मुंबई आणि मराठी माणुस…

हा लेख मी कुठल्याही पक्षावर दोषारोपण करण्यासाठी लिहिलेला नाही. हे फक्त वेळॊ-वेळी माझ्या मनात येणारे विचार आहेत.

कालचीच गोष्ट आहे मार्केटला शॉपींग करायला गेलो होतो. रस्त्याने जातांना सगळ्या दुकानांच्या पाट्यांकडे नजर गेली. “राज ठाकरे की जय “! असं मोठ्यांदा ओरडावंसं वाटलं. सगळ्या पाट्या ’मराठी’  मधे लिहिलेल्या होत्या. माझा ’मराठी प्रेमी”  उर अभिमानाने भरून आला. जय हो!  सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठी मधे- अजून काय पाहीजे? चक्क एका झटक्यात एक धमकी दिली तर सगळ्या पाट्या मराठी मधे केल्या बघा सगळ्या .

पण हा आनंद फारच कमी काळ टिकला.   सगळ्या दुकानांच्या वरची नावं जरी देवनागरी मधे होती, तरी दुकानांचे मालक मात्र सगळे  हिंदी आणि गुजराथी वगैरे   आहेत हे प्रकर्षाने जाणवले . औषधालाही   पण एकही   दुकान मराठी माणसाचे  दिसले नाही जवळपास अर्धा  किमी च्या मुख्य रस्त्यावर .

एक पाटी   लावलेली पाहिली ’कला केंद्र मालाड ’मधे,- लिहिलं होतं, “दो शर्ट पे लेपटोप बेग फ्री”, तसेच दुसऱ्या  एका दुकानावर वाचले की  इथे ’पेंट पीस मिळेल’, तसेच एका बाजूला बोर्ड लागलेला दिसला, की “होल बाजूमे आहे.” -मला वाटतं हॉल बाजुला आहे लिहायचं असावं.

तर या अशा पाट्या वाचणे म्हणजे  निव्वळ मनोरंजन जरी होत असलं तरीही हे सगळं पाहिल्यावर  खूप वाईट झाले.  मराठी अस्मिता म्हणजे नेमकं काय?? मराठी अस्मिता म्हणजे नेमकं काय अपेक्षित असतं? हे सगळं पाहिलं की  मला प्रश्न पडतो, खरंच आपण काय मिळवलं हो मराठी पाट्या लावून? कसली मराठी अस्मिता जपली आपण??  जर सगळ्या दुकानांचे मालक मराठेतर असतील तर ह्या देवनागरी मध्ये लावलेल्या पाट्यांना काय अर्थ आहे?? हा  प्रश्न मेंदू कुरतडतोय , आणि मी  उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय कालपासून.

मुंबईतल्या इतर भागात मराठी पाट्या जरी असल्या , तरीही   माटुंगा भागात  मात्र दुकानांची नावं तामीळ मधे लिहिलेली दिसतात. जैन ज्वेलर्सचे पण नांव तामीळ मधे वाचून मला आश्चर्यच वाटले.  एका रांगेतल्या सगळ्याच दुकानांची नावं तामीळ मधे आहेत.  दक्षिण भारतात पाट्या पण त्यांच्या मातृभाषेत आणि दुकानांचे मालक पण स्थानिक दक्षिण भारतीय भाषिकच आहेत पण  आपल्याकडे तसे  का नाही  याचा विचार व्हायला हवा. असो.

मराठी लोकांची मुंबई असं आपण म्हणतो.पण खरंच  तसं आहे का? मुंबई मराठी लोकांची  आहे?

कदाचित वाचून वाईट वाटेल पण मुंबई मराठी माणसांची राहिलेली नाही. पूर्वीचे दिवस आठवतात का? साधारण जेंव्हा शिवसेना तयार झाली ते दिवस? ‘१९५५’ चं साल असेल .. तेंव्हा मराठी माणसांची टक्केवारी मुंबई मधे ६० टक्क्यांच्या वर होती  ( ज्या ६० टक्क्यांच्या जोरावर मुंबई सहीत संयुक्त महाराष्ट्र झाला )ती आज दुर्दैवाने १५ टक्यावर घसरलेली आहे .

ह्या ६० टक्क्यांमधे कोण होतं? माथाडी कामगार, मिल मजूर आणि इतर दुकानदार .. मुंबई पोर्ट ट्रस्ट वर हजारो गोदी कामगार काम करायचे . परदेशातून येणाऱ्या जहाजांची वर्दळ खूप जास्त होती. माथाडी कामगार म्हणजे गरीब कोंकणी मराठी माणूस मर मर काम करून दोन वेळची भाताची सोय करायचा.

रहाण्यासाठी  जागा, अर्थातच जवळपासच्या चाळींमध्ये! एका खोलीत  आपला संसार थाटायचा. लाल बाग, परळ सुतळी बाजार, लोहार चाळ भागातही अशा अनेक   चाळी होत्या.    नंतर कोणाचं डॊकं चाललं ते माहीत नाही, पण मुंबई पोर्ट   पोर्ट उरणला    (जवाहरल पोर्ट) नेणे हे मराठी माणसाच्या  पोटावर पाय देणारे ठरले. सगळा माथाडी कामगार वर्ग  मुंबईतून  उरणला तडीपार  झाला. मराठी माणसाचा टक्का घसरणे सुरु झाले मुंबईतले. “मला तर वाटतं की ही एक सोची समझी साजीश होती मराठी लोकांचे मुंबईतले वर्चस्व कमी  करण्यासाठी ? ”

सगळ्या कापड गिरण्या पण चांगल्या  जोरात सुरु होत्या. मुंबईचे दमट हवामान कापड उद्योगास पोषक म्हणून इथे चांगल्या क्वालीटीचे सुती कापड तयार केले जायचे. कोहिनूर, सेंच्युरी, डॉन वगैरे असंख्य मिल्स इथे सुरु होत्या . काही मिल मालकांनी तर कामगारांसाठी चाळी पण बांधल्या होत्या .  तेंव्हा  हा सगळा  कामगार वर्ग  लाल बाग, परळ , दादर, या भागात चाळींमध्ये रहात होता.. कुठल्याही जागी  पहा, तरी मराठी नावं  दिसायची – राणे, पवार, पाटील , ओक, जोशी ,भालेराव,  चितळे, परब, चव्हाण, केळकर,   प्रत्येक घराच्या पाटीवर.

कापड मील मालकांना पण भरपूर नफा मिळायचा . कित्येक मालक करोड पती झाले केवळ याच धंद्यावर. वर्षातून कमीत कमी एकदा तरी कामगारांना बोनस मिळायचा- आणि जास्तीत जास्त तीन वेळा.  या मिल मधे काम करणारा कामगार वर्ग परळ, लालबाग, प्रभादेवी , वरळी या भागात चाळीं मधे रहायचा. बऱ्याच मील मालकांनी तर मिलच्या आवारात पण चाळी बांधल्या होत्या कामगारांसाठी. नंतर तो ऐतिहासिक संप झाला, आणि     या सगळ्या  फायद्यातील मिल्स  लवकरच  एका पाठोपाठ  सगळ्या   बंद पडल्या- (की जमिनींचे सोन्या सारखे वाढलेले भाव बघून मालकांनी  कामगार नेत्यांच्या संगनमताने बंद पाडल्या  ?हा  प्रश्न अजूनही मला छळतो.)  मिल कामगार,   जे मुंबईला  चाळीत रहात होते, त्यांनी चाळीतली घरं विकून लवकरच सबर्ब मधे घरं घेणं सुरु केले,  तर काही लोकांनी  चाळीतली  घरं विकून गावाकडे परत जाणे पसंत केले.

काही  चाळी तर  रिडेव्हलेपमेंटच्या नावाखाली बिल्डर्स लॉबी ने ताब्यात  घेतल्या, आणि मग त्या चाळीत रहाणारा मराठी माणूस विरार, डोंबीवली , कल्याण , ठाणे या भागात स्थलांतरीत झाला. थोडक्यात सांगायचे तर या सगळ्यांचा परिणाम म्हणजे  मुंबईतला ’मराठी टक्का’ कमी होणे हाच झाला. त्यांची चाळीतली घरं कवडीमोलाने व्यापारी वर्गाने विकत घेतली,  बऱ्याच घरात तर गोडाउन्स उघडले गेले. सुतळी बाजार, नागदेवी क्रॉस लेन, धोबी तलाव, इत्यादी भागातल्या घरांमधे ऑफिसेस, दुकानं उघडली गेली . हार प्रकार बऱ्याच ठिकाणी दिसून येतो.

बंद पडलेल्या मिलच्या जागांवर सुरु झालेले शॉपिंग मॉल्स, किंवा बॉलींग ऍलीज वगैरे सुरु झालेल्या आहेत.  काही ठिकाणी हाय एंड हाउसींग प्रोजेक्ट्स सुरु करण्यात आलेले आहेत – ज्या मधे फ्लॅट्सच्या   किमती करोडॊंच्या घरात आहेत.  नुकताच एका जुन्या चाळींच्या जागेवर बांधलेल्या  अशा एका मोठ्या कॉम्प्लेक्स मधे जावे लागले एका माणसाला भेटण्यासाठी . मोठी १९ मजली टॉवर,    तिथे खाली लॉबी मधे  त्या बिल्डींग मधे रहात  असलेल्या लोकांच्या नावाची पाटी वाचली, तेंव्हा लक्षात आलं, की त्यामधे एकही मराठी नाव नाही! कुठे गेला मराठी माणूस  मुंबईतला??  मला तर कोणीच सापडत नाही, तुम्हाला जर कोणी  सापडला तर मला जरूर कळवा.

जर मला अजून पंधरा वीस  वर्षानी  पुण्यावर लेख लिहायची वेळ आली तर तो पण साधारण याच प्रकारचा असेल असे वाटते. पुण्यातली परिस्थिती पण काही फार वेगळी नाही-  तेंव्हा आत्ताच सावध हो  पुणेकरा….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , , , , , , . Bookmark the permalink.

67 Responses to मुंबई आणि मराठी माणुस…

  1. mau says:

    छान मांडलेत विचार……..सत्य दर्शवले आहे…माझं मुंबईवर अतोनात प्रेम..पण मीच नोकरीपायी मुंबईच्या बाहेर..पण हल्ली मुंबईचे झालेले हाल बघवत नाहित….नेहमीप्रमाणेच दर्जेदार लिखाण !!!

  2. हंऽऽऽ…. अगदी खरं आहे. मन विषण्ण होतं बर्‍याचदा मराठी माणसाचं मुंबईतलं घसरत चाललेलं प्रमाण बघून…

    • संकेत

      इथे क्वांटीटीव्ह रिडक्शन पण आहे, पर्सेंटेज सोबत… ह्याचच खरं दुःख !

    • vitthal karale patil says:

      pan yaala jababdaar mulaat aapanach naa……….

      • आपण कसे जबाबदार? अहो लोकांच्या रोजी रोटीचे व्यवसाय जर गावाबाहेर नेले तर सगळे लोकं तिकडे जातीलच.. पोर्ट ट्रस्ट बाहेर नेलं, आणि हज्जारो कामगार देशोधडिला लावले.

  3. Shree says:

    निशब्दः
    वाईट वाटते…

    • फार कशाला दहा पंधरा वर्षापुर्वीची मुंबई आणि आजची, सगळे लॅंडमार्क्स बदलून गेले आहेत. खूप फरक पडलाय.
      दुर्दैवाने इथे पण राजकीय फायदा, किंवा पैशाचा फायदा बघुन हे सगळं होऊ घातलं जातं याचंही वाईट वाटतं.

  4. Pingback: Tweets that mention मुंबई आणि मराठी माणुस… | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

  5. काय बोलू काका…
    सगळा सगळा आपल्या डोळ्यासमोर घडतय…आणि 😦

    • धन्यवाद सुहास
      आपल्या डोळ्यासमोरच सगळं घडतंय, आणि आपण काहीच करू शकत नाही. अशा वेळी कोणी थोडातरी उजेड दाखवला की सगळे पतंग त्या दिव्याकडे झेप घेऊन स्वतःला जाळून घेतात..

  6. भाषेच्या नावाने तोडफोड करणारा मराठी माणूस काम किंवा उद्योग करायचा म्हटलं, की पाऊल मागे घेतो. शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीने एकेकाळी उत्तम काम केले होते. मात्र दुर्दैव हे की, आपल्याकडे सगळ्या चळवळी, आंदोलने इ. व्यक्तींवर केंद्रीत राहतात. शिवाय हा मुद्दा अमुकने उचलला म्हणून तमुक त्याला विरोध करणार, हेही ठरलेलेच.
    मुंबईची स्थिती मला वाचूनच माहित. मात्र पुण्यात तीच स्थिती आली आहे. दहा वर्षांपूर्वी मी पुण्यात आलो होतो, तेव्हा बरीच मराठी मंडळी येथे व्यवसायात तर होतीच, उद्योगांतही होती. याला एखादा राजकारणी किंवा पक्ष पूर्णांशाने जबाबदार नाहीत. मराठी लोकांनी केलेली ही सामूहिक हाराकिरी आहे. मात्र मला असे वाटते, की एखाद्या समुहाला स्वतःच्या अस्तित्वाचे भान नसेल तर तो समूह टिकायलाच हवा हा आग्रहही सोडून द्यावा.

    • १९६० च्या सुमारास शिवसेनेने उत्तम काम केले होते, पण नंतर काही वर्षांनी दिशा भरकटलेल्या जहाजाची स्थिती झाली त्यांची. एकीकडे बाळासाहेब नेहेमी घराणेशाहीची खिल्ली ऊडवायचे, तिथे आज तेच आपल्या नातवाला लॉंच करतांना पाहून विचित्र वाटले.
      मराठी माणूस हा नेहेमीच कोणातरी नेत्याच्या शोधात असतो, त्याला फॉलो करायला ,मनात एक वेडी आशा घेऊन, की हा नेता काहीतरी ( म्हणजे नेमकं काय हे पण माहीत नसतं त्याला) करेल आपल्यासाठी.
      तुमचे शेवटचे वाक्य “एखाद्या समुहाला स्वतःच्या अस्तित्वाचे भान नसेल तर तो समूह टिकायलाच हवा हा आग्रहही सोडून द्यावा.” जरी खरे असले तरी त्याचा अर्थ मात्र खूप भयानक परीस्थितीची जाणीव करून देतो.
      नेमका, याच गोष्टीचा फायदा नेते घेतांना दिसतात.

  7. आका says:

    मन विषण्ण होतंय.. काय करावे हेच कळत नाही…
    जोपर्यंत मराठी माणसात एकी येत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही असं वाटतं..

    • मराठी माणसात एकी??इतीहास साक्षी आहे, ते कदापी होणे नाही. मराठी माणसात पडलेले गट, आणि त्यांची परस्परात्तली मारामारी पाहिली की ते अजून पटतं.

    • swapnil says:

      हेच तर​!! मराठी माणसाला दुहीचा शाप आहे. इतिहासामधून कधी शिकणार?

  8. thanthanpal says:

    मराठी अस्मिता म्हणजे नेमकं काय?? मराठी अस्मिता म्हणजे नेमकं काय?? सोप्प उत्तर आहे काका. आम्हाला मते द्या.मग पहा आम्ही कसे मोठे होतो ते.

  9. ngadre says:

    महेंद्रजी. मनातलं मनापासून लिहीलयत..
    मला एक शंका आली. नुसता टक्का घसरलाय की ही घसरलाय.

    कारण मुंबईची लोकसंख्या इतकी अफाट वाढली आहे की बाहेरून येणारे लोक जास्त असणार हे साहजिकच आले. इथले लोक इथेच राहिले आणि बाहेरून आलेल्यांची भर पडल्याने टक्के फक्त कमी झाले असंही असू शकेल.

    मराठी माणूस काही ठिकाणी top ला दिसतो. पण सामान्य मराठी माणूस वडापावच्या पुढे जात नाही. गेला तर आपल्या स्वत:च्या सोयीने व्यवसाय उद्योग करतो. गि-हाईकाच्या सोयीने नाही. तो घरून एका मोठ्या डब्यात पोहे भरून आणेल. (किंवा इडली..डोसे वगैरे बनवत बसायला लागतात. असे “गैरसोयीचे” पदार्थ तो आणणार नाही. मग गि-हाईकाला ते किती का आवडेनात.. ) सकाळी stall लावून गार पोहे विकेल आणि संपले की दहा च्या आत चालू पडेल. जेवायला घरी..

    मद्रासी मात्र तिथे चूल लावूल बसेल..लागतील तेवढ्या गरम इडल्या काढत आणि एका हाताने डोसे घालत..सांबार गरम वाढेल सगळ्यांना..हवे तेवढे..(लिंबू / मिरची / चटणी जास्ती मागू नये ..मिळणार नाही असा “बाणा” नाही..मराठी माणूस “गैरसोयीचे” म्हणून सांबार ठेवणारच नाही. मला लडबडाट नको. गरम करण्याची तसदी नको. तुम्ही फक्त कागदात इडली चटणी खा.. तेच मला सोयीचे, सुटसुटीत.)

    फरक आहे ना? तुम्हीही बघितला असेलच.

    • Smita says:

      dar VeLee fakta ya eateries cheech tulana karato apaN . Are you saying that’s the only measure? Ekhadee ShaLa/ Educational institute dedicatedly , uttam ritya chalavavee tar MaratHi lokannee asa mee mhaNen. Kinva ekhadee cultural movement like Savai Gandharva Mahotstav sarakhee Marathi lokanneech puDhe chalu thevalee ahe kitee taree varsha … Apalee strength identify karun tya var kaam karayacha ka nehamee apuN idlee stall neet chalavat naheee mhaNun kosat basayacha, nahiye chalavayacha idlee stall amhala that’s not us. manya ahe kee khoop atitude sudharayala vaav ahe, puN thodee swata:chee oLakh puN patavun ghyayala havee asa mala vaTata

      • स्वॉट ऍनॅलिसिस तर आवश्यक आहेच. मराठी शाळा योग्य रित्या चालवून दाखवल्या जातात. अजूनही नागपूरला सोमलवार , वगैरे शाळा चांगल्या शाळा म्हणून टीकून आहेत. इथे मुंबईला एकेकाळची नावाजलेली बाल मोहन, मला वाटतं अजूनही सुरु आहेच.

        मराठीला पद्धतशीर पणे डावलले जाते. इतकी नाटकं होतात, कार्यक्रम होतात, सभा- भाषणं वगैरे पण होतात, त्यापैकी किती गोष्टींना प्रसिद्धी मिळते? एकही बातमी इंग्रजी पेपरला छापून येत नाही, पण कुठल्या तरी हिंदी नाटकाचा रिव्ह्यु मात्र आवर्जून असतो. इंग्रजी पेपरच्या खिजगिणतीतही नाहीत मराठी लोकं- मराठी कार्यक्रम!

  10. ngadre says:

    Correction: नुसता टक्का घसरलाय की ही घसरलाय.

    I mean “नुसता टक्का घसरलाय की absolute number ही घसरलाय.”

    • नचिकेत
      नुसता ट्क्का घरसरलेला नाही, तर ऍबसोल्युट नंबर्स पण कमी झालेले आहेत. टाउन साईडला तर अजिबात कोणी शिल्लक नाही. पर्सेंटेज कमी होण्याचे कारण, इतर भागातील लोकांचे मुंबईला स्थलांतर, आणि आपल्याच नेत्यांनी त्यांच्या सुरळीत केलेल्या झोपडपट्ट्या!!

  11. आपल्या सर्वांच्या मनात असलेल्या जखमेवरच नेमक बोट ठेवलत तुम्ही… 😦

  12. ngadre says:

    @Smita..agreed perfectly.
    Only when we talk about TAKKA, percentage of population for marathi community etc then we are talking about COMMAN MAN. And they do similar businesses. Those 80% so called outsiders come here to do these things only and thats why are more successful and accepted.

    You are talking about very intellectual experties that marathi manus surely has but are sooooo much limited in creamy layer which is smaller and thinner than cream on glass of milk..

  13. Pingback: मुंबई आणि मराठी माणुस… | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

  14. उत्तम लेख.. !
    आपला गमावलेला स्वाभिमान परत मिळवण्यासाठी मराठी माणूस जोवर स्वतः पेटून न उठता एखाद्या पक्षावर अवलंबून राहील तोवर हे चित्र असंच राहणार !!!

    • हेरंब
      धन्यवाद.. स्वतःचा स्वाभिमान जागृत व्हायला हवा इतकेच मत आहे माझे. कोणत्याही राजकीय पक्षाने मराठी माणसाला अस्मितेच्या नावावर वापरून घेऊ नये एवढेच माझे मत आहे. आणि त्याच बरोबर मराठी माणसाला पण हे समजायला हवे तरच शक्य आहे हे.. नाहीतर एखाद्या नेत्यामागे रांगेने चालत जाऊन दरीत उडी मारणे एवढेच काय ते आद्य कर्तव्य शिल्लक उरते.

    • रोहन says:

      अरे म्हणजे नेमके काय करायचे??? एकता मराठी माणूस कुठे जाऊन लढू नाही शकत. संघटीत होऊनच शक्ती दाखवावी लागते. नाहीतर कोण विचारताय??? शेवटी पर्याय उरतात २. सेना किंवा मनसे… गर्दीला शिस्त नसते पण नेता असला की शिस्त येते. अर्थात हे नेत्यावर पण अवलंबून… 🙂 बघुया काळच दाखवेल…

  15. हेमंत आठल्ये says:

    प्रश्नच नाही. पुण्यातही तीच परिस्थिती आहे. आणि या पुणेकरांचा, माफ करा, पण खरंच या ‘पुणेकरांचा’ हिंदी प्रेम पहिले की रक्त खवळत. आमचे ‘पुणेकर’ मराठी भाषेला काय समजतात, कुणास ठाऊक! कधीच अनोळखी व्यक्तीशी बोलायला सुरवात ‘मराठी’त करीत नाहीत. मुंबईबद्दल काय बोलणार? तुम्ही मनातलं सर्व बोलून टाकल आहे. फक्त एक मुद्दा मला खटकला. तो म्हणजे ‘मराठी पाट्या करून काय फायदा?’. माझ मत अस आहे की, फायदा होवो अथवा न होवो. इथे मराठीच असायला हवं. राज्य मराठी लोकांचे आहे. म्हणून मराठीतच असायला हवे. मग विषय कोणताही असो.. मराठीच हवं.

    • Smita says:

      puNyat taree actual original puNekar uralet kuthe. ahet te Marathi lok Nagpur- Vidarbha, Marathwada asha thikanahunach alele ahet, aNee te lok jasta karun Hindi prefer karatat. Mala vaTatay kee yala karN hee PuNeree Marathee barobar ugach tulana nako hech asel, apUn ata shudha-ashudha kasheehee puN Marathi bola asa agraha Thevala pahije, lagech dusarya dialect madhale shabda alyavar tyanchee thaTTa karaNe he amacha puNeree vaishishtya . tyamuLe itar bhagatale marathee lok hamkhas Hindi boltana disataat. Mazya office madhalya group madhale sagLe Nagpurche lok extempore madhye Hindi ch boltat jaree mArathi matrubhasha asalee taree!karaN te “Mee Alee me Gelee” Chalale gele, “bolun rahile” asa bolayala lagale kee cheshta hote:-) That discourages them I think.

      • स्मिता
        अगदी योग्य लिहिलं आहे तुम्ही. याच विषयावर पूर्वी एक लेख लिहिला होता मराठीचे शत्रू नावाचा… इथे आहे तो .. http://wp.me/pq3x8-12j

        • Smita says:

          vahala lekh . barech mudde paTale. ek namud karavasa vaTata, kee tumhee mhaNata tase apuN kokanache, vidarbhache vagaire asato Maharashtrache kadheech nasato- yala karaN kahee anshee asahee ahe- kee janmabhar puNyat rahun kayam amacha Nagpur kasa great , aNee ithalee puNeree maNasa, tyanchee bhasha kitee vaiT, hee moorkh badbad karaNaree lokahee kamee naheet. apalya gavabaddal prem asatach manat, puN jee apuN karmabhoomee nivadalee – mug dusara gaav aso va dusara desh, tyala kayam nava thevayache, kee swata: mainstream madhye yayacha thoda taree prayatna karayacha?? kaheetaree dusarya gavatala jasta changal avaTalyamuLech tithe jaun apuN rahato na? muG ‘naturalize’ kenva hoNar tumhee lok tithalya sagaLya goshteenchee ninda karat basalat tar? dosh fakta tavaL puNekarancha nahee, narrow minded baherchya lokancha puN ahe asa mala vaTata.

    • हेमंत
      माझं म्हणणं की, नुसती मराठी पाटी नसावी, तर त्या दुकानात गल्ल्यावर बसलेला माणूस पण मराठीच असावा असे आहे. अर्धं वाक्य वाचलं की गैरसमज होतो.मागचा पुढचा रेफरन्स घेऊन ते वाक्य वाच.

      पुर्वी एकदा असंच झालं होतं, माझं अर्ध वाक्य वाचून त्यावरून महेंद्र जेम्स लेनला पाठींबा देतो असाही प्रचार केला गेला होता… असो..

  16. अभिजित says:

    महेंद्र,
    गडबडीत झाला का लेख? सर्व माहित असलेलेच मुद्दे पुन्हा एकदा उजळणी झाल्या सारखे वाटले. महेंद्र कुलकर्णींची पोस्ट वाटली नाही पण हरकत नाही. काम घर सांभाळून आपण पोस्ट लिहित असला प्रत्येक वेळी खोलात जायला वेळ मिळत नसणार.

    • अभिजित
      या विषयाला खूप कंगोरे आहेत. कितीही लिहिलं जाऊ शकतं, पण ते सगळं लिहित असतांना एकाही पक्षाच्या बरोबर लेख को रिलेट केला जाऊ नये असे वाटत होते, म्हणून थोडक्यात संपवला. जास्त मोठा लेख वाचला पण जात नाही नेट वरचा.. लोकं सरळ थोड्ं फार वाचून पुढे निघून जातात.
      प्रतीक्रियेसाठी आभार.

  17. santosh Deshmukh says:

    काका जेथे इच्छा तेथे मार्ग ..ज्यांना मुंबई सोडायची होती त्यानीच सोडली चाळीतून ओनरशिप मध्ये यायला कुणाला आवडणार नाही हो त्यांना कुणी हाकलून दिले नाही ,ज्यांनी कधी पैसा पहिला नवता अशी ती पाप्याची पितरं!! .काय फरक पडणार आहे मराठी माणसे मुंबईतून कमी झाल्याने नी आहेत ते तरी काय दिवे लावतात ? kaka मी तेथे खूपवेळा येतो मला तरी मुंबई कधीच मराठी माणसाची वाटलीच नाही आता तुमचाच ब्लाकवर पहा लोकांना देवनागरी लिहायला ही लाज वाटते कसला अभिमान नी स्वाभिमान घेऊन बसलाय देवीदास यांच्या मुद्दाशी मी पूर्ण सहमत आहे .मला सांगा ठाकरेंनी इतके यार आमच्या साठी केले तर आपण त्यांना काय दिले सांगा त्यांच्या खराब काळात राजला उचलून धरले आज काडोमापा मध्ये काय अवस्था आहे ? मुलाला नातवाला पुढे केल्याने काय बिघडले ? तुम्हाला गांधी चालतात पण ठाकरे नाही शाब्बास रे!!!!! मराठी नी मराठे

    • संतोष
      त्यांना जावं लागलं याचे कारण म्हणजे, बंद पडलेल्या गिरण्या, आणि पोर्ट! जर गिरण्या बंद पडल्या नसत्या तर ते लोकं मुंबई सोडून गेले नसते. मुळ निवासीच गेल्यामुळे मराठी लोकं कमी झालेत मुंबईमधे.
      अजूनही जर त्यांना नोकरी असती, तर त्यांनी चाळीतच रहाणं पसंत केलं असतं. बरं, चाळी पाडून तिथे बांधलेल्या बिल्डींग मधे पण मराठी लोकं दिसत नाहीत. जर मराठी लोकंच नाहीत, तर मराठीचे राजकारण कसे काय चालून जाईल?
      जेंव्हा मद्रासी लोकांनी मराठी लोकांच्या नोकऱ्या घेतल्या, तेंव्हा हटाओ लुंगी म्हणून जो शिवसेनेचा प्रवेश झाला, तेंव्हा शिवसेनेला चाळीत रहाणाऱ्या मराठी लोकांनीच उचलून धरले- तेच लोक आज शिल्ल्क नाहीत.

      ठाकरे ( बाळासाहेब, उद्धव, राज) यांनी काय केले तो एक पुर्ण वेगळा मुद्दा आहे, त्यावर नंतर कधीतरी लिहिन.

  18. महेश says:

    मराठी माणसाने स्वताच विचार करावा व आळशी पणा सोडवावा आपण (मराठी ) एवढे हुशार असताना
    हि परिस्थिती म्हणजे काय?जिथे इच्छाअसेल तर मराठी माणूस काही करू शकतो

  19. सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठीत कधी झाल्याच नाहीत. पण क्रॉसवर्ड सारख्या पुस्तकांच्या दुकानातही मराठी पुस्तकांची वानवा असते. ’मराठी पुस्तकं कुठे?’ असं विचारलं की ते ’रिजनल’ बुकांचा शेल्फ दाखवतात. कळस म्हणजे रिजनलचा शेल्फ जिथे सुरू होतो तिथेच संपतो. प्रादेशिक पुस्तकांमधेच मराठी भाषेची पुस्तक असल्याचं सांगतात पण प्रत्यक्षात मला तिथे औषधालाही मराठी पुस्तक मिळाले नाही. गेल्या आठवड्यात फिनीक्स मिल येथील लॅन्डमार्कच्या पुस्तके व सी.डीं.च्या दुकानात गेले होते तिथे मात्र रिजनल नाव असलं तरी प्रत्येक भाषेच्या सिनेमा सी.डी.ज अगदी व्यवस्थित लावून ठेवलेल्या होत्या. मराठी चित्रपटांचा इतका मोठा संग्रह मी पहिल्यांदाच एका ठिकाणी पाहिला.

    • रोहन says:

      होय कांचन… क्रॉसवर्ड आणि रिलायंस डिजिटल मध्ये सुद्धा मला असाच अनुभव आलेला आहे. लॅन्डमार्क बद्दल मला कालच कळले एका मैत्रिणीकडून. तिथे काही पुस्तके पण आहेत काय?

  20. Rajeev says:

    मी अनेक वेळा चेन्नई मधे हिंडलो … एक पाटी मराठी मधे वाचली….
    “ये थे ताजे, गरम जेवण मीळेल “

  21. रोहन says:

    मुंबईमध्ये खूप आधीपासून गुजराथी आणि जैन लोकांचे प्राबल्य होते. अगदी ब्रिटीश काळापासून. मराठे ब्रिटीशांचे हाडवैरी तेंव्हा त्यांचे जमणे शक्य नव्हते. जेंव्हा ब्रिटिशांनी मुंबईमध्ये जागा मोफत आणि मग अगदी स्वस्तात वाटल्या तेंव्हा त्या मराठी माणसाने घेतल्या नाहीत. नंतर तोच मराठी माणूस तेथे कामगार म्हणून कांम करू लागला पण जमिनीचा मालक नाही बनू शकला. पुढे तर संप आणि ठरवलेल्या रणनीती सकट मराठी लोकांना दक्षिण मुंबईमधून बाहेर काढले आहे. त्या बाबतीत काहीच शंका नाही.

    खूपच मोजके मराठी आहेत जे त्याकाळी मुंबईत जमिनीचे मालक होते. मुंबई म्हणजे दादर ते कुलाबा ह्या भागाबद्दल बोलतोय. पूर्व आणि पच्शिम उपनगरे तर खुपच नंतर बसली. आणि माझ्यामते तिथे मराठी टक्का अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. मुख्यतः: प्रश्न आहे तो दक्षिण मुंबईचा.

    अजूनही मंत्रालय तिथे आहे. संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री तिथे बसतो तो महाराष्ट्रामुळे. मुंबईत मराठी टक्का वाढवणे हे सहज होऊ शकते. प्रामाणिक इच्छा शक्ती हवी राज्यकर्त्यांची. पण काँग्रेस ते नाही करणार.

    राज ठाकरे स्वतःची लढाई लढतोय. त्याने वेगळा पक्ष स्थापून सेना कमकुवत केली हा आरोप खरा असला तरी त्यात त्याचे काय चुकले? सेनेने तरी गेल्या इतक्या वर्षांमध्ये काय केले मराठी माणसांसाठी??? फक्त बडबड? आणि धमक्या? ठाण्यात तरी आनंद दिघेने छोटी-मोठी संकुले बांधली हजारो मराठी लोकांना दुकाने सुरू करून दिली. मुंबई मध्ये काय???

    तू म्हणतोस तसेच… प्रश्न चिन्ह कायम आहे… आम्ही तुझ्या एवढे होऊ तेंव्हा काय परिस्थिती असेल हा विचार करून मन खातंय…. 😦

    • रोहन
      मुंबई खरी म्हणजे चांद्रसेनीय क्षत्रीय़ांची. मुळ मुंबईकर तेच ! शिवसेनेने काहीच केलेले नाही इतक्या दिवसात, आणि माझ्या मते राज पण त्याच मार्गाने जात आहे. त्यानेही काहीच केलेले नाही अजूनतरी! कोहीनूर मिल मधे पण काम करणारे कंत्राटदार मराठी………..असो. विषयांतर होतंय.
      मराठी लोकांची संख्या तिकडे कमी करण्यासाठी खास प्रयत्न केलेले आहेत सरकारी खाबूगीरीने. पोर्ट उरणला नेणे, मिल्स बंद पाडणे., त्याच जागेवर बांधली जाणारी घरं मुंबईकर मराठी माणूस विकत घेऊच कत नाही. मी स्वतः भाव पाहिले आहेत. कमीत कमी एक कोटी रुपये घरांची किंमत आहे तिकडल्या भागात.
      कदाचित पुढल्या १५-२० वर्षात ठाणे, डोंबीवलीला पण अशीच परीस्थिती असेल असे मला वाट्ते

      • रोहन says:

        मुंबई खरी म्हणजे चांद्रसेनीय क्षत्रीय़ांची. मुळ मुंबईकर तेच ! >>>>> हे बाकी खरे.. 🙂 मी सुद्धा चांद्रसेनीय म्हणजे सोमवंशी क्षत्रिय आहे. मुंबईच्या इतिहासावर डिसेंबर पासून एक लेख मालिका सुरू करतोय.. २-३ पुस्तके आहेत हातात.. 🙂

        बाकी… ठाण्याला आत्ताच भाव ६ हजार पोचलेत. काही ठिकाणी ७-८ सुद्धा. वडिलांनी १९९८ साली नवीन घर घेतले तेंव्हा घोडबंदरला ९०० रुपये भाव होता. आत्ता ५ हजार आहे.
        पण हे सुद्धा लवकरच १० च्या वर जाईल बघ.. 🙂

  22. Aparna says:

    याला आणखीही एक कंगोरा आहे..मराठी माणूस स्वतःच किती मराठी राहिला आहे…आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये तरी घालायचं धैर्य आहे का?? मराठीसाठी पुढे पुढे करणार्‍या नेतेलोकांची मुलं तर स्कॉटिश शाळेत जातात…अशा मराठी मुलांनी आपण म्हणता त्याप्रमाणे उद्योगधंदे काढले नं तरी ते मराठी पाटी कितपत नीट लिहितील ही शंकाच आहे..मुद्दा फ़क्त तो नाहीये पण काही काही बाबतीत मराठी लोकांनीही पळपुटेपणा केला आहेच आपल्या जागा मराठेतरांना विकुन….त्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये हा मुद्दा खूप चांगला मांडला आहे..पण तुम्ही म्हणताय ते आहे….मुंबईत मराठी लोकांची संख्याच आता कमी होतेय….तुमचं मालाड पण “मलाड”च होतं पुर्वीपासून आता त्यात भर पडलीय…..

    • अपर्णा
      मराठी लोकं जे पळून गेलेत त्यांना जायला भाग पाडले गेले. मिल्स बंद पडल्या, लोकं काम तरी काय करणार?? अर्थात काही लोकं वाढलेली कुटुंब आणि म्हणून मोठी जागा पाहिजे म्हणून दूर फ्लॅट्स घेतलेत त्यांनी इकडच्या खोल्या विकून,

      • thanthanpal says:

        अंबानींकडून शेजा-यांना हडतूड – Maharashtra Times
        maharashtratimes.indiatimes.com
        http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7395205.cms
        मुकेश सारख्या देशाला भ्रष्ट्राचाराच्या मार्गाने विकासा ? (कोणाचा ? मनमोहन जाणे ) कडे नेणाऱ्या उद्योगपतीचा त्रास होत असेल तर शेजारयानी तो संपूर्ण विभाग मुकेश करता मोकळा करावा. aaj ashi paristhiti aali. karjat kasaryachya pudhe javun rahave.

  23. रोहन says:

    अपर्णा..

    ह्याला पळपुटेपणा कसा म्हणू शकतो आपण??? निकडीची गरज म्हणून लोक घरे विकून बाहेर गेले…

  24. महेंद्र,
    आत्ताच तुमचा लेख वाचला. मराठी माणसाच्या ह्या आजच्या स्थितीला इतर भाषिक लोकांइतकाच मराठी माणूस ही जबाबदार आहे. भिडस्त पणा बाजूला ठेवून काही आपण सर्वच मराठीचा आग्रह धरत? जर प्रत्येक मराठी माणसाने खालील निश्चय केले तर मला वाटते की अजूनही आपण परिस्थिती बदलू शकू:

    १. महाराष्ट्रातील सार्वजनिक ठिकाणी मराठीतूनच संभाषण करीन (समोरच्या माणसाला मराठी कळले नाही तरी प्रथम मराठी आणि मगच त्याचा अनुवाद करून बोलेन).
    २. घरात एक तरी मराठी वर्तमान पत्र आणीन आणि मुलांना ते वाचण्याचा आग्रह करीन
    ३. जुने नवीन मराठी साहित्य विकत घेऊन वाचीन आणि त्याबद्दल मुलांशी चर्चा करीन जेणेकरून मुलांना ते वाचायची आवड निर्माण होईल
    ४. अमराठी मित्रांना मराठी बोलीभाषा शिकण्यास मदत करीन आणि त्यांच्या भाषेतही रस दाखवीन
    ५. मराठी मित्र मंडळीना मराठीतूनच ईमेल लिहीन.
    ६. आणि हो! रोज मराठी ब्लॉग वाचीन 🙂

  25. siddhesh says:

    ६१ च्या मुंबई महाराष्ट्रा सह झालीच पाहिजे या लढ्यात गोदी कामगार, मील मजदूर, माथाडी कामगार सर्व कामगार पक्ष हें मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. तेव्हा २न्ही सेना पक्षांचा जन्मदेखिल झाला नव्हता. मुंबई महाराष्ट्रात आल्यावर मराठी समजत फुट पडायचे काम दिल्ली कांग्रेस नेत्यानी केवल पराभवाचा सूड उगवायचा म्हणून केला.
    तुम्ही सांगितल्या प्रमाणे पोर्ट उरण ला नेले.इथेच मराठी संखेला घरघर सुरु झाली. पुढे मोठा संप होवून कामगार पक्षानी आपली ताकद दाखवायचा यशस्वी प्रयत्न केला.
    तेव्हा कामगार पक्षाना संपवान्या साठी नव्याने उदयाला आल्लेल्या शिवसेनेला कांग्रेस्सने नेहमीच छुपी मदत केली या मुले मराठी मत्ते फुटुन कांग्रेस्सला फायदा व्हायचा. शिवासेनेमूले मुंबई महाराष्ट्राची होण्यात मोठा वाटा असलेले कामगार पक्ष कायमचे संपले.
    आज हेच शस्त्र शिवसेनेवर मनसे च्या रूपत कांग्रेस्सने सोडले आहे. राज वर कांग्रेस ने सुपारी दिल्याचा,मत फोड्ल्याचा आरोप होतो हें याच कारना मूले.
    मराठी समाजात एकी किती होती हा इतिहास स्पष्टच आहे. मराठी मानुसच आपल्या लोकांचे पाय खेचतो. शिवाय मराठी शाला बंद ,साहित्य, मराठी माणुस धंद्यात मागे इत्यादी समस्या वर २न्ही सेना काहीच काम करत नाहीत. उलट मुंबई बी.एम्.सी निवदनुकान मधे सेना आल्या कारण
    पासून ब्रश्ताचर वाढले. बिल्डर लोबीशी पैसे खायचे हें यांचे धंदे मराठी मानुस मुंबई मधून हद्द-पर होण्यास कर्निभुत आहेत.

  26. sarwadnya says:

    Mhanje kasa ahe na ki pratyek jan eka muddyavar tham jevva to mudda yeto tya veli…
    jevva kashmir mudda ala tevva amhi bhartiya ,,,,jevva state level mudda ala tevva amhi maharashtrache …..ani jevva tya khali vichar karnyachi vel ali tevva amhi mumbaikar , punekar, nagpurkar ani anek,……ani mag area , society, building , floor, apla ghar, gharatle ani swataha me…………..manuns nehami ya saglya goshtincha vichar karun samajik aslyacha aav anto……..asa asava pan gondhalun na jata swataha apan kuthe ahot yacha vichar karava……….tevva swatahacha ghetlela adhava nantar samajane ghetlele adhava ani nantar deshane ghetlela adhava………..jagtana samajat hi khup mothi sakhali ahe ji kahi kelya modli janar nahi………..ani modnyacha jo prayatna karen to modla jail…………tevva adhi apan ulta jau adhi swataha sudharu mag ghar nantar building ani pudhe mahit ahech………..tevva vishay kahi aso swataha acharan kara ani mag bakichyanna sanga………..dhanyawad (tika karnyacha hetu nahi) ……..

  27. स्वागत आहे ब्लॉग वर..
    अहो टिका केली तरी हरकत नाही, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू या असतातच, कोण कुठली बाजू पाहू इच्छितो ती बाजू पाहिल… 🙂

  28. siddhesh says:

    majhya pratikriye ver aaple mat kay ahe?

    • कॉंग्रेसला शिवसेनेनी मदत केली, किंवा कॉंग्रेसनी शिवसेनेला मदत केली हे उघड आहेच. मनसे हा पण एक कॉंग्रेसच्या भात्यामधला बाण आहे.
      यावर उत्तर म्हणून शरदरावांनी राष्ट्रवादीचा छुपा बाण सोडलाय, तो म्हणजे ब्रिगेड.आपल्या कडे सगळॆ नेते स्वतःची सिट सांभळण्यासाठी देशाचा बळी द्यायला पण तयार असतात, हा त्याचाच एक प्रकार म्हणता येईल.
      महापालीका ही पैसे खाण्याची संस्था आहे असे सगळ्यांना वाटते. तुम्हीच सांगा हे सगळे मोठ मोठे नेते, काही न करता कसे काय इतक्या उच्च लेव्हलचे जिवन जगतात ? भारतामधे कुठलिही महापालीका घ्या- सारखीच करप्ट आहे. शिवसेना पण त्याला अपवाद नाही. इथे जो कोणी येईल, तो हेच काम करणार आहे .
      झोपडपट्ट्या रेगुलराइझ करण्याचे शिवसेनेने सुरु केले होते, ही गोष्ट पण विसरून चालणार नाही. तेंव्हापासून हाच पायंडा कॉंग्रेसने पुढे नेला. असो.. कोळसा उगाळावा तितका काळाच.

  29. thanthanpal says:

    कामगार नेत्यांच्या संगनमताने बंद पाडल्या ?हा प्रश्न अजूनही मला छळतो.) हें कटु सत्य आहे. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करून मर्यादित मराठी माणुस अब्जोपति झाला……. पण…… मराठी माणुस मात्र मुंबई तुन हद्दपार झाला. एव्हढेच नव्हे तर आता तर कोकण मध्ये सुद्धा अनेक व्यवसायात कामात बिगर मराठी माणसाचा ताबा आहे………. अनेक मोठ्या प्रकल्पावर बाहेरच्या राज्यातील नागरीकच काम करत असतात…. आणि याला (माफ करा) मराठी माणसाची कामचोर वृतीच कारणीभूत आहे. कामात टाळंमटाळ करणे , उशीरा येणे , लवकर जाणे , समोरच्याची अडवणूक करणे , गप्पात वेळ घालवणे या दुर्गुणा मुळे मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्याच्या उद्योगात ही बिगर मराठी लोकांचाच भरणा आहे. एव्हढेच नव्हे तर बंद पडलेल्या गिरण्या विकत घेवून त्यावर कामगारांना इंच भर जागा न देता मॉल उभे करण्यात आले… आणि त्याच बरोबर इतर गिरण्यांनी मात्र कामगारा करता जागा सोडावी म्हणुन राजकारण करत सत्याग्रह , आंदोलन केले. आत्ता तरी जागे व्हा आणि यांच्या दोघांच्या सत्तेच्या राजकारणाचा वेळीच बंदोबस्त करा.

  30. sipak galitkar says:

    sare kahi hatabaher gelyavar jag aali etihas aapan badalu shakat nahi pan vartamanat shahane hou shakto kranti ghadavayala tarun budhhichi hatanchi aaniyogya netrutvachi garaj aahe dhanyavad

  31. तनुजा says:

    लेख अगदी पटला मनापासून
    तरी अजून दादर मध्ये थोड वाटत कि बाबा आपण मुंबईत आहोत.
    मराठी शब्द काय किती तरी मित्र मैत्रिणी जेव्हा म्हणतात मराठीत वाचायला खूप अवघड आहे.
    किंवा दुसरी व्यक्ती मराठी असून हिंदीत बोलते तेवा खूप खटकते

  32. sanghavi says:

    lekh jivala lagla o sir. #Marathi

  33. sanghavi says:

    ani amchya URAN chi paristhiti dekhil ashich zali ahe. Marathi mansala nokrya devu ase ashwasan devun ya JNPT PORT ne prakalpgrashtala deshodhadila lavle ahe. eka pidhila nokri dili ani jamini ghetlya ata amchya pidhicha ky jamin hi geli ani nokri hi sampli

Leave a comment