म्हणणे खोडुन काढता येत नसेल तर त्या लेखाला ब्राह्मण द्वेष म्हणणे योग्य आहे का ? तुमच्या सारखीच एखादी व्यक्ती तुमच्या आसाराम बापुं वरिल लेखाला हिंदु द्वेष्टि म्हणु शकेल .
    आज होणारा विरोध तुम्हाला दिसतो ,पण या मागचि कारणे दिसत नाहीत का ? शेजवलकर हे ब्राह्मण इतिहासकार होते .पण पेशव्यांबद्दल लिहलेली त्यांची प्रस्तावना एकाही प्रकाशकाने छापली नव्हती. हा दहशतवाद तुम्हाला कदाचित माहित नसेल. आता या प्रस्तावनेसह पानिपत राजहंस ने प्रकाशित केले आहे. जम्ल्यास वाचा. लेन ने लिहलेले अभ्यासु आहे हे तुम्ही मानता आणी मोरेंना सत्य लिहले म्हणुन ब्राह्मिण द्वेष्टे म्हणता हे योग्य आहे का ?
    जेम्स परका आहे हे खरे आहे पण ते वादग्रस्त वाक्य त्याने काही लोक असा जोक करतात असे सांगुन लिहले आहे . असले जोक सांगनारे लोक दोषी नाहित का?

  18. sanjivani says:

    khupach chhan vichar sangitle ahet tyancha nakkich fayda hoil…………

Leave a comment